Advertisement

नारायण चिंचोली येथील सूर्यनारायण देव यात्रा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा


पंढरपूर प्रतिनिधी-पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथे ग्रामदैवत सूर्यनारायण देवाची यात्रा मोठ्या उत्साहात सुरू असून ही यात्रा पौष महिन्यातील महिनाभर चालते विशेषतःपौष महिन्यामधील रविवारी या यात्रेस अधिक महत्त्व असते दर रविवारी पंढरपूर तालुक्यासह जिल्ह्यातील हजारो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. नारायण चिंचोली येथे सूर्यनारायण देवाचे अतिप्राचीन मंदिर असून हे मंदिर पुरातन हेमाडपंती आहे स्थापत्य रचनेतील हा अद्भुत कलेचा नमुना आहे .
कोणार्क नंतर देशातील एकमेव असे महाराष्ट्रातील पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथे सूर्यनारायण देवाचे मंदिर असून विशेषतः पौष महिन्यातील तिसऱ्या रविवारी देवाचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होतो 19 जानेवारी हा पालखी सोहळा मोठ्या भक्ती भावाने हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. या यात्रा काळात दर रविवारी सूर्यनारायण देव ट्रस्ट व ग्रामस्थ व महाप्रसाद अन्नदाते यांच्या वतीने भाविकांना महाप्रसादाचे आयोजन केले जाते . तसेच पालखी सोहळा पार पडण्यासाठी सूर्यनारायण देव ट्रस्ट व संचालक मंडळ, नारायण चिंचोली ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य, विविध सामाजिक संघटनाचे पदाधिकारी तरुण वर्ग ग्रामस्थ हा पालखी सोहळा पार पडण्यासाठी त्यांचे मोलाचे सहकार्य लाभते . पालखी सोहळ्याला मोठी गर्दी असल्याने पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी पोलीस निरीक्षक टीवाय मुजावर यांचा सूर्यनारायण देव ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला

शोषित, पिडीतांचा प्रतिनिधी म्हणुन पत्रकाराची ओळख – प्रा. शेटे

म्हसवड दि. २०
सर्वसामान्य जनतेवर होणार्या अन्यायाला वाचा फोडणारा पत्रकार हा समाजाचा व पिडीत, शोषीतांचा प्रतिनिधी म्हणुन काम करीत असतो असे मत म्हसवड येथील सरस्वती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका उमा शेटे यांनी व्यक्त केले.
पत्रकार दिनानिमीत्त येथील सरस्वती विद्यालयात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात त्या बोलत होत्या यावेळी नर्मदा चँरिटेबल ट्रस्टचे प्रमुख हिरालाल शेटे, संस्थेचे उपाध्यक्ष अनिकेत शेटे, म्हसवड प्रेस क्लब चे अध्यक्ष महेश कांबळे, उपाध्यक्ष सचिन सरतापे, जेष्ठ पत्रकार विजय टाकणे, शहाजी लोखंडे आदी प्रमुख उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा. शेटे म्हणाल्या की सदरचे विद्यालय सुरु करताना म्हसवड च्या पत्रकारांची आम्हाला चांगली साथ मिळाल्यानेच आज ज्ञानाचे हे रोपटे याठिकाणी रुजु लागले आहे. विद्यालयाच्या शिक्षकांवर व प्रशासनावर सर्वांनी विश्वास दाखवल्यानेच आज हे शिक्षणाचे रोपटे हळुहळु आकार घेवु लागले आहे. गत ५ वर्षापासुन या विद्यालयाने इ.१० वी व १२ च्या १०० टक्के निकाला ची नवीन परंपरा सुरु केली असुन यंदा ही परंपरा कायम राखण्यात आमच्या विद्यालयाला यश मिळेल असा विश्वास ही यावेळी सौ. शेटे यांनी व्यक्त केला.
ज्ञानदानाचे काम विद्यालयात चालते विद्यालयात विद्यार्थी घडवण्याचे काम चालते तर समाज घडवण्याचे काम हे नेहमीच पत्रकार करीत आले असल्यानेच समाजात पत्रकाराचे अढळ स्थान आहे, समाजासाठी नेहमीच झटणार्या पत्रकारांचाही सन्मान व्हावा यासाठी आमच्या विद्यालयाने केलेला हो छोटा सा प्रयत्न असल्याचे विचार विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष हिरालाल शेटे यांनी व्यक्त केले.
यावेळी म्हसवड प्रेस क्लब चे अध्यक्ष महेश कांबळे बोलताना म्हणाले की आज सरस्वती विद्यालय हे जरी छोट्याशा जागेत भरत असले तरी येथील शिक्षणाची गुणवत्ता सर्वोत्तम असल्यानेच १०० टक्के निकालाची परंपरा येथे सुरु आहे. शैक्षणीक गुणवत्तेच्या जोरावर भविष्यात या विद्यालयाचे विशाल वटवृक्षात निश्चित रुपांतर होईल असा विश्वास यावेळी पत्रकार कांबळे यांनी व्यक्त केला.
जेष्ठ पत्रकार विजय टाकणे म्हणाले की विद्यालयाचे संस्थापक व मुख्याध्यापिका यांनी हे विद्यालय सुरु करण्यासाठी खुप मेहनत व संघर्ष केला असुन मोठ्या संघर्षातुन उभारलेले हे विद्यालय निश्चीतच भविष्यात वटवृक्षाप्रमाणे विशाल होईल यात शंका नाही. उपाध्याय सचिन सरतापे यांनी सुरुवातीच्या काळात सदर विद्यालयाला आपण ही मदत केल्याचे सांगत यापुढेही मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी विद्यालयाच्या वतीने म्हसवड प्रेस क्लब च्या नुतन पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्तावित हिरालाल शेटे यांनी केले तर आभार कोर्हे मँडम यांनी मानले.

फोटो –

पंढरपूर पोलीसांची दमदार कामगिरी,११ लाखांचा मुद्देमाल जप्त.

चाकूचा धाक दाखवून मोबाईल आणि पिकप गाडी चोरणाऱ्या तीन आरोपींना पंढरपूर तालुका पोलिसांकडून अटक आरोपीकडून एकूण 11 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

पंढरपूर – पत्रकार रामेश्वर कोरे

पंढरपूर तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 45 /2025 बी एन एस कलम 309(6) या रॉबरीच्या गुन्ह्यात तीन आरोपींनी मध्य प्रदेश पासिंगची पिकप गाडी क्रमांक एमपी 09S3010 या गाडीच्या चालकाला चाकूचा धाक दाखवून चालकाला लतामुख्याने मारहाण करून पिकप गाडी जबरदस्तीने चोरून पिकप गाडी घेऊन पळून गेले होते सदर गुन्ह्यामध्ये आरोपीच्या वर्णनावरून एकूण तीन आरोपी ताब्यात घेण्यात आलेले असून त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे आरोपींची नावे 1गोविंद लिंबा पवार वय 23 वर्ष राहणार अंकोली तालुका मोहोळ 2निबालअहमद शेख वय 21 वर्ष राहणार चिंचोली तालुका पंढरपूर 3 संच्या मिटकरी वय 32 राहणार आंबे चिंचोली तालुका पंढरपूर असे तीन आरोपी ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून फिर्यादीचे दोन मोबाईल फोन एक पिकप गाडी त्याचा क्रमांक मप09 S3010 असा एकूण किंमत रुपये 11 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त करून आरोपींना अटक केलेली आहे सदर गुन्हा घडले पासून काही तासात आरोपींना अटक करून गुन्हा उघडकीस आणण्याची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर साहेब माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अर्जुन भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री तय्यब मुजावर पीएसआय श्री भोसले साहेब पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन माळी पोलीस हेडकॉन्स्टेबल विनायक क्षीरसागर ए एस आय तोंडले पोलीस हेडकॉन्स्टेबल रोकडे पोलीस कॉन्स्टेबल सागर गवळी पोलीस कॉन्स्टेबल आवटी यांच्या पथकाने केली आहे

सौ. शुभांगीताई (राधामाई)‌ मनमाडकर ६१ वा अभिष्टचिंतन सोहळा ,२२ रोजी सांस्कृतिक कार्यक्रम

पंढरीच्या संगीत विशारद व सामाजिक धार्मिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सौ. शुभांगीताई (राधामाई)‌ मनमाडकर ६१ वा अभिष्टचिंतन सोहळाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन!

पंढरपूर – प्रतिनिधी – पंढरपुरा शहरांतील संगीत क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान असणारे व संगीत विशारद या पदाचे मानकरी असणाऱ्या व तसेच संस्कार भारती या संस्थेच्या माध्यमातून सांस्कृतिक धार्मिक सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सौ शुभांगीताई (राधामाई) मनमाडकर ६१ अभिष्टचिंतन सोहळ्याच्या औचित्य साधून पंढरपूर शहरामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे केल्याची माहिती पंढरपूर शहरातीधील मंडप कॉन्ट्रॅक्टर लाईट डेकोरेशन साऊंड साऊंड सिस्टिमचे सुप्रसिद्ध आरती मंडप कॉन्टॅक्टर चे सर्वेसर्वा श्री भगवान‌भाऊ नारायणराव मनमाडकर यांनी दिली. सदर ६१ अभिष्टचिंतन सोहळा सौ कल्याणी नामजोशी पुणे व ह भ प श्री संत डॉ. जयवंत महाराज बोधले पंढरपूर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार असून या कार्यक्रमाच्या निमित्ताने इंडियन आयडॉल विजेती कुमारी ज्ञानेश्वरी गाडगे मुंबई हिचा चोर ज्ञानेश्वरी भक्ती अभंग नाट्यसंगीत आधी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले असून सदर कार्यक्रम वैकुंठवासी डॉ. दादा महाराज मनमाडकर नगर पंढरपूर या ठिकाणी बुधवार दिनांक २२ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ४ वाजता संपन्न होणार असून सदर कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आव्हान भगवान भाऊ मनमाडकर यांनी केले असून कार्यक्रमानंतर सर्वांसाठी स्नेह भोजनाची व्यवस्था सायंकाळी ७ वाजल्यापासून केले असून. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनमाडकर परिवारातील आरती मनमाडकर पल्लवी मनमाडकर चि. समय मनमाडकर सर्वश्री निरंजन महाराज मनमाडकर धनंजय मनमाडकर व कु. निष्ठा मनमाडकर आदीसह सर्व कर्मचारी बंधू परिश्रम घेत आहेत

औंध मुस्लिम समाजाच्यावतीने अजितदादांना विकासकामांचे निवेदन

औंध प्रतिनिधी – ओंकार इंगळे

औंध :महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना औंध येथील मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने भेटून विविध विकास कामाचे निवेदन दिले.यावेळी मुस्लिम समाज अध्यक्ष आयुब खान,उपाध्यक्ष मुराद मुलानी, शाकीर आतार, अब्बास आतार , इलियाज पटवेकरी, गुलाब भाई भालदार, राजे खान शिकलगार, मुन्ना मोदी, आदी उपस्थित होते. शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारल्यानंतर अजितदादांनी विकास कामाची काही चिंता करू नका आपल्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन शिष्टमंडळातील सदस्यांना दिले.

लोकशाही वाचवण्यासाठी महाराष्ट्राला दलित पँथरशिवाय दुसरा पर्याय नाही

शासनाने सोमनाथ सुर्यवंशी, लोकनेते विजयराव वाकोडो,संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपये आणि कुटुंबातील १सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी – महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. घनःश्याम भोसले

