म्हसवड (वार्ताहर):- महाराष्ट्र लोकसेवा आयोग परिक्षेच्या नुकत्याच लागलेल्या निकालात म्हसवडच्या सुरभी सविता नितीनकुमार तिवाटणे हिने बाजी मारत परिक्षेत अव्वल स्थान पटकावत सहाय्यक अभियंता श्रेणी १ मध्ये वर्णी लावत स्पर्धा परिक्षेत माणच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. माण तालुक्याने राज्यासह देशाच्या प्रशासनाला यापुर्वीही अनेक प्रतिभावंत अधिकारी व गुणवंत खेळाडु, दिले आहेत, या अधिकार्यांनी आपल्या कतृत्वाने राज्याच्या प्रशासनाला नवी दिशा देण्याचे काम केले आहे, माण तालुक्याची अधिकारी घडवण्याची हीच परंपरा म्हसवड येथील सुरभी तिवाटणे हिने कायम राखल्याने सर्वत्र तिचे कौतुक होत आहे. सुरभी सविता नितीनकुमार तिवाटणे हीने 2021 मध्ये Btech Civil ही पदवी संपादन केली. तिचे प्राथमिक शिक्षण पहिली ते तिसरी म्हसवड येथील मेरी माता हायस्कूल येथे तर तिसरी ते दहावी हायटेक मॉर्डन हायस्कूल हैदराबाद व पुढे अकरावी बारावी एस. जी. एम. कॉलेज कराड येथे झाले असून कराड गव्हर्नमेंट कॉलेज कराड बी टेक सिव्हील ही पदवी संपादन केल आहे. 2023 मध्ये झालेल्या एमपीएससी परीक्षेत तिची क्लास टू अधिकारी म्हणून निवड झाल्याने तिची नेमणूक जलसंपदा विभाग कुडाळ येथे सहाय्यक अभियंता श्रेणी टू म्हणून झाली होती. यावर्षी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या एमपीएससी परीक्षेतही तिची निवड सहाय्यक अभियंता श्रेणी एक म्हणून झाली आहे. सुरभी सविता नितीनकुमार तिवाटणे हिने मिळविलेल्या यशाबद्दल तिचे राज्याचे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे, मुख्य अभियंता वैशाली आवटे, मजीप्र पुणे , विजय वाईकर कार्यकारी अभियंता मुंबई, पल्लवी मोटे कार्यकारी अभियंता कराड,एस जी पाटील उपअभियंता, एस के भोपळे उपअभियंता कराड सर्व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग कर्मचारी. तसेच नितीन चिंचकर, आप्पासाहेब पुकळे, डॉ. राजेश शहा , बाळासाहेब पिसे, माजी नगराध्यक्ष तुषार विरकर, नितीन दोशी, पल्लवी पाटील आयुक्त इचलकरंजी महानगरपालिका, राजेंद्र तेली उपायुक्त , पंडित पाटील मुख्याधिकारी पांचगणी, निर्मला राशीनकर यमगर मुख्याधिकारी पलूस, अश्विनी पाटील उपायुक्त सांगली महापालिका, अमित आडे कार्यकारी अभियंता मजीप्र सांगली, डॉ. सचिन माने मुख्याधिकारी म्हसवड, चैतन्य देशमाने व सर्व नप कर्मचारी, अरुणजी देसाई देसाई उद्योग समूह सातारा, ज्ञानेश्वर ढेरे आयुक्त जळगाव महापालिका, राजेंद्र काटकर, प्रसाद जगदाळे वडूज न.पं. प्रतिक शिंदे सर ,उमेश घाडगे, संतोष माने, नितीन शेडे, राजेंद्र माने वडूज, पत्रकार पोपट बनसोडे, विजय भागवत, महेश कांबळे, विजय टाकणे, सलीम पटेल,सचिन मंगरुळे, दिलीप कीर्तने,एल के सरतापे,बापू मिसाळ,नागनाथ डोंबे,अंकुश अब्दागिरे तसेच कराड, म्हसवड, वडूज पंचक्रोशीतील मान्यवरआदींनी तिचे अभिनंदन करून भावी आयुष्यास शुभेच्छा दिल्या.
