लोणंद( दिलीप वाघमारे)–
लोणंद शहराच्या हद्दीतील निरा देवघर कॅनॉलचे काम हर्षवर्धन शेळके-पाटील यांच्या समवेत सर्व शेतकऱ्यांनी बंद पाडले
यावेळी हर्षवर्धन शेळके-पाटील हे म्हणाले की निरा देवघरचे पाणी खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळावे यासाठी कित्तेक वर्षे तालुका संघर्ष करत आहे, कित्तेक मोर्चे,आंदोलने केली विविध विभागाला निवेदने दिली पण कोणीही हा प्रश्न सोडावीला नाही
गेली 6 महिने संबंधित विभागाला निवेदन देत आहोत, लोणंद नगरपंचायत प्रशासन तोंडे बघून आरक्षण टाकून मोकळे झाले आहे
परंतु एका शेतकऱ्याच्या जमिनीत 3-3 आरक्षणे व त्यांच्याच शेतीत आता कॅनॉलचे काम सुरु आहे.
लोणंद शहराला पिण्यासाठी व शेतकऱ्यांना शेतीसाठी या कॅनॉलचा फायदा होणार नसेल तर तो लोणंद हद्दीतून नेहू देणार नाही असे शेळके पाटील यांनी सांगितले.
कोणतीही पुर्व सुचना न देता सुरु असलेले बेकायदेशीर कॅनॉलचे काम बंद पाडले असून या पुढे आम्हाला पाणी न देता कॅनॉलचे काम सुरु केल्यास होणाऱ्या नुकसानाला प्रशासन जबाबदार राहील असे नाना शेळके यांनी म्हटले आहे
यावेळी शिवसेना नेते दत्तात्रय ठोंबरे,चेअरमन आप्पासाहेब शेळके, राहुल धायगुडे, अजित ठोंबरे, सचिन शेळके, ललित शेळके, दत्तात्रय शेळके, अमोल शेळके, नंदकुमार शेळके, ललित पाटील, राहुल ठोंबरे, महादेव शेळके, दादासाहेब शेळके, गणेश शेळके, रोहित शेळके, आनंद व्हटकर, गोरख शेळके आदी शेतकरी उपस्थित होते.
Leave a Reply