Advertisement

वरकुटे येथे जुगार खेळताना ११ जण अटकेत,३लाख १२ हजार रुपये जप्त.

म्हसवड पोलिसांची अवैध धंद्यांच्या अनुषंगाने पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई

म्हसवड (वार्ताहर)-
सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी स्टाफसह वरकुटे मलवडी येथील जुगार अड्ड्यावर छापा मारून 3 लाख 12 हजार 670 रुपयाचा जुगार साहित्य, रोख रक्कम आणि मोटरसायकल मुद्देमाल जप्त करून 11 आरोपींना केली अटक केली आहे.

सविस्तर हकीकत
*मौजे वरकुटे मलवडी तालुका मान गावचे हद्दीत सिद्धार्थ विश्वनाथ बनसोडे यांच्या घराच्या आडोशाला काही इसम तीन पाणी पत्त्यावर पैंज म्हणून जुगार खेळत असले बाबत गोपनीय माहिती काढून तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी पोलीस स्टाफसह वरकुटे मलवडी येथील प्राप्त माहितीच्या ठिकाणी छापा मारून जुगार खेळणाऱ्या 11 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर म्हसवड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 12 अ प्रमाने गुन्हा दाखल केलेला असून यामध्ये 3 लाख 12 हजार 670 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

सदरची कामगिरी ही सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी सर,अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पोलिस अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेली आहे.*

सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे, अमर नारनवर, देवानंद खाडे, रूपाली फडतरे, जगन्नाथ लुबाळ, नवनाथ शिरकुळे, अनिल वाघमोडे, सतीश जाधव, श्रीकांत सुद्रिक, पोलीस मित्र नारनवर यांनी या कारवाईत भाग घेतला.

या गुन्ह्यातील आरोपींची नावे खालील प्रमाणे आहेत.

म्हसवड पोलिसांची अवैध धंद्यांच्या अनुषंगाने पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई.

म्हसवड (वार्ताहर)-
सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी स्टाफसह वरकुटे मलवडी येथील जुगार अड्ड्यावर छापा मारून 3 लाख 12 हजार 670 रुपयाचा जुगार साहित्य, रोख रक्कम आणि मोटरसायकल मुद्देमाल जप्त करून 11 आरोपींना केली अटक केली आहे.

सविस्तर हकीकत
*मौजे वरकुटे मलवडी तालुका मान गावचे हद्दीत सिद्धार्थ विश्वनाथ बनसोडे यांच्या घराच्या आडोशाला काही इसम तीन पाणी पत्त्यावर पैंज म्हणून जुगार खेळत असले बाबत गोपनीय माहिती काढून तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी पोलीस स्टाफसह वरकुटे मलवडी येथील प्राप्त माहितीच्या ठिकाणी छापा मारून जुगार खेळणाऱ्या 11 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर म्हसवड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 12 अ प्रमाने गुन्हा दाखल केलेला असून यामध्ये 3 लाख 12 हजार 670 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

सदरची कामगिरी ही सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी सर,अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पोलिस अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेली आहे.*

ग्रामविकासमंत्री जयकुमारभाऊ गोरे यांच्यामुळे बेंदवस्तीच्या प्रश्न सुटला- हर्षवर्धन शेळके-पाटील

म्हसवड वार्ताहर
लोणंद MIDC ते मरिआईचीवाडी येथील हद्दीत सुरू असलेला केंद्र सरकारचा सौरऊर्जा प्रकल्प काही दिवसात सुरू होत आहे.
या प्रकल्पातून HT विद्युत लाईन औद्योगिक क्षेत्राकडे घेऊन जायचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, परंतु ही लाईन जाण्यास बेंदवस्ती व सभोवतालच्या शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे.
शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता, राजकीय दबावापोटी या विद्युत लाईनच्या सर्व्हेमध्ये बदल करण्यात आला होता.
सदरच्या कामास कडाडून विरोध झाल्यावर शेतकऱ्यांनी हा प्रकार भाजपा जिल्हा सरचिटणीस मा.हर्षवर्धन शेळके-पाटील यांच्या कानावर घातला. संबंधित शेतकरी, काँट्रॅक्टर, नायब तहसीलदार यांनी घटना स्थळावर पाहून सर्व्हे करून मा.तहसीलदार यांना अहवाल पाठवला.
श्री.हर्षवर्धन शेळके-पाटील यांनी हा प्रकार ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या निदर्शनास आणून देताच ग्रामविकास मंत्र्यांनी तहसीलदार अजित पाटील यांना शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच ही विद्युत लाईन पुढे घेऊन जाण्याच्या सूचना केल्या.