खटाव तालुक्यातील जयराम स्वामी वडगाव येथील सद्गुरु जयराम स्वामी यांच्या आषाढी पालखीचे प्रस्थान 28 रोजी शनिवारी वडगाव जयराम स्वामी येथून होणार असल्याची माहिती मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज यांनी दिली शनिवार 28 रोजी दुपारी दोन वाजता प्रस्थान होणार असून सायंकाळी महसूरणे येथे मुक्काम आहे दिनांक 29 रोजी रविवारी दुपारी दोन वाजता महासुरणे प्रस्थान करून मायणी येथे मुक्काम होणार आहे सोमवारी दुपारी मायने येथून प्रस्तावना तर विभूतवाडी येथे मुक्काम होणार आहे मंगळवारी एक रोजी विभूतवाडी येथील प्रस्थान तर शेनवडी येथे मुक्काम होणार आहे बुधवारी दोन रोजी शेनवडी येथून प्रस्तावना होऊन दिघंची येथे मुक्काम होणार आहे तीन रोजी गुरुवारी दिघंची येथून प्रस्थान तर मोहोर येथे सायंकाळी मुक्काम होणार आहे तसेच चंद्रकांत बुरुंगले बंडगरवाडी कटफळ यांचे रानात जयराम स्वामी पालखीचे गोल रिंगण सोहळा संपन्न होणार आहे शुक्रवारी चार रोजी महूद प्रस्थान होऊन गादेगाव येथे मुक्काम होणार आहे तसेच शनिवार पाच रोजी गादेगाव येथून प्रस्थान होऊन जयराम स्वामी मठात पंढरपुर येथे मुक्काम आहे पालखीची परतवारी गुरुवारी 10 रोजी पंढरपूर ते बंडी शेगाव अकरा रोजी शेगाव ते भाळवणी शनिवार बारा रोजी भाळवणी ते पिलीव रविवार तेरा रोजी पिलीवती मसवड 14 रोजी म्हसवड ते गोंदवले मुक्काम मंगळवार 15 रोजी गोंदवले ते वडूज दिनांक 16 रोजी ते वडगाव जयराम स्वामी पालखीत सहभागी दिंड्या वडगाव, शामगाव, वांजोळी, मासुरणे, येडे उपाळे, कोतीज, अमरापूर, गोरेगाव पारगाव, कडेपूर, पुसेसावळी, राजाची कुलै, उंबर्डे, विहापूर, मुंबईकर, पोकळेवाडी, हिंगणगाव, लाडेगाव, डेरवण, उंची ठाणे, लाडेगाव, अतीत, जयराम स्वामी वडगाव, निमसोड, थोरवेवाडी, रेणुसेवाडी, ढाणेवाडी, व शेनवडी या दिंड्या सहभागी होणार आहेत असे विठ्ठल स्वामी यांनी सांगितले आहे.
डॉ. शंकरराव खरात साहित्य संमेलन भव्य दिव्य स्वरूपात, सर्वांना सोबत घेऊन साजरे करू ; मा.आ.राजेंद्र आण्णा देशमुख यांचा निर्धार
आटपाडी (प्रतिनिधी) – आटपाडी गावचे सुपुत्र, थोर साहित्यिक, कवी, लेखक, समाजसुधारक, आणि दलित साहित्याचे खंदे पुरस्कर्ते, साहित्यरत्न कुलगुरू डॉ. शंकरराव खरात यांच्या जन्मदिन वर्षानिमित्त त्यांच्या साहित्यिक व सामाजिक कार्याची उजळणी करणारे भव्य दिव्य डॉ. शंकरराव खरात साहित्य संमेलन २०२५ शुक्रवार, दिनांक ११ जुलै २०२५ रोजी आटपाडी (जि. सांगली) येथे संपन्न होणार आहे. या संमेलनाचे आयोजन साहित्यरत्न डॉ. शंकरराव खरात प्रतिष्ठान, आटपाडी (जि. सांगली) तर्फे करण्यात येत आहे. या संमेलनाच्या आयोजनासाठी प्रारंभिक तयारीचा आढावा घेण्यासाठी रविवार, दिनांक १५ जून २०२५ रोजी दुपारी २ वाजता श्रीमंत बाबासाहेब देशमुख सूतगिरणी, आटपाडी येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मा. आमदार राजेंद्र अण्णा देशमुख हे होते. बैठकीत संमेलनाचे स्वरूप, विविध उपक्रम, समित्यांची निर्मिती, निधी संकलन, साहित्यिक व मान्यवरांना निमंत्रण, ग्रंथप्रदर्शन, उद्घाटन सोहळा, परिसंवाद, कविसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम आदी बाबत सविस्तर चर्चा होऊन रूपरेषा ठरविण्यात आली. या बैठकीस साहित्यिक, साहित्यप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये शिवाजीराव पाटील (तात्या), आप्पासाहेब काळबाग, आयु. विलास खरात (सरचिटणीस), नंदकुमार खरात, आप्पा खरात, प्रा. डॉ. सयाजीराजे मोकाशी, व्ही. एन. देशमुख सर, श. भा. बलवंत, विठ्ठल गवळी, वसंत विभूते, नानेश डोंगरे, शिवाजी बंडगर, दीपक खरात, प्रा. डॉ. कृष्णा इंगवले, सौ. मंगल इंगवले, डॉ. उत्तम चंदनशिवे, यशवंत मोटे, डॉ. विजय मोटे, चंद्रवर्धन लोडगे यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश होता. साहित्यरत्न डॉ. शंकरराव खरात साहित्य संमेलन २०२५ हे संमेलन फक्त एक साहित्य सोहळा न राहता, दलित साहित्य चळवळ, सामाजिक समता, व विवेकशील विचारांचा जागर करणारे प्रभावी व्यासपीठ ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या संमेलनात राज्यभरातील अनेक नामवंत साहित्यिक, विचारवंत, संशोधक व कवी सहभागी होणार आहेत. सर्व आटपाडीकर, साहित्यप्रेमी व नागरिकांनी या ऐतिहासिक संमेलनात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयु. विलास खरात, सरचिटणीस, साहित्यरत्न डॉ. शंकरराव खरात प्रतिष्ठान, आटपाडी (जि. सांगली) यांनी केले आहे.
म्हसवड वार्ताहर — मेरी माता हायस्कूल व ज्यु. कॉलेज म्हसवड ची विद्यर्थिनी कु.असावरी सतीश मेळावणे हिने महाराष्ट्र राइफल असोसीएशन द्वारा मुंबई (वरळी) येथे आयोजित 28 व्या कॅप्टन.एस.जे इझेकल राज्यस्तरीय रायफल शुटिंग स्पर्धेमध्ये 10 मी एअर रायफल पीपसाईट प्रकारात सब युथ युथ व ज्युनियर या 3 वयोगटामध्ये सहभाग नोंदवताना 400 पैकी 391 गुण मिळवत 2 सुवर्ण व 1 रौप्य 🥈अशा एकूण 3 पदकांची कमाई करून उत्तुंग यश संपादन केले. मागील तीन वर्षांपासुन शालेय अभ्यास करत एका स्वतंत्र स्वप्नाचा पाठलाग करत राज्य, राष्ट्रीय स्तरावर कु. असावरी ने अथक परिश्रम नियमित सराव करीत यश प्राप्त केले आहे. म्हसवड शहराचे API श्री. अक्षय सोनवणे, मेरी माता स्कूलचे प्राचार्य फादर सनु यांनी तिचे विशेष अभिनंदन केले. सदर यश प्राप्ती साठी प्रशिक्षक आकाश गुजरे यांचे मार्गदर्शन लाभले.
म्हसवड वार्ताहर … स्वाभिमानी शेतकरी संघटनेते राजू शेट्टी यांच्या हस्ते सातारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडी बद्दल रणजितसिंह देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. शेतकऱ्यांच्या असंतोषाचे जनक आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार माननीय राजू शेट्टी साहेब यांच्या हस्ते ऐतिहासिक काँग्रेसच्या सातारा जिल्ह्याच्या अध्यक्ष पदावर निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. स्वातंत्र्यसंग्रामात ब्रिटिश सरकार उलथून टाकण्यासाठी साताऱ्यातूनच उठाव झाला होता त्याच पद्धतीने असंवेदनशील केंद्रातील भाजपचे सरकार आणि राज्यातील महायुतीचे सरकार सत्तेतुन घालवण्यासाठी तुम्ही नक्की ऐतिहासिक क्रांतिकारी सातारा जिल्ह्यातून उठावाची सुरुवात कराल अशा आशीर्वाद रुपी शुभेच्छा ही राजू शेट्टी यांनी या वेळेला रणजित देशमुख यांना दिल्या. .. रणजितसिंह देशमुख यांना राजू शेट्टी यांनी दिल्या केंद्रातील भाजपचे सरकार आणि राज्यातील महायुतीचे सरकार सत्तेतुन घालवण्यासाठी शुभेच्छा. …..
डिजिटल मिडिया साठी जाहिरात देण्यात यावी अशी मागणी मराठी पत्रकार परिषद सलग्न मराठी डिजिटल मिडिया पत्रकार परिषद यांच्या मार्फत करण्यात आली होती, या मागणीच्या पाठपूराव्याला यश आले असून माहिती व जनसंपर्क महासंचालनालक यांनी डिजिटल मिडिया ला जाहिरात देण्यात बाबत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.
म्हसवड (वार्ताहर)—पत्रकारांसाठी आनंदाