म्हसवड वार्ताहर

मासाळवाडी म्हसवड येथील माणगंगा शैक्षणिक संकुल मध्ये स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती उपशिक्षणाधिकारी साईनाथ वाळेकर साहेब, प्राचार्य डी वाय ओंबसे साहेब शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था , दहिवडी- पंढरपूर, साहेब, महेश देवकाते साहेब, म्हसवड पोलीस स्टेशन चे उप निरीक्षक अधिकारी मा.सखाराम बिराजदार साहेब, गट शिक्षणाधिकारी पिसे साहेब म्हसवड केन्द्र प्रमुख दिपक पतंगे साहेब, सुरेश देवकाते साहेब, प्राथ शाळा मासाळवाडीचे मुख्याध्यापक ओतरी सर.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. नगराध्यक्ष व अहिंसा नागरी सह पतसंस्था चे संस्थापक अध्यक्ष मा. नितिन दोशी भाऊ हे होते.
उपशिक्षणाधिकारी तथा शिक्षण विस्तराधिकरी मा.साईनाथ वाळेकर साहेब म्हणाले की माणगंगा शैक्षणिक संकुल हे मान तालुक्यांतील नावाजलेले संकुल आहे. या ठिकाणी अतिशय चांगलें शिक्षण ग्रामीण भागातील मुलांसाठी चालु आहे याचा अभिमान आहे. या संकुलातील शिक्षण उच्च श्रेणीत मोजले जाईल अशी तयारी या मुलांची आहे. येथील विथ्यार्थी, शिक्षक खूप मेहनती आहेत. त्यामुळेच मासाळवाडी सारखा ग्रामीण भागात हे संकुल अतिशय चांगलें काम करीत आहे .डॉ वसंत मासाळ व त्यांची पत्नी सौ सविता तसेच सर्व संचालक मंडळ सर्व शिक्षक कर्मचारी यांचे अथक प्रयत्नांनी हे संकुल नक्कीच उंच शिखरावर पोहचेल असा मला विश्वास आहे.
मा. नितीन दोषी भाऊ अध्यक्ष स्थानावरून बोलताना संस्थेचा विस्तार त्यांचा प्रगतीचा आलेख पाहून भारुवून गेले. हि संस्था माझी आहे.. संस्था अध्यक्ष डॉ वसंत मासाळ व त्यांच्या बरोबर निरक्षर असूनही शिक्षणाची तळमळ असलेले ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण मिळावे ह्या एकाच उद्देशाने प्रेरित झालेले संस्था सचिव नारायण मासाळ व संस्था उपाध्यक्ष सुखदेव मासाळ, मधुकर मासाळ तसेच सर्व संचालक मंडळ.. संकुलात मार्गदर्शन करणारे गुरूजन वर्ग यांच्या मेहनतीचे फळ दिसत आहे.
(चौकट :- मुलांना* पिण्याच्या पाण्यासाठी चांगल्या प्रतीचा वॉटर कूलर अहिंसा नागरी सह पतसंस्था मर्यादित म्हसवड च्या वतीने बसवण्यात आला आहे.भविष्यात हि विद्यार्थांसाठी लागेल ती मदत केली जाईल.स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ मध्ये सहभागी कलाकार विध्यार्थी तसेच ज्यांनी अभ्यासात प्रावीण्य मिळवले त्यांचा गुणगौरव केला तर इतर विद्यार्थी त्याची प्रेरणा घेतात.
खरोखर एवढ्या प्रचंड अडचणीवर मात करून शिक्षण मिळावे म्हणून हे संकुल उभा राहिले आहे ते येथील गावकऱ्यांचे भाग्य आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी कला सादर केल्या त्यांना भरभरून प्रतिसाद मिळाला. त्या बद्दल मुलांचे अभिनंदन.. मेरिट मिळवले अश्या विद्यार्थाचे मनापासुन अभिनंदन.)
महेश देवकाते साहेब यांनी सांगितले की ग्रामीण भागातील मुलांना आपल्या स्वतःच्या पायावर उभे करणारे, मेडिकल लॅब टेक्निशियन , रडिओलॉजी टेक्निशियन असे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांना मोठी आर्थिक मदत मिळत असते. इंग्लिश मिडीयम स्कूलच्या माध्यमातून तळागाळातील मुलाना मुख्य प्रवाहात आणणे, त्यांच्यात सुधरणा करून त्यांचे भविष्य उज्वल करणे, त्यांना कुटुंबाचा आर्थिक आधारवड बनवन्याचे काम संस्था करीत आहे. .
प्राचार्य ओंबासे साहेब म्हणाले की या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कितीतरी तालुक्यांतील नावाजलेले हॉस्पीटल चालवली, स्वतःच्या जिवाची पर्वा न करता आपले योगदान दिले. खरंच हे व्यावसायिक कॉलेज म्हणजे या भागातील मुलांना एक हमखास नोकरीची सुवर्णसंधी आहे, त्यांनी त्याचा ग्रामीण भागातील मुलांनी लाभ घ्यावा. भविष्यात संस्थेने औद्योगीक प्रशिक्षण देणारे व्यवसायिक अभ्यासक्रम* सुरू करावेत त्यासाठी सहकार्य केले जाईल.
शैक्षिणक क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. संस्थे विषयी संस्था अध्यक्ष डॉ वसंत मासाळ यांनी संस्थेची स्थापना ते आतापर्यंतचा प्रवास सांगितला.
अतिशय सुंदर नियोजन त्याहून चांगलें विद्यार्थ्यांचे कलागुण सादर झाले.
प्रस्ताविक संस्थेचे सह डायरेक्टर रावसाहेब मासाळ यांनी केले.
उपस्थित सौ करमाळकर मॅडम, बगाडे सर,बनसोडे मॅडम, वेदपाठक मॅडम,राजमाने मॅडम, कापरे सर, गुंजाने मॅडम, डोंगरे मॅडम भोसले मॅडम, पाटोळे मॅडम, माने मॅडम, खांडेकर सर तसेच सर्व स्टाफ..
या कार्यक्रमाचं निवेदन सजगाने सर आणि झगडे मॅडम यांनी केले.
मोठ्या संख्येने परिसरतील नागरिक उपस्थित होते.