Advertisement

फुले वाड्यात तेलंगणा राज्यातील सत्यशोधकांचा फुले एज्युकेशन तर्फे सन्मान

तेलंगणा राज्यात ३ जानेवारी २०२५ पासून महिला शिक्षक दिन सर्वत्र साजरा केला गेला त्या प्रमाणे महाराष्ट्र सरकारने सुरु करावा – प्रा.सत्यशोधक पेटकुले

पुणे /समताभूमी

– फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अंड सोशल फौंडेशन च्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंती निमित्त वं भारतीय संविधान अमृत महोसत्वी वर्ष पुर्ती निमित्त तेलंगणा,आदिलाबाद येथील सत्यशोधक प्रा .सुकुमार पेटकुले , ज्येष्ठ विचारवंत ,कवी मधु बावलकर किनवटचे जेष्ठ कवी अशोक वसाटे यांचा सन्मान नांदेड चे निवृत्त रेल्वे अधिकारी बी.व्ही.गायकवाड यांच्या व अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचे शुभ हस्ते सामाजिक कार्याबद्दल

महात्मा फुले उपरणे ,मोती हार घालून भारतीय संविधान आणि फुले दाम्पत्य यांचे जीवनचरित्र मराठी,हिंदी,इंग्रजी आणि जर्मन भाषेतील ग्रंथ भेट देऊन दि. 5.1.2025 रोजी रात्री 7 वाजता समता भूमीवरील फुले वाड्यात सन्मानित करण्यात आले. या वेळी प्रथम प्रा.पेटकुले आणि गायकवाड यांचे शुभहस्ते प्रथम थोर समाजसुधारक महात्मा फुले आणि विधेची खरी देवता सावित्रीमाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी किनवट चे कवी अशोक यांनी सावित्रीमाई आणि भिडे वाडा यावर कविता सादर केल्या त्यामुळे संपूर्ण फुले दांपत्य यांच्या कार्याचा जीवनपट उलघडा गेला तर नांदेड च्या उषा गायकवाड यांनी जेष्ठ कवी प्रवीण दवणे यांची लेखक रघुनाथ ढोक यांचे पुस्तकातील सावित्रीमाई फुले यांचेवरील ज्ञानज्योती ही कविता सादर केली.

याप्रसंगी सत्यशोधक सुकुमार पेटकुले यांनी सन्मानास उतर देताना म्हंटले की आम्ही तेलंगणा, राज्यात फुले दांपत्य यांचे जीवनावरील कोण बनेगा करोडपती धर्तीवर प्रश्न उतरे स्पर्धा भरवून एका प्रश्नास एक हजार रुपये बक्षीस देऊन दरवर्षी लाखो रुपये बक्षीस देत आलो तसेच सार्वजनिक सत्यधर्म व इतर पुस्तके तेलगु भाषेत प्रकाशित करून लवकरच महात्मा फुले समग्र वाड्मय तेलगु आणि हिंदी भाषेत प्रकाशित करणार आहोत. त्याच प्रमाणे सपूर्ण तेलंगणा, राज्यात फुले दांपत्य यांचे १५० चे वर पुतळे असून एकाचे उद्गघाटन दुब्बागुडा येथे सत्यशोधक रघुनाथ ढोक आणि शिवदास महाजन यांनी प्रमुख पाहुणे केले आहे.. पुढे पेटकुले म्हणाले की यावर्षी पासून सपूर्ण तेलंगणा,राज्यात सरकारने ३ जानेवारी २०२५ पासूनच ज्ञानाई सावित्रीमाईची सर्वाना प्रेरणा मिळावी यासाठी ३ जानेवारी हा दिवस महिला शिक्षक दिन म्हणून मोठ्या दिमाखात विविध कार्यक्रम घेऊन साजरा केला तसेच महाराष्ट्र सरकारने सुरु करावा अशी देखील आशा व्यक्त केली .या सर्व कार्यात आमचा खारीचा वाटा असल्याने ढोक यांनी आमचा सत्कार या फुले वाड्यात केल्याने आम्ही उपकृत झालो आहोत.

जेष्ठ विचारवंत कवी मधु बावलकर म्हणाले की भारताचे संविधान लिहिणारे जागतिक कीर्तीचे बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे गुरु महात्मा फुले यांनी ज्या वाड्यातून जगाला समतेची ,मानवतेची बीजे पेरली बहुजनांना शिक्षणाचे दारे खुली केली त्या वास्तूमध्ये आमचा सन्मान संविधान देऊन होतो आहे हे आमचे परमभाग्य असून आम्हास एक ऊर्जादायी प्रेरणा उर्वरित कामासाठी मिळाली याचे मोल करता येणार नाही एवढा मोठा आनद या सत्काराने झालेचे उद्गार काढले.

