जयराम स्वामी वडगाव येथे पंधरा रोजी अवयव दान जनजागृती कार्यक्रम
मायणी प्रतिनिधी-खटाव तालुक्यात प्रसिद्ध असणाऱ्या जयराम स्वामी वडगाव येथील 15 रोजी मंगळवारी अवयव दान जनजागृती कार्यक्रम होणार असल्याची माहिती प्रशालेचे प्रमुख जयवंत घार्गे यांनी दिली सदरचा कार्यक्रम जयराम स्वामी विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेज व कोमल न्यू लाईफ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मंगेश जी चिवटे कक्ष प्रमुख उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष मुंबई हे भूषवणार आहेत तसेच प्रमुख मार्गदर्शन कॉमन न्यू लाइफ फाउंडेशनचे अध्यक्ष धीरज गोडसे करणार आहेत. तसेच केंद्रीय समन्वयक अवयव प्रत्यारोपण समितीचे आर्थिक गोखले मॅडम उपस्थित राहणार आहेत.
त्याचप्रमाणे अविनाश काशीद सदस्य फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन हेही उपस्थित राहणार आहेत .
तरी अवयव दान जनजागृती कार्यक्रमास पालक ग्रामस्थ यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन हुतात्मा मंडळाचे उपाध्यक्ष अंकुश घारगे यांनी केले आहे.