त्याप्रमाणे आज तहसीलदार मा.अजित पाटील साहेब, भाजपा जिल्हा सरचिटणीस मा.हर्षवर्धन शेळके-पाटील, महावितरण उपविभागीय अधिकारी श्री.रेड्डीसाहेब, काँट्रॅक्टर श्री.खुडे, मंडलअधिकारी श्री.देवकाते साहेब यांनी संबधित क्षेत्राची पाहणी करून शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन योग्य मार्ग काढला व औद्योगिक क्षेत्राकडे जाणाऱ्या HT विद्युत लाईनचा मार्ग मोकळा झाला.
यावेळी नगरसेवक शिवाजीराव शेळके, मस्कुआन्ना शेळके, संदीप शेळके, शामराव शेळके, विकास क्षीरसागर, शरद शेळके, दिलीप क्षीरसागर, गोकुळ क्षीरसागर, तेजस शेळके, संतोष क्षीरसागर, संजय क्षीरसागर, राहुल क्षीरसागर, मंगेश क्षीरसागर, सुजित क्षीरसागर आदि मान्यवर उपस्थित होते.
बेंदवस्ती व पाटीलवस्ती येथील शेतकऱ्यांच्या कडून ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे भाऊ यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भ्याड हल्ल्याबाबत सर्वपक्षीय जाहीर निषेध सभा मोठ्या उत्साहात संपन्न !

सातारा : संभाजी ब्रिगेडचे झुंजार नेते प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संविधानवादी,मानवतावादी, आंबेडकरवादी,पुरोगामी संघटना,पक्ष व व्यक्ती अर्थात, सर्वपक्षीय संघटनांच्यावतीने जाहीर निदर्शने आणि निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्ह्यातील तमाम पुरोगामी पक्ष संघटना,व्यक्ती, धार्मिक,सामाजिक,सांस्कृतिक, राजकीय आदी संघटनांचे पदाधिकारी,प्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.प्रथमतः सरकार विरोधार्थ घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.भ्याड हल्ला करणाऱ्यासह मास्टर माईंडचा शोध घेऊन कठोरात कठोर शिक्षा द्यावी.या अनुषंगाने एकापेक्षा एक भाषणांची मैफिल रंगली असली तरी सरकार विरोधी आक्रोश होता.निदर्शने आंदोलनसह निषेध सभेसाठी अनेकजण हजर होते.गणेश भिसे यांनी प्रास्ताविक केले. गणेश वाघमारे यांनी आभार मानले.सरतेशेवटी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.सदरच्या आंदोलनात भारत पाटणकर,पार्थ पोळके,राजेंद्र शेलार,तुषार मोतलिंग,चंद्रकांत तथा सी.आर.बर्गे,विजय मोरे,विवेकानंद बाबर,माणिक आढाव,मिनाज सय्यद,उत्तम भालेराव,अरबाज शेख,प्रमोद क्षीरसागर,उमेश खंडझोडे,प्रकाश काशिळकर, डॉ.श्री.व सौ.वंदना दीपक माने, संजय गाडे,विशाल भोसले, सतीश माने,नितीन रोकडे,भरत गाडे,डॉ.कारंडे, रामदास,रमेश गायकवाड, आदिनाथ बिराजे,विजय मांडके, हृषीकेश गायकवाड,दीपक गाडे, नितीन चव्हाण,अनिल वीर आदी मान्यवरांसह कांग्रेस, राष्ट्रवादी (एस.पी.), वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई),दलित महासंघ, रिपब्लिकन सेना,महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन संघटना, जयंती समिती,दिपकभाऊ निकाळजे यांची आरपीआय, विद्रोही,मुस्लिम,भीमआर्मि आदी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.

फोटो : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करताना मान्यवर,पदाधिकारी व कार्यकर्ते.

पालकमंत्र्याकडे क्रिडासंकूल उभारण्याबाबतचे निवेदन सादर

सातारा : (अनिल वीर यांजकडून) दुर्गम डोंगराळ अशी ओळख असलेल्या पाटण तालुक्यातील युवक विविध क्षेत्रांत गगनभरारी घेत आहेत. भविष्यात चांगले क्रिडापट्टू तयार होण्यासाठी शासकीय क्रिडासंकूल उभारण्यात यावे. अशी आग्रही मागणी शिवसेना प्रणित शेतकरी सेनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष विकास हादवे यांनी राज्याचे पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री ना. शंभुराज देसाई यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे,
पाटण तालुका विविध वैशिष्टयानी देशाच्या नकाशावर आपला ठसा उमटवला आहे.
धार्मिक,सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा लाभलेला तालुका जैवविविधतेने संपन्न असला तरीही दुर्गम म्हणून उपेक्षित राहिला आहे. तरीही तालुक्यातील तरुण-तरुणी अपार कष्ट करून गरिबीचा सामना करून विविध क्षेत्रांत भरती होऊन यश संपादन करत आहेत.तेव्हा क्रिडाक्षेत्राचा विचार करता या ठिकाणी कोणतेही क्रिडा प्रशिक्षण केंद्र व सुसज्ज क्रिडांगणे उपलब्ध नसतानाही तालुक्यातील अनेक युवक – युवतींनी क्रिडाक्षेत्रात भरारी घेत आहेत.यातुन भविष्यात राष्ट्रीय खेळाडूसुद्धा तयार होतील. यासाठी विविध स्पर्धेत उतरण्यासाठी तालुक्यात सुसज्ज शासकीय क्रिडासंकूल उभारून तरुणांचे राष्ट्रीय पातळीवर खेळाडू म्हणून चमकण्याचे ध्येय पूर्ण होईल.अशा आशयाचे निवेदन आहे.

फोटो : क्रीडासंकुल संग्रहित.(छाया-अनिल वीर)

ढाकणी येथे महिलेचा विनयभंग म्हसवड पोलीसात गुन्हा दाखल

म्हसवड वार्ताहर

ढाकणी तालुका माण येथे महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका आरोपी ला अटक करण्यात आली आहे. म्हसवड पोलीसात सदर महिलेने फिर्याद दाखल केली आहे. अधिक तपास एपीआय अक्षय सोनवणेकरीत आहेत.
अधिक माहिती अशी.ढाकणी येथील साबळे यांचे शेतात सदर पिडीत महिला खुरपणी करत असताना मल्हारी पांडुरंग खाडे वय 48 वर्ष राहणार ढाकणी तालुका -माण जिल्हा- सातारा हा आरोपी तेथे आला व त्याने उसने दिलेल्या पैशाची मागणी केली, यावेळी त्याने सदर महिलेच्या ब्लाऊज मध्ये हात घालून दोन हजार रुपये घेतले व तिच्या शी गैरवर्तणूक केली.

व तो पळून गेला. अशा आशयाची फिर्याद सदर महिलेने दाखल केली आहे. यावरुन सपोनि अक्षय सोनवणे यांनी गुन्हा दाखल केला आहे.

चिल्लर देता का? चिल्लर, व्यापारी वर्गाला डिजिटल फटका.

डिजिटल व्यवाहाराने बाजारपेठेत सुट्टया पैशाची, चलनी नोटांची चणचण

म्हसवड दि. १४
आर्थिक व्यवहारात अधिक स्पष्टता यावी यासाठी भारत सरकारने डिजीटल ( करंन्सी ) व्यवहार धोरण अवलंबले असल्याने गल्लीपासुन ते दिल्ली पर्यंत सर्वत्र सर्रासपणे आता डिजीटल व्यवहार होत आहेत, त्यामुळे व्यावसायिकांच्या थेट बँक खात्यात रक्कम जात असल्याने दुकानदारांच्या गल्ल्यात कमी अन् खात्यात रक्कम जमा होत आहे, याचा थेट परिणाम बाजारपेठेवर झाला असुन बाजारपेठेत चलनी नोटांची व सुट्टया पैशांची मोठी चणचण भासु लागली आहे.
डिजीटल भारत ची संकल्पना सर्वत्र राबवली जात असल्याने छोट्या दुकानदारांपासुन ते मोठ्या व्यावसायिकांपर्यमत सर्वच ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणावर डिजिटल व्यवहार होत आहेत, आपल्याकडे तुलनेने सर्वाधिक डिजीटल व्यवहार होण्याचे प्रमाण वाढले आहे त्याला शासनाकडुनच चालना दिली जात असल्याने गल्ली ते दिल्ली डिजीटल व्यवहार वाढले आहेत, याचा परिणाम दैनंदिन व्यावसाय करणार्या छोट्या दुकानदारांवर झाला आहे. बाजारपेठेत अगदी ५ रुपयांपासुन ते ५ हजारांपर्यंत चे व्यवहार डिजीटल होत असल्याने बाजारपेठेत चलनी नोटांची कमतरता व्यापार्यांना व सामान्यांही अधिक जाणवत आहे, तर सुट्टया पैशाची ही मोठी चणचण निर्माण झाली आहे.
पूर्वी सुट्टया पैशाचे करायचे काय असा प्रश्न सर्वांसमोर होता आता सुट्टे पैसे ही मिळेनात अशी परिस्थिती झाली आहे. यापुर्वी सुट्टया पैशाची चणचण भासल्यास व्यापारीवर्ग मंदिरातील पुजार्याकडे धाव घेत होता, आता मंदिरातही भाविक दक्षिणा व देणगी ऑनलाइन स्वरुपात देवु लागल्याचे चित्र आहे. दैनंदिन व्यवहारात १००, २०० व ५०० रुपयांच्या नोटा अधिक असल्याने ५०, २० व १० च्या नोटांचे प्रमाण कमी झाले आहे त्याचा परिणाम छोट्या दुकानदारांवर झाला आहे. पुर्वी बँकेतुन रक्कम काढणार्या ग्राहकाला ठरावीक रकमेची चिल्लरची पाकिटे दिली जायची आता तीच पाकिटे शोधण्याची वेळ सामान्य ग्राहक व छोट्या दुकानदारांवर आली आहे, तर दैनंदिन व्यवहारात असलेल्या चलनी नोटांची अवस्था फारच गंभीर आहे.

ट्रिपच्या नावाने 15 लाखांची फसवणूक


ट्रिपच्या नावाने 15 लाखांची फसवणूक
सातारा : उत्तर आणि दक्षिण भारत तसेच दुबईत कंपनीची ट्रीप जाणार आहे, म्हणून बुकींगसाठी पैसे घेऊन 15 लाखांची फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात सहा जणांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयवंत रामचंद्र वारागडे (वय 59, रा. शनिवार पेठ, सातारा) यांनी तक्रार दिलेली आहे. त्यानुसार मयुरेश वाघ, काजल निमसे, सपना वाघ, शुभांगी कदम, अनुजा आणि सुवर्णा भालेराव (संपूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

जयराम स्वामी वडगाव येथे पंधरा रोजी अवयव दान जनजागृती कार्यक्रम

जयराम स्वामी वडगाव येथे पंधरा रोजी अवयव दान जनजागृती कार्यक्रम

मायणी प्रतिनिधी-खटाव तालुक्यात प्रसिद्ध असणाऱ्या जयराम स्वामी वडगाव येथील 15 रोजी मंगळवारी अवयव दान जनजागृती कार्यक्रम होणार असल्याची माहिती प्रशालेचे प्रमुख जयवंत घार्गे यांनी दिली सदरचा कार्यक्रम जयराम स्वामी विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेज व कोमल न्यू लाईफ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मंगेश जी चिवटे कक्ष प्रमुख उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष मुंबई हे भूषवणार आहेत तसेच प्रमुख मार्गदर्शन कॉमन न्यू लाइफ फाउंडेशनचे अध्यक्ष धीरज गोडसे करणार आहेत. तसेच केंद्रीय समन्वयक अवयव प्रत्यारोपण समितीचे आर्थिक गोखले मॅडम उपस्थित राहणार आहेत.
त्याचप्रमाणे अविनाश काशीद सदस्य फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन हेही उपस्थित राहणार आहेत .
तरी अवयव दान जनजागृती कार्यक्रमास पालक ग्रामस्थ यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन हुतात्मा मंडळाचे उपाध्यक्ष अंकुश घारगे यांनी केले आहे.

“द जर्नालिस्ट असोसिएशन” दिल्ली यांचे नॅशनल लिगल सेलच्या,सोलापूर जिल्ह्याध्यक्ष पदी ॲड शिवाजी शा.कांबळे यांची निवड.

“द जर्नालिस्ट असोसिएशन” दिल्ली यांचे नॅशनल लिगल सेलच्या,सोलापूर जिल्ह्याध्यक्ष पदी ॲड शिवाजी शा.कांबळे यांची निवड.

सोलापुर प्रतिनिधी ,
लोकशाहीचा चौथा स्तंभ जर्नालिझम असुन त्याकरीता राष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी संस्था “द जर्नलिस्ट असोसिएशन दिल्ली” यांचे नॅशनल लिगल सेल, सोलापूरच्या जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ व अभ्यासु विधीज्ञ ॲड. शिवाजी शा.कांबळे यांची नुकतीच निवड करण्यात आली.
नॅशनल लिगल सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. राकेशजी यादव तसेच राष्ट्रीय सरचिटणीस मा. ॲड. अयुब पटेल यांनी नुकतीच त्यांची निवड केलेली आहे. यावेळी सोलापूरचे नुतन जिल्ह्याध्यक्ष ॲड शिवाजी शा. कांबळे यांनी त्यांचे मत व्यक्त करत असताना संस्थेच्या राष्ट्रीय धोरणानुसार विधी सेवा देण्याचा मनोदय व्यक्त केला.
तसेच राष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी संस्था द जर्नलिस्ट असोसिएशन दिल्ली यांनी केलेल्या निवडी बद्दल या संस्थेचे आभार मानले आहे.
या निवडी बद्दल त्यांचे समाजातील सर्व स्तरातून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!