सातारा ( वृत्तसेवा ) —सातारा जिल्हा पत्रकार संघाच्या अंतर्गत सातारा तालुका पत्रकार संघाची आज सभा पार पडली. पत्रकार संघाच्या झालेल्या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांच्या एकमताने बिनविरोध निवडी करण्यात आल्या. यावेळी सातारा तालुका पत्रकार संघाचे
अध्यक्षपदी अजय कदम, उपाध्यक्ष विजय जाधव व सुनील साबळे, कार्याध्यक्ष बाळू मोरे, सचिव राहुल ताटे, सहसचिव गुलाब पठाण, खजिनदार वसंत साबळे, संघटक नितीन साळुंखे, ज्येष्ठ मार्गदर्शक शिवाजी कदम, तर कार्यकारणी सदस्य म्हणून प्रवीण राऊत आदींच्या निवडी करण्यात आला. नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान महाराष्ट्र राज्य पुणे विभागीय अधिस्वीकृत समितीचे अध्यक्ष व जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे तसेच शहर पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. मान्यवरांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी सातारा तालुक्यातील विविध दैनिक व साप्ताहिकचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची (दिशा) बैठक सोलापूर येथे समितीचे अध्यक्ष खा.प्रणिती शिंदे व सह अध्यक्ष खासदार मा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलीयाप्रसंगी केंद्र सरकारच्या प्रमुख योजनांचा आढावा घेत विविध विषयांवर विस्तृत चर्चा करण्यात आली तसेच प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले.यावेळी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, प्रधानमंत्री फसल बीमा योजना, राष्ट्रीय पेयजल योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, प्रधानमंत्री आवास योजना (मिशन), स्वच्छ भारत मिशन(शहर), जलजीवन मिशन, एकात्मिक बाल विकास योजना, सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय स्वास्थ मिशन व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या सर्व योजनांच्या कामांचा सविस्तर आढावा घेत सोलापूर जिल्ह्यात केंद्र सरकारच्या सदरील योजना मोठ्या प्रमाणात राबवण्यासंदर्भात अधिकारी वर्गाला निर्देश दिले.तसेच या बैठकीतून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ,स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास मोठ्या प्रमाणात कसा होईल याबाबत सखोल चर्चा केली.यावेळेस विशेष निमंत्रित खा.ओमराजे निंबाळकर, आमदार राजू खरे,आ.अभिजीत पाटील,आ.डाॅ.बाबासाहेब देशमुख,आ.नारायण पाटील,सोलापूर जिल्हाधिकारी,सोलापूर मनपा आयुक्त,जि.पा. मुख्याकार्यकारी अधिकारी,इतर सर्व विभागाचे अधिकारी मान्यवर उपस्थित होते.
सातारा दि२५ : लोकनेते अण्णा हजारे यांनी सामान्य माणसांना प्रशासकीय कारभाराची माहिती व्हावी. यासाठी माहितीचा अधिकार आणला. परंतु ,सातारा जिल्ह्यात माहितीच्या अधिकाराचा काटेकोरपणाने वापर करण्याऐवजी खोटी माहिती व शुल्क भरल्याचे कारण सांगून माहिती दडवली जात आहे. या विरोधात साताऱ्यातील पंताचा गोठ येथील जागरूक नागरिक महेश अशोक शिवदास यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे आंदोलकांना आंदोलनापासून परावृत्त करण्यासाठी पोलीस व जिल्हा प्रशासनाची धावपळ सुरू झालेली आहे. याबाबत माहिती अशी की ,सातारा प्रादेशिक परिवहन अधिकारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व कार्यालयीन कर्मचारी यांनी वाहन मालक वाहन खरेदी घेणार व एजंट यांच्याशी संगणमत केल्याचा आरोप करून दिनांक २३ जानेवारी पासून श्री महेश शिवदास हे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमर उपोषणाला बसलेले आहेत. पोलीस मुख्यालय सातारा शहर पोलीस ठाणे सातारा