सोलापूर,दि. १६ :- दलित पँथरचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या ११व्या स्मृतीदिनानिमित्त सोलापूर येथे अभिवादन सभा आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी, संतोष देशमुख, लोकनेते विजयराव वाकोडे यांना दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
परभणी येथे संविधानाची विटंबना झाल्यावर कोंबिग ऑपरेशनमध्ये अटक केलेल्या सोमनाथ सुर्यवंशी या आंबेडकरी तरुणाचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला.दलित पँथरच्या माध्यमातून पॅंथर विजय वाकोडे यांनी संघटनेत कामाला सुरुवात केली होती त्यांचे आंबेडकरी चळवळीशी अतुट नातेतर होतेच तसेच त्यांनी विविध ठिकाणी अन्यायाविरुद्ध लढा देण्याचे काम त्यांनी आजपर्यंत केले होते अनेक आंदोलने त्यानी शांतपणे हाताळली आहेत. परभणी येथे झालेल्या संविधान प्रतिकृती अवमान घटनेनंतर झालेल्या आंदोलनात त्याचा सक्रिय सहभाग होता. भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांच्या अंत्यसंस्कारावेळी ते हजर होते. त्यानंतर त्यांना अस्वस्थता जाणवत असल्याने कार्यकर्त्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले त्यांतच त्याची प्राणज्योत मावळली. सोमनाथ सुर्यवंशी यांच्या हत्येला जबाबदार असणाऱ्यांना तसेच बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला जबाबदार असणाऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे तसेच भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी, संतोष देशमुख, लोकनेते विजयराव वाकोडो या कुटुंबांना १कोटी रुपये तसेच कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी परभणी येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील सविधान प्रतिकृतीची मोडतोड करणाऱ्या भगवान पवाराची न्यायालयीन चौकशी करून नार्को टेस्ट करून त्याच्या पाठीमागील मास्टरमाइंड कोण याची चौकशी करावी व भगवान पवाराला फाशी फाशीची शिक्षा व ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करून त्याच्यावरती रासो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याचा पाठीमागचा मास्टरमांचा शोध घ्यावा व तसेच परभणी मध्ये ऑपरेशन कोबिंगमध्ये ज्या 50 लोकांवरती गुन्हे दाखल झाली आहेत ते तात्काळ मागे घ्यावेत तसेच परभणी येथील
पोलीस कर्मचारी आरोपी
1) अशोक घोरबांड (पी आय. एलसीबी) 2) मरे (पी आय, नवा मोंढा पोलीस स्टेशन) 3) सरला गाडेकर (पीएसआय नवा मोंढा) 4) तुरणर (पीएसआय नवा मोंढा पोलीस स्टेशन) 5) अनिल कटारे (पोलीस हवालदार, नवा मोंढा पोलीस स्टेशन) यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर घनश्याम भोसले यांनी शासनाला केली असुन समाजातील अन्याय अत्याचाराविरोधात जनजागृतीसाठी दलित पँथरची भूमिका यावरही विचार व्यक्त करण्यात आला एकूणच आजची परिस्थितीत दलित पँथर महत्त्वाची भूमिका बजवायची असून यासाठी देशभरात गावागावांमध्ये दलित पँथरच्या घर तिथे भिमसैनिक आणि गाव तिथे शाखा निर्माण करून घराघरातून नवप्रशिक्षित भिमसैनिक घडवण्यात येणार असे आवाहन दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ.घन:शाम भोसले यांनी केले.
याप्रसंगी विविध वक्त्यांनी दलित पँथरच्या गौरवशाली इतिहासावर प्रकाश टाकला बाबासाहेबांच्या पश्चात आंबेडकरी समाजाने शिक्षणाच्या आघाडीवर जरूर उल्लेखनीय प्रगती केली असली तरी आंबेडकरी समाज संघटित झाला नाही; आणि संघर्षाच्या बाबतीत बोलायचे झालेतर नामांतराचा लढा ऐतिहासिक लढा सोडला तर मागील तिन दशकांहून अधिक कालावधीत संघर्षाची धार बोथट झाली; ही वस्तुस्थिती कटू असली तरी मान्यच करावे लागेल.
या पार्श्वभूमीवर डोक्याला कफन बांधून जी काही मोजकी कफल्लक माणसं आंबेडकरी चळवळीच्या रक्षणार्थ आणि ती प्रवाहित ठेवण्यासाठी रात्रंदिवस रस्त्यावर आहेत ते अजूनही आहेत ते म्हणजे दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. घनश्याम भोसले असे परखड मत दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळ यांनी केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब पडवळ राष्ट्रीय अध्यक्ष दलित पॅंथर व तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक व मार्गदर्शक म्हणून डॉ घनःश्याम भोसले यांनी काम पाहिले यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या पत्नी डॉक्टर रूपाली घनःश्याम भोसले उपस्थित होत्या तसेच याकार्यक्रमांमध्ये पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद लोखंडे व पश्चिम महाराष्ट्र संघटक विश्वास गजभार व तसेच पश्चिम महाराष्ट्र कोषाध्यक्ष परशुराम शरणागत तसेच महाराष्ट्र महिला आघाडी कविताताई बोंडे व तसेच पुणे शहराध्यक्ष राधिका शरणागत सोलापूर जिल्हा अध्यक्ष दादासाहेब शिंदे शिवसेना नेते महेश साठे, अंकुश आव्हाड पुणे जिल्हा अध्यक्ष तसेच रायगड जिल्हा अध्यक्ष मनोज गायकवाड तसेच पॅंथर अतिष ससाने उपस्थित होते. या अभिवादन सभा संपल्यानंतर लगेच ज्या लोकांनी समाजासाठी नवरात्र काम केले आहे असे हिरे चांदू दादू भोसले स्मृती आरोग्य प्रतिष्ठान तर्फे काही क्षेत्रांमध्ये चांगले काम करणाऱ्या गुणगौरव करून मानचिन्ह व सन्मानपत्र बहाल करण्यात आली. गडचिरोलीवरून आलेल्या डॉक्टर प्रणाली भजगवळी यांना समाजरत्न पुरस्कार व पुण्यावरून आलेल्या राधिका शरणागत यांना समाजभूषण पुरस्कार दिला यावेळी असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!