…
म्हसवड वार्ताहर..
…






महिलावर्गात मकर संक्रांतीच्या सणाविषयी खुपच आकर्षण असते, या निमित्त सर्व सुहासिनी महिला वाणवसा म्हणुन एकमेकींना हळदी – कुंकु लावुन तिळगुळाची देवाण – घेवान करतात. दरवर्षी हा सण मोठ्या उत्साहाने महिला वर्ग साजरा करीत असल्याने मकरसंक्रात हा सण महिलांचा सण म्हणुन ओळखला जातो.
कुळक जाई तालुका माण येथील सीता मातीच्या डोंगरावर महिलांची वसा घेण्यासाठी गर्दी मकर संक्रांतीच्या सण हा महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा असं असून महिला सौभाग्य वस्तू दान करतात. सीतामातेच्या मंदिरामध्ये सौभाग्य दान करतात व अखंड सौभाग्याचं व्रत समजलं जातं. विविध मंदिरांत देवाला ओवाळून हळदी कुंकू लावून तिळगुळ वाटप करतात.. अनेक महिला यादिवशी उपवास करुन अखंड सौभाग्याचं मागणे देवाला नमस्कार करून मागतात.
या वेळेला वसा धारण करतात असा हा संक्रातीचा सण असतो.
या संक्रातीच्या सणानिमित्त महिला श्रीराम व माता सीता यांच्या मंदिरात दर्शनासाठी जात असतात कुळजाई तालुका मान येथे प्राचीन सीतामाईच डोंगर असून या सीतामाईच्या डोंगरावर प्राचीन सीतामाईच मंदिर आहे या सीतामाईच्या मंदिरामध्ये दरवर्षी मकर संक्रांतीच्या निमित्ताने सुहासिनी महिला वसा देण्यासाठी व सीता मातेचे दर्शन करण्यासाठी गर्दी करीत असतात यावर्षी हजारो महिलांनी सीतामातेच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले व सौभाग्याचा व समाधान केला ज्या वेळेला विविध भेटवस्तू देण्याचा प्रकार असून या वेळेला संक्रातीच्या निमित्ताने सौभाग्य व ती महिला एकमेकींना भेटवस्तू व हळदीकुंकवाचे करंट दान देत असतात हा वसा घेण्याचा कार्यक्रम घरोघरी मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो त्याचप्रमाणे मंदिरामध्ये हळदीकुंकवाचा कार्यक्रम महिलांचा वाण वसा , तिळगुळ वाटप आयोजित करण्यात येते.
ही परंपरा हिंदू संस्कृतीमध्ये महत्त्वाची असून संक्रात सणाला अतिशय महत्त्व आहे
मकर राशीमध्ये रवीचे आगमन होताच मकरसंक्राती या उत्सवाचा प्रारंभ होतो.
या सणानिमित्त विविध धार्मिक स्थळावर जाऊन दर्शन घेण्याचा प्रघात असून तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी स्नान करण्याची पद्धत आहे.
या सणानिमित्त संक्रमण उत्सव आयोजित करण्यात येतो.
यावर्षी 114 वर्षांनंतर येणारा महा कुंभमेळा प्रयाग येथे भरला असून या विशेष वेळेला फार महत्त्व आहे. यावर्षीची संक्रात ही अतिशय महत्त्वाची असून कुंभमेळा या दिवशी शाही स्नानाने साजरा होणार आहे.
आणि म्हणूनच या संक्रांती सणाला विशेष महत्त्व आलेलं आहे
कुळक जाई तालुका माण येथे असणाऱ्या सीतामाईच्या मंदिरात भाविकांना दर्शन घेण्यासाठी दहिवडी पोलिसांनी विशेष मोहीम राबवलेली होती महिलांना रांगेमध्ये दर्शन घेण्यासाठी रांग व्यवस्था करण्यात आली होती. व कोणत्याही प्रकारची अनुचित प्रकार घडू नये यासाठी दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेऊन महिलांना हा सण साजरा करण्यासाठी खूप मोठे सहकार्य केलेला आहे याबद्दल महिलांनी त्यांना धन्यवाद दिलेले आहेत.
त्याचबरोबर गावातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामपंचायतीचे सरपंच व पदाधिकारी यांनी या सणानिमित्त महिलांना विशेष सहकार्य लाभण्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या.
यामुळे ही सीतामाई डोंगरावर भरणारी संक्रातीची यात्रा अतिशय आनंदात व सुहासिनीने परस्परांना हळदीकुंकू लावून साजरी करण्यात आली.