जिल्हा अधिकारी कार्यालय प्रादेशिक परिवहन कार्यालय यांना निवेदन दिलेले आहे. यामध्ये माहिती अधिकाराचा अधिनियम २००५ अंतर्गत येणाऱ्या बाबी स्पष्ट केलेले आहेत. त्यानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालय सातारा क्लब समोर सदर बाजार कॅम्प सातारा यांनी जावक क्रमांक/ १४० दिनांक ८ नोव्हेंबर २०२४ प्रमाणे आपण मागितलेल्या माहितीच्या आधारे अपील क्रमांक१४ नुसार जुलै २०२४ ते आज अखेरपर्यंत ४३५९ इतक्या वाहनांच्या तपशिलाची माहिती प्रत्येक वाहनने प्रति वाहने वहीत शासकीय शुल्क रुपये ५० प्रमाणे भरणा केल्यानंतर आपल्याला माहिती देण्यात येईल असे जन माहिती आपली अधिकारी तथा सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी महेश शिवदास यांना लेखी कळविले आहे. सदरचे पत्र दहा दिवसाच्या आत देणे बंधनकारक असताना सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक नुसार ते उशिरा देण्यात आले. असाही गंभीर आरोप श्री शिवदास यांनी केलेला आहे . त्यामुळे त्यांनी विलंबाने पत्र मिळाल्यामुळे शुल्क भरण्यास नकार दिलेला आहे. वास्तविक पाहता माहितीच्या अधिकारात पारदर्शक कारभार असल्यामुळे कोणतीही माहिती देण्यामुळे कोणतीही अडचण निर्माण होत नाही. उलट माहिती देऊन सत्य माहिती जनतेसमोर आणण्यासाठी संधी होती. ही संधी असूनही त्याबाबत कार्यवाही झालेली नाही. असाही आरोप करण्यात येत आहे. माहितीचा अधिकाराचा वापर करून शासकीय भ्रष्टाचार कमी करण्यासाठी सातारा जिल्ह्यात अनेक सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकाराचे समर्थक काम करत असतात. परंतु ,काही सराईत दलालांना हाताशी घेऊन अशा माहिती अधिकाऱ्याच्या वापर करणाऱ्या कार्यकर्त्याला बदनाम करण्यासाठी एक सक्रिय टोळी निर्माण झालेली आहे. या टोळीच्या माध्यमातून अधिकाऱ्यांकडून दिवाळी व इतर दिवशी लाभाच्या रूपाने हित साधले जाते. असाही गंभीर आरोप करण्यात आलेला आहे. दरम्यान, सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिनी दिनांक २६ जानेवारी रोजी दरवर्षी सातत्याने अनेक आंदोलन आत्मदहनाचा इशारा देतात. त्यामुळे पोलीस व जिल्हा प्रशासनाला नाहक त्रास सहन करावा लागतो. ज्यांच्यावर खरोखरच अन्याय झाला असेल तर त्यांना लोकशाहीमध्ये न्याय मिळणे गरजेचे आहे परंतु काही ठराविक हेतूने आंदोलनाचे नाटक करतात त्यांची चौकशी केल्यानंतर अनेक गमतीदार गोष्टी बाहेर येतील. परंतु प्रामाणिक व सत्य बाजू असून सुद्धा त्यांना वेळेत न्याय मिळत नाही. मात्र अन्याय सहन करावा लागतो. हे सुद्धा यामुळे जनतेमध्ये चर्चा सुरू झालेली आहे. या आंदोलनाकडे प्रसार माध्यमांनी लक्ष वेधून घेतल्यामुळे प्रसारमाध्यमालाही आंदोलकांनी धन्यवाद दिले आहेत.
_______________
फोटो सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनासाठी बसलेले महेश शिवदास
गोंदवले – : माण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिवडी नं. १ व ३ या शाळेने यशवंतराव चव्हाण विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धेतर्गत आयोजित शाहिरी पोवाडा स्पर्धेत लहान गटात जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून सलग दुसऱ्या वर्षी आपली प्रतिभा सिद्ध केली आहे. या विशेष यशामुळे १९ फेब्रुवारी रोजी किल्ले प्रतापगड येथे होणाऱ्या शासकीय शिवजयंती कार्यक्रम प्रसंगी या शाळेला पोवाडा सादरीकरण करण्याची संधी मिळाली आहे. त्याच दिवशी या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. या यशस्वी सादरीकरणात मुख्य शाहीर अर्णव जाधव तर कोरस साठी साहिल दडस, यशवर्धन निकाळजे, मोहसीन शेख, वाहिद