Advertisement

अक्कलकोट पोलीस निरीक्षक निरिक्षक राजेंद्र टाकणे यांच्या टीम ची कामगिरी, चोरीच्या आठ मोटार सायकली जप्त…

सोलापूर वृत्तसेवा


याबाबत मिळालेली माहिती अशी की, समर्थ कामाठी (वय २५ रा. अक्कलकोट) यांनी दि. ११ जानेवारी रोजी अक्कलकोट येथील फतेसिंह मैदानाचे मेन गेट समोर लावलेली मोटारसायकल चोरीस गेल्याने अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणेस अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल होता. त्यानंतर १६ जानेवारी २०२५ रोजी फतेसिंह मैदानाचे मेनगेट समोरून दुसरी मोटारसायकल चोरीस गेल्याने सदरबाबत रमेश ममाणे यांनी फिर्याद दिली होती.
पोलीस अधिक्षक,पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांच्या आदेशाने पोलिस निरिक्षक राजेंद्र टाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलिस उपनिरीक्षक पवार व डी. बी. पथकातील अंमलदारांना यांनी वरील दोन्ही गुन्ह्यातील मोटार सायकल चोराचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणला. डी. बी. पथकातील पोलिस उपनिरीक्षक पाडुरंग पवार, पोहेको महादेव चिंचोळकर, गणेश अंगुले, प्रमोद शिंपाळे, शिवलिंग स्वामी, श्रीकांत जवळगे, केदार सुतार यांनी केली.
..

अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे कडून सराईत दुचाकी चोरांकडून आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या. संशयित आरोपीनी गुन्ह्यात वापरलेल्या मोटारसायकल क्रमांकावरुन आरोपीचा शोध घेऊन दोन आरोपीना अटक करुन त्यांचे ताब्यातून एकूण ८ दुचाकी जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांनी दिली. याप्रकरणी आरोपी सिद्धाराम ज्योते, लक्ष्मण माने (दोघे रा. गौडगाव, ता. अक्कलकोट) यांना ताब्यात घेतले आहे.

प्रवाशी थांब्यावर , एस टी ढाब्यावर..

अनाधिकृत बस थांबा, अधिकृत बस थांब्यावर प्रवाशांच्या रांगा ‌
म्हसवड दि. २३
सातारा व सोलापुर जिल्ह्यातील सर्वच आगाराच्या एस.टी. बसेस ह्या अधिकृत असलेल्या बसथांब्यावर न थांबता केवळ वाहक व चालकास फुकट जेवन, चहा, नाष्टा मिळत असल्याने अनाधिकृत असलेल्या खाजगी थाब्यावर थांबत असल्याने प्रवाशांची गैरसोय करीत असुन या अनाधिकृत ठिकाणी प्रवाशांची आर्थिक लुटही होत आहे, तर अधिकृत बस थांब्यावर एस.टी. ची वाट पहाणार्या प्रवाशांच्या रांगा लागत अयल्याचे चित्र असल्याने प्रवाशांची गैरसोय करुन त्यांना तिष्ठीत ठेवणार्या चालक – वाहकांवर सातारा व सोलापुर च्या विभाग नियंत्रकांनी कारवाई करावी अशी मागणी प्रवासी वर्गातुन होत आहे.
सातार्याहुन सोलापुरकडे व सोलापुरहुन सातार्याकडे दररोज शेकडो एस.टी. बसेस धावत आहेत यामध़्ये सातारा , कोरेगांव, वाई, पाटण आगाराच्या तर सोलापुर, पंढरपुर, बार्शी आगाराच्या एस.टी. बसेसचा समावेश आहे. सर्वच बसेस चे अधिकृत थांबे हे ठरलेले आहेत, असे असताना या एस.टी. बसेसचे चालक, वाहक हे अधिकृत बसथांब्यावर एस.टी. न थांबवता केवळ धाबाचालक हा आपल्याला फुकट जेवन, चहा, नाष्टा, पाणी देत असल्याने अनाधिकृत थांब्यावर एस.टी. थांबवत आहेत, त्याठिकाणी जवळपास ४० ते ४५ मिनीटे बस थांबवली जात असल्याने प्रवाशांना नाहक तिष्टीत थांबावे लागत आहे. म्हसवड पासुन जर एखाद्या प्रवाशाला पिलीव अथवा पंढरपुरला जायचे असेल अथवा पंढरपुर मधुन म्हसवडला यायचे असेल तर म्हसवड ते पिलीव या दरम्यान असलेल्या एका खाजगी धाब्यावरच या बसेस थांबवल्या जात असल्याने विनाकारण याठिकाणी प्रवासीवर्गाचा वेळ वाया जात आहे. म्हसवड ते पिलीव या दरम्यान असलेल्या एका खाजगी धाब्यावर या गाड्या थांबत असुन याठिकाणी महिला व पुरुषांसाठी कोणतीही सुविधा नाही किमान स्वच्छता गृह नाही त्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होत आहे, हा अधिकृत बस थांबा नसताना तुम्ही याठिकाणी एस.टी. का थांबवली असे जर एखाद्या प्रवाशाने चालक, वाहकास विचारल्यास त्यास बसायचे असेल तर बसा नाहीतर चालत जावा अशी उध्दट उत्तरे त्यांच्याकडुन दिली जात आहेत. याठिकाणी चालक वाहकास सर्वकाही फुकट दिले जात आहे तर याचठिकाणी जर प्रवासी काही खाण्यासाठी गेले तर मात्र त्यांच्याकडुन अवाच्या सवा रक्कम उकळली जात असल्याचा आरोप प्रवासी वर्गातुन‌ होत आहे. त्यामुळे प्रवाशांची आर्थिक पिळवणुक याठिकाणी होत असल्याने प्रवासी एस.टी. चा प्रवास टाळु लागल्याची वस्तुस्थिती आहे, तर म्हसवड हुन पंढरपुरला जाणारे अनेक प्रवासी आता आपला वेळ व पैसा वाचवण्यासाठी खाजगी गाड्यांचा आधार घेवु लागल्याचे चित्र आहे. बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे बिरुद घेवुन धावणार्या एस.टी. कडे केवळ चालक, वाहकाच्या मनमानी कारभारामुळे हरताल फैसला जावु लागली असुन सातारा व सोलापुर च्या एस.टी. विभाग नियंत्रकांनी याठिकाणी लक्ष घालुन अनाधिकृत बस थांब्यावर एस.टी. कशी थांबेल यासाठी प्रयत्न करुन एस.टी. पासुन दुर होत चाललेल्या प्रवासी वर्गास दिलासा द्यावा अन्यथा एक दिवस या मार्गावरुन एस.टी. बसेस रिकाम्याच धावताना दिसतील एवढे मात्र नक्की.

फोटो –

ज्ञान घेऊन समाजासाठी उपयोग करा- कमलाकर भोसले

प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालयात निरोप, कॉलेज डे साजरा

मुरूम ता.२२, येथील प्रतिभा निकेतन उच्च माध्यमिक विद्यालयात दि.२२ वार बुधवार रोजी १२ वी विद्यार्थ्यांना निरोप व कॉलेज डे साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना कमलाकर भोसले म्हणाले विद्यार्थ्यांनी ज्ञान घेऊन समाजासाठी उपयोग करावा असे प्रतिपादन केले. उमरगा तालुक्यातील प्रतिभा निकेतन उच्च माध्यमिक विद्यालय मुरूम येथील 12 वी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्राचार्य, उपप्राचार्य,पर्यवेक्षक,प्राध्यापक पदभार स्वीकारत दिवसभर शालेय प्रशासनह सांभाळले.उमरगा तालुक्यातील प्रतिभा निकेतन उच्च माध्यमिक विद्यालय मुरूम येथील बारावीच्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन बुधवार (दि.२२) उत्साहात साजरा झाला. स्वयंशासन दिनाचे एक दिवशीय प्राचार्य म्हणून अपर्णा मनाळे तर उपप्राचार्य म्हणून लक्ष्मी मेनसे आणि भक्ती गायकवाड व निकिता वाकळे हिने पर्यवेक्षक कामकाज सांभाळले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य करबाप्पा ब्याळे, प्रमुख अतिथी कमलाकर भोसले,प्रमुख उपस्थिती उपमुख्याध्यापक उल्हास घुरघुरे, ज्येष्ठ प्रा.संजय गिरी,प्रा.उमाकांत महामुनी आदींची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख पाहुणे यांचे मनोगत व्यक्त करताना भोसले पुढे म्हणाले मानव बनण्याचे सामर्थ्य आपल्या मध्ये निर्माण झाले पाहिजे जो मुलगा आपल्या आई – वडिलांना पालक व शेपू समजतो त्याचा कडीपत्ता झाल्याशिवाय राहत नाही. मी कोण आहे याचे आपल्याला माहीत असले पाहिले.आपण काय करणार आहोत हे आपल्या लक्षात घेता आले पाहिजे.चागला माणूस बना व या शाळेचे नाव लवकिक करा असे मनोगत व्यक्त केले. या स्वयंशासन दिनानिमित्त 12 वीच्या विद्यार्थी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी दिलेले विषयावर वेळापत्रकानुसार प्रभावी अध्ययन केले. वर्गात असणाऱ्या विद्यार्थ्यांनीही केलेल्या अध्यापनाबाबत आनंद व्यक्त केला. दुपारच्या सत्रात स्वयंशासन दिनाची सांगता प्राचार्य करबाप्पा ब्याळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी एक दिवसीय प्राचार्य अपर्णा मनाळे, उपप्राचार्य लक्ष्मी मेनसे, विद्यार्थीनी बोळशेट्टे आदींनी मनोगत व्यक्त केले. उत्कृष्ट अध्यापन करणाऱ्या एक दिवशीय शिक्षकांचा प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढून व तसेच विविध खेळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी प्रा. पटवारी शोभा,महामुनी उमाकांत प्रा. शाळु राजीव,प्रा. कांबळे आण्णाराव,प्रा.नारायण सोलंकर,प्रा अजित सूर्यवंशी, प्रा.राठोड दयानंद, प्रा.धर्माधिकारी राघवेंद्र,प्रा.अंबर विश्वजीत,प्रा दीपक सांगळे,प्रा.गायकवाड अमोल, प्रा.वाकडे रत्नदीप,जमादार सलीम,राठोड अजित, कु.उण्णद रेखा,सगशेट्टी महेश,कु.महामुनी साक्षी,फिरोज कागदी,अप्पासाहेब कोळी आदीनी यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.
प्रणिता सगर,सृष्टी व्हणाजे हिने सूत्रसंचालन केले तर श्वेता व्हणाजे हिने आभार मानले.

error: Content is protected !!