महाराष्ट्र लोकसेवा आयोग परिक्षेत सुरभी तिवाटणे हिचे यश.

Spread the love

म्हसवड (वार्ताहर):-
महाराष्ट्र लोकसेवा आयोग परिक्षेच्या नुकत्याच लागलेल्या निकालात म्हसवडच्या सुरभी सविता नितीनकुमार तिवाटणे हिने बाजी मारत परिक्षेत अव्वल स्थान पटकावत सहाय्यक अभियंता श्रेणी १ मध्ये वर्णी लावत स्पर्धा परिक्षेत माणच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
माण तालुक्याने राज्यासह देशाच्या प्रशासनाला यापुर्वीही अनेक प्रतिभावंत अधिकारी व गुणवंत खेळाडु, दिले आहेत, या अधिकार्यांनी आपल्या कतृत्वाने राज्याच्या प्रशासनाला नवी दिशा देण्याचे काम केले आहे, माण तालुक्याची अधिकारी घडवण्याची हीच परंपरा म्हसवड येथील सुरभी तिवाटणे हिने कायम राखल्याने सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.
     सुरभी सविता नितीनकुमार तिवाटणे हीने 2021 मध्ये
Btech Civil ही पदवी संपादन केली. तिचे प्राथमिक शिक्षण पहिली ते तिसरी म्हसवड येथील मेरी माता हायस्कूल येथे तर तिसरी ते दहावी हायटेक मॉर्डन हायस्कूल हैदराबाद व पुढे  अकरावी बारावी एस. जी. एम. कॉलेज कराड येथे झाले असून  कराड गव्हर्नमेंट कॉलेज कराड बी टेक सिव्हील ही पदवी संपादन केल आहे. 2023 मध्ये झालेल्या एमपीएससी परीक्षेत तिची क्लास टू अधिकारी म्हणून निवड झाल्याने  तिची नेमणूक  जलसंपदा विभाग कुडाळ येथे सहाय्यक अभियंता श्रेणी टू म्हणून झाली होती.
यावर्षी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या एमपीएससी परीक्षेतही तिची निवड सहाय्यक अभियंता श्रेणी एक म्हणून झाली आहे.
      सुरभी सविता नितीनकुमार तिवाटणे हिने मिळविलेल्या यशाबद्दल तिचे राज्याचे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे, मुख्य अभियंता वैशाली आवटे, मजीप्र पुणे , विजय वाईकर कार्यकारी अभियंता मुंबई, पल्लवी मोटे कार्यकारी अभियंता कराड,एस जी पाटील उपअभियंता, एस के भोपळे उपअभियंता कराड सर्व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग कर्मचारी. तसेच  नितीन चिंचकर, आप्पासाहेब पुकळे, डॉ. राजेश शहा , बाळासाहेब पिसे, माजी नगराध्यक्ष तुषार विरकर, नितीन दोशी, पल्लवी पाटील आयुक्त इचलकरंजी महानगरपालिका, राजेंद्र तेली उपायुक्त , पंडित पाटील मुख्याधिकारी पांचगणी, निर्मला राशीनकर यमगर मुख्याधिकारी पलूस, अश्विनी पाटील उपायुक्त सांगली महापालिका, अमित आडे कार्यकारी अभियंता मजीप्र सांगली, डॉ. सचिन माने मुख्याधिकारी म्हसवड, चैतन्य देशमाने व सर्व नप कर्मचारी, अरुणजी देसाई देसाई उद्योग समूह सातारा, ज्ञानेश्वर ढेरे आयुक्त जळगाव महापालिका, राजेंद्र काटकर, प्रसाद जगदाळे वडूज न.पं. प्रतिक शिंदे सर ,उमेश घाडगे, संतोष माने, नितीन शेडे, राजेंद्र माने वडूज, पत्रकार पोपट बनसोडे, विजय भागवत, महेश कांबळे, विजय टाकणे, सलीम पटेल,सचिन मंगरुळे, दिलीप कीर्तने,एल के सरतापे,बापू मिसाळ,नागनाथ डोंबे,अंकुश अब्दागिरे तसेच कराड, म्हसवड, वडूज  पंचक्रोशीतील मान्यवरआदींनी तिचे अभिनंदन करून भावी आयुष्यास शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!