मुल्ला, काव्यांजली देशमाने, स्वरा साठे, कीर्ती भिंगारे या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. या विद्यार्थ्यांच्या या यशासाठी एक नंबर शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता यादव, केशर माने, मनीषा बोराटे, रश्मी फासे व सागर जाधव तर तीन नंबर शाळेचे मुख्याध्यापक महादेव महानवर, रेखा मोहिते, मिनाक्षी दळवी, माया तंतरपाळे, नम्रता चव्हाण, दराडे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सौरभ माने, विशाल इंगळे, अमर ननावरे यांनी संगीत साथ दिली. या शाळेच्या या यशावर गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे, गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, विस्तार अधिकारी रमेश गंबरे, नंदकुमार दंडिले, केंद्रप्रमुख वर्षा गायकवाड, व्यवस्थापन समिती अध्यक्ष सनी साठे व सदस्य आदि पालक व दहिवडी ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
छाया – पोवाडा स्पर्धैतील यशस्वी विद्यार्थी. ( विजय ढालपे)
▪️ शनिवार दि. २५पासून अखंड हरिनाम सप्ताह तर मंगळवार दि. १ फेब्रुवारी रोजी रथोत्सव
वडूज. प्रतिनिधी -विनोद लोहार दि. ४ वडूज येथे सालाबाद प्रमाणे श्री सिद्धिविनायक मंदीर परिसरात समस्त ग्रामस्थ व सार्वजनिक मंडळाच्या वतीने शनिवार दि. २५ जानेवारी ते शनिवार दि. १ फेबुवारी पर्यत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ४२ व्या वर्षातील या सप्ताहामध्ये दररोज पहाटे ५ ते ६ .३० यावेळेत काकड आरती, सकाळी ८.१५ ते १२.३० यावेळेत ज्ञानेश्वरी सामुदायीक वाचन, दुपारी १ ते २ यावेळेत शहरातील भजनी मंडळांची भजने, सायंकाळी ४. १५ ते ५.३० यावेळेत हरिपाठ, सायंकाळी ६ ते ७.३० यावेळेत प्रवचन, रात्री ९ ते ११ यावेळेत किर्तन, रात्री १२ते ४ या यावेळेत जागर होईल. ज्ञानेश्वरी पारायणाचे व्यासपीठ ह. भ. प. शाम महाराज आळंदीकर हे सांभाळणार आहेत. पारायणाची सांगता शनिवार दि. १ फेब्रुवारी रोजी गणेश जयंती दिवशी होणार असून त्यानिमित्त सकाळी ७ ते ९ यावेळेत श्री ज्ञानेश्वरी सांगता होणार आहे. सकाळी ९.३० ते ११ यावेळेत काल्याचे किर्तन व दहीहंडी श्री. ह.भ प. विजय महाराज शिंदे, लोणीकर , सकाळी ११ ते १२.३० यावेळेत श्री गणेश जन्माचे किर्तन (ह.भ.प. विलास गरवारे ) सिध्देश्वर कुरोली यांचे त्यानंतर दुपारी रथातून श्रीं ची व ज्ञानेश्वर माऊलींची भव्य मिरवणूक व दिंडी सोहळा होणार आहे. दुपारी २ नंतर कै. पोपटराव दतात्रेय गाडवे व कै . जयश्री पोपटराव गाडवे यांच्या स्मरणार्थ श्री . किरण पोपटराव गाडवे , श्री उमेश पोपटराव गाडवे , श्री . रविंद्र पोपटराव गाडवे व गाडवे परिवार यांचे तर्फे सर्व भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. दरम्यान शनिवार दि. २५ रोजी ह.भ.प. सौ इंद्रायणी जवळ मस्के, पंढरपूर यांचे प्रवचन सौजन्य कै. किसन शंकर शेटे यांचे स्मरणार्थ प्रशांत किसनराव शेटे यांचे तर्फे तर किर्तन ह.भ.प श्री. अशोक महाराज शिंदे गुरसाळे ( नातेपुते ) , सौजन्य कै. व्ही.जे. गोडसे ( सर ) व कै. रुक्मीणी विठ्ठल गोडसे ( आक्का ) यांचे स्मरणार्थ नंदकुमार विठ्ठल गोडसे ( भैय्या ) यांचे तर्फे तर जागर श्री. ब्रह्मचैतन्य भजनी मंडळ बोंबाळे . रविवार दि. २६ रोजी ह.भ.प . डॉ. प्रा. श्री उदय रामचंद्र जाधव , फलटण यांचे प्रवचन सौजन्य कै. सुरेश सदाशिव राऊत यांचे स्मरणार्थ श्री. मनोज सुरेश राऊत व श्री. संतोष सुरेश राऊत यांचे तर्फे तर ह.भ. प. सौ. भारतीताई दिवाणे धाराशिव यांचे किर्तन सौजन्य कै. रामचंद्र विष्णु गोडसे व कै. सुमन रामचंद्र गोडसे यांचे स्मरणार्थ श्री. पोपट विष्णू गोडसे व श्री. विलास रामचंद्र गोडसे यांचे तर्फे तर श्री हनुमान भजनी मंडळ पेडगाव यांचा जागर होईल. सोमवार दि. २७ रोजी ह.भ.प. सौ. दिपाली किरण लोखंडे’ , पुसेसावळी यांचे प्रवचन सौजन्य कै. संपतराव सावळाराम काळे ( पाटील ) यांचे स्मरणार्थ श्री. धनंजय संपतराव काळे ( पाटील ) यांचे तर्फे तर ह.भ.प. श्री . सागर महाराज पवार , माहुली यांचे किर्तन सौजन्य कै. अनुसया नाना पवार यांचे स्मरणार्थ श्री. राजेंद्र पवार सर व श्री. धनजंय पवार यांचे तर्फे , तर श्री वाकेश्वर भजनी मंडळाचा जागर होईल. मंगळवार दि. २८ रोजी ह.भ. प. सौं . डॉ. सुप्रिया सांळुखे – कदम आटपाडी यांचे प्रवचन सौजन्य कै. शिवराम रामचंद्र माळी यांचे स्मरणार्थ महादेव व किरण शिवराम माळी यांचे तर्फे तर ह.भ.प . श्री. शामसुंदर महाराज ढवळे , दौंड यांचे किर्तन सौजन्य श्री . रामचंद्र पंढरीनाथ कुंभार , श्री . मनोज रामचंद्र कुंभार उपनगराध्यक्ष – नगरपंचायत वडूज यांचे तर्फे ,श्रीदत्त कृपा भजनी मंडळ नागाचे कुमठे यांचा जागर होईल. बुधवार दि . २९ रोजी ह.भ. प. श्रीधर सांळुखे , सातारा यांचे प्रवचन सौजन्य कै. अशोक ज्ञानेश्वर माळी यांचे स्मरणार्थ श्री . सावता व सचिन अशोक माळी यांचे तर्फे तर किर्तन ह.भ. प. श्री . धर्मराज महाराज हांडे , पुणे सौजन्य श्री. संतोष जयसिंग वडूज ( पोष्टमन ) यांचे तर्फे तर श्री. दत भजनी मंडळ वडूज यांचा जागर होईल. गुरुवार दि. ३० रोजी ह.भ. प. समाज भूषण श्री . पांडूरंग लोहार सर , कलेढोण यांचे प्रवचन सौजन्य श्री. मोहन सुदाम गोडसे ( माऊली अॅटो गॅरेज ) यांचे तर्फे तर ह.भ. प. श्री . अमोल महाराज सुळ ( नातेपुते ) यांचे किर्तन, सौजन्य श्री . अनिल पंढरीनाथ गोडसे मा. सरपंच ( चे. श्रीराम संस्था वडूज ) , प्रताप मानसिंग गोडसे चेऊरून ख. वि.स , संचालक वि.का. सेवा सोसायटी यांचे तर्फे तर श्री माऊली भजनी मंडळ, वडूज यांचा जागर होईल. शुक्रवार दि. ३१ रोजी ह.भ.प. सौ. पुष्पाताई कदम (फलटण ) यांचे प्रवचन सौजन्य कै. तुकाराम नामदेव माळी यांचे स्मरणार्थ श्री. सचिन तुकाराम माळी व श्री . नितीन तुकाराम माळी यांचे तर्फे तर ह.भ.प मोहन काका घोटीकर रा . घोटी यांचे किर्तन सौजन्य कै. किशोर शंकर तोडक यांचे स्मरणार्थ श्री. कुंदन व केदार किशोर तोडकर यांचे तर्फे तर श्री हनुमान भजनी मंडळ नायकाचीवाडी यांचा जागर होईल. तसेच मृदंगाचार्य ह.भ.प. संगम महाराज , पवारवाडी व ह.भ.प. केदार महाराज , माजगावकर , गायनाचार्य ह.भ.प. प्रथमेश गुजर , सांगोला व ह.भ.प. निखील डांगे विहापूर , विणेकरी ह.भ.प. धोंडीराम चव्हाण , शेनवडी ,ह.भ.प. नाना मारुती बुधावले , आटपाडी , ह.भ.प. लक्ष्मण कोंडीबा बुधावले आटपाडी व ह.भ.प. सोमनाथ महाराज , सातेवाडी तसेच चोपदार ह.भ.प. सोपान विठ्ठल जाधव नढवळकर तसेच काकड आरती , हरिपाठ , किर्तन साथ – ज्ञानमंत्र वारकरी शिक्षण संस्था , विहापूर ता. कडेगाव यांची साथ राहील .सोहळ्यासाठी मंडप व लाईट व्यवस्था किरण मंडपचे बाळासाहेब गोडसे यांचे वतीने करण्यात आली आहे
शनिवार दि. १ फेब्रवारी रोजी श्रीगणेश जयंती सोहळ्यानिमित्त सकाळी ७ ते ९ श्री ज्ञानेश्वरी सांगता, काल्याचे किर्तन व दहिहंडी सकाळी ९.३० ते ११ तर ११ ते १२.३० च्या दरम्यान श्रीगणेश जन्माचे किर्तन होईल नंतर दुपारी श्री व ज्ञानेश्वरांची रथातून भव्य मिरवणूक व दिंडी सोहळा पार पडणार आहे. दुपारी दोन नंतर महाप्रसाद वाटप केले जाणार आहे .तरी वडूज पंचक्रोशील व तालुक्यातील भावीकांनी व गणेशभक्तांनी या मिरवणूक व दिंडी सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन वडूज ग्रामस्थ व सार्वजनिक मंडळांनी केले आहे.