
म्हसवड वार्ताहर –
म्हसवड येथील मोफत नगर वाचनालया मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी म्हसवड नगरपरिषदेचे स्वछता निरीक्षक सागर सरतापे यांचे सत्कार प्रसंगी माजी नगराध्यक्ष व वाचनालयाचे अध्यक्ष नितिन दोशी म्हणाले कि, म्हसवड नगरपरिषदेत स्वछता निरीक्षक पदावर कार्यरत असणारे सागर सरतापे हे म्हसवड चे भूषण आहेत नगरपालिका हद्दीत स्वच्छता ठेवण्यासाठी सतत ते प्रयत्नशील असतात तसेच आपत्ती निवारण्यासाठी अग्रेसर असतात. कर्तव्य बजावताना वेळप्रसंगी नाराजी ओढवली तरीसुद्धा कर्तव्यात कसूर करीत नसणारा सागर सरतापे एक कर्तव्यनिष्ठ अधिकारी आहे.
आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चे औचित्य साधून नगरवाचनालयाने हा कार्यक्रम आयोजित केला असून सागर सरतापेच्या कार्याचा हार्दिक सन्मान आहे.
प्रतमत: महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस पुष्पहार स्वछता निरीक्षक श्री सागर सरतापे यांचे हस्ते अर्पण करताना उपस्थितानी अभिवादन केले.
यावेळी श्री सागर सरतापे म्हणाले कि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी माझा मोफत नगर वाचनालयाच्या वतीने सन्मान केला हे मी आयुष्यभर विसरू शकत नाही. यापुढे हि मी म्हसवड स्वच्छ व सुंदर राखण्यासाठी प्रयत्न करिन यासाठी सर्व नागरिकांनीही सहकार्य करावे.
म्हसवड नगरपरिषदेतील वरिष्ठानी आदेश दिल्यानंतर मी कधीही कोणत्याही कामी कर्तव्यात कसूर केला नाही.
भBabरतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा मी पाईक आहे. माझ्या हातून कोणावरही अन्याय होणार नाही.
यावेळी शेटे सर, गणेश तावरे, श्री लोखंडे, माने सर, नामदेव चंडवले व ग्रंथपाल सुनिल राऊत आदी उपस्थित होते.