यावेळी सत्यशोधक ढोक यांनी स्वागत व प्रास्ताविक मध्ये सुकुमार पेतकुले यांनी आमचे फुले एज्युकेशन ला तेलंगणा,राज्यात प्रथम सत्यशोधक विवाह लावण्याची संधी सोबत स्वताःचे उच्चशिक्षित मुलीचे व मुलाचे आणि एक इतर असे ४ सत्यशोधक विवाह लावण्याची संधी उपलब्ध करून दिली तसेच महात्मा फुले यांचे एक पात्री मधून व इतर कार्यातून फुले दांपत्या यांच्या कार्याचा प्रसार करीत कृतीशील वारसा चालवीत आहात म्हणून हा सन्मान आयोजित केल्याचे सांगितले आणि शेवटी ढोक यांनी महात्मा फुले रचित सत्याचा अखंड गावून कार्यक्रमाची सांगता केली. आलेल्या सर्व मान्यवर आणि चळवळीचे कार्यकर्त्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले मराठी ग्रंथ भेट दिले यासाठी मोलाची मदत आकाश-क्षितीज ढोक यांची झाली.

माधवराव पाटील महाविद्यालयात व्याख्यानाने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी 


मुरूम, ता. ६ (बातमीदार) :  येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती सोमवारी ( ता.६ ) रोजी व्याख्याने उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र पत्रकार संघ, जिल्हा उस्मानाबाद, मुरूम शहर पत्रकार संघ व श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित व्याख्यानात महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांनी पत्रकार दिनाचे महत्त्व प्रतिपादन करताना पत्रकार हा देशाचा कणा आहे. त्यांच्या लेखणीतून समाज प्रबोधन करून देशहित, राष्ट्रप्रेम जपले पाहिजे. अन्यायाला वाचा फोडण्याचे काम पत्रकारांची लेखणी करते. असा मौलिक संदेश त्यांनी यावेळी दिला. यावेळी उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, महाराष्ट्र पत्रकार संघाचे डॉ. सुधीर पंचगल्ले, डॉ. शिवपुत्र कनाडे, डॉ. सुशिल मठपती, महेश निंबरगे, रवी अंबुसे, अमोल गायकवाड, विशाल देशमुख, जगदीश सुरवसे, माजी तालुकाध्यक्ष बालाजी व्हनाजे, नाहीरपाशा मासूलदार, हुसेन नुरसे, डॉ. शिला स्वामी, प्रा. नारायण सोलंकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. भीमाशंकर पांचाळ, योगेश पांचाळ, नामदेव भोसले, अमोल कटके, मनोज हावळे, किशोर कारभारी, अजिंक्य राठोड आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुधीर पंचगल्ले यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सुभाष हुलपल्ले तर आभार डॉ. प्रतापसिंग राजपूत यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.  फोटो ओळ : मुरुम, ता. उमरगा येथील माधवराव पाटील महाविद्यालयात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना अशोक सपाटे, चंद्रकांत बिराजदार, महेश मोटे, सुधीर पंचगल्ले, महेश निंबरगे सह पत्रकार बांधव, कर्मचारी वृंदासह उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनी.

लोधवडे प्राथ.शाळेच्या बालबाजाराला उदंड प्रतिसाद


बालकांनी रेखाटलेल्या चित्रांचे व रांगोळ्यांचे भव्य प्रदर्शनही संपन्न


गोंदवले. – (विजय ढालपे)

छाया – लोधवडे प्राथमिक शाळेच्या बाल बाजारातील ग्राहक आणि बाल विक्रेते ( विजय ढालपे )

आजच्या काळात शिक्षण आणि जीवन व्यवहार यांची सांगड निर्माण होणे गरजेचे आहे. शाळेत मिळविलेल्या ज्ञानाचा विद्यार्थ्यांना त्याच्या दैनंदिन व्यवहारात उपयोग करता आला पाहिजे.गणिती ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करण्याचे कौशल्य निर्माण करणे.विद्यार्थ्यांनाचे खरेदी विक्री व संवाद कौशल्य विकसीत करण्याच्या हेतूने सातारा जिल्हा माण तालुक्यातील आदर्श लोधवडे गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उपक्रमशील प्राथमिक शिक्षक सतेशकुमार मारुती माळवे यांच्या संकल्पनेतून बाल बाजाराचे आयोजन करण्यात आले होते.याशिवाय यावेळी विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्र व रांगोळ्यांचे भव्य प्रदर्शनही भरविण्यात आले होते.
लोधवडे प्राथमिक शाळेच्या बालबाजारात विद्यार्थी बालकांची एकूण ८० छोटी-मोठी दुकाने लावली होती, तर यामध्ये १५२ बालव्यापारी सहभागी झाले होते.या बालबाजारातून चांगल्या प्रकारची आर्थिक उलाढाल झाली.गावरान देशी वाणाच्या विविध पालेभाज्या,शेंगवर्गीय भाज्या,फळभाज्या,भोपळ्यांचे विविध प्रकार,तसेच देशी फळांमध्ये केळी,रामफळे,पेरू,बोरे व कवठ यांचाही यात समावेश होता, तर अंडी,कांदा,लसूण,लिंबे,मक्याची कणसे,मसाल्याचे पदार्थ,मेवा मिठाई,खवय्यांचे विविध खमंगदार चविष्ट पदार्थ,चहा कॉफी स्टॉल, गरमा-गरम भजी ,पॅटीस ओली-सुकी भेळ,शेंगदाणे लाडू ,चायनीज मंचुरीन तसेच अनेक प्रकारची सूपही विक्रीसाठी उपलब्ध होती.बुटी पार्लर व बेंटेक्स साहित्य आणि धूप अगरबत्याही विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या.त्याचबरोबर शहाळ्यांचे नारळ, लोधवडे गावचा प्रसिद्ध अस्सल स्वादिष्ट प्युअर खवा,बासुंदी आणि पेढ्यांची तर बालबाजारात विक्रमी विक्री झाली.लोधवडे बालबाजारात अनेक ग्राहकांनी मनपसंत मनमुराद असा खरेदीचा आनंद घेतला.याशिवाय यावेळी प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचा व रांगोळ्यांचा मान्यवर,ग्राहक,पालक व ग्रामस्थांनी पाहण्याचा आनंदही घेतला.
बालबाजाराचे उदघाटन लोधवडे गावचे सरपंच मा.निवास काटकर यांचे शुभहस्ते करण्यात आले तर चित्र व रांगोळी प्रदर्शनच्या एका दालनाचे उदघाटन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा.कुंडलिक चोपडे यांचे शुभ हस्ते तर दुसऱ्या दालनाचे उदघाटन केंद्रप्रमुख मा.शोभा पवार यांचे शुभ हस्ते करण्यात आले.या बालबाजाराला माण तालुक्याचे शिक्षण विस्ताराधिकारी मा.रमेश गंबरे यांनीही सदिच्छा भेट दिली.या कार्यक्रमावेळी अन्य मान्यवरांचा उपस्थितीमध्ये अशोक पवार,पोलीस पाटील अनिल लोखंडे,वैभव मोरे,उपाध्यक्ष सर्जेराव कांबळे, वसंतराव कदम,राजकुमार माने,कुमार जाधव,रेश्मा शिलवंत,त्रिवेणी मोरे,तनुजा जगताप,शिवाजी मोरे,जयराम अवघडे,श्रीकांत कांबळे मुख्याध्यापक महादेव ननावरे,शिक्षक दिपक कदम,सतेशकुमार माळवे,सुचिता माळवे,दिपाली फरांदे,संध्या पोळ,मनिषा घरडे व अश्विनी मगर हे सर्व उपस्थित राहून सक्रिय सहभागी झाले होते.या कार्यक्रमात सूत्र संचलन सतेशकुमार माळवे यांनी केले तर शेवटी आभार दिपक कदम यांनी मानले.


मा. ना. जयकुमार गोरे यांचे हस्ते जनश्री फाउंडेशन, म्हसवड यांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

म्हसवड – सालाबाद प्रमाणे जनश्री फाउंडेशन, म्हसवड यांच्या वतीने दरवर्षी प्रकाशित होणाऱ्या दिनदर्शिकेचे यंदा मा. ना. जयकुमार गोरे यांच्या हस्ते व उद्योजक संजयकाका गांधी,प्रांताधिकारी श्रीमती गाडेकर मॅडम फाउंडेशन अध्यक्ष इंजि सुनील पोरे यांचे प्रमुख उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला मान्यवरांचा मोठा प्रतिसाद लाभला.

दिनदर्शिकेच्या प्रकाशन सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर, स्थानिक नेते, अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. या वेळी ना. जयकुमार गोरे यांनी जनश्री फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. त्यांनी संस्थेच्या उपक्रमांबद्दल प्रशंसा व्यक्त करत म्हटले की, अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडू शकतो.
कार्यक्रमात जनश्री फाउंडेशनच्या करणभैय्या पोरे यांनी संस्थेच्या पुढील उपक्रमांची माहिती देण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी फाउंडेशनच्या विविध सामाजिक उपक्रमांना सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
या प्रकाशन सोहळ्यात जनश्री फाउंडेशनचे सदस्य, कार्यकर्ते, आणि स्थानिक नागरिकांचीही लक्षणीय उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अँड शुभम पोरे यांनी प्रयत्न केले.

error: Content is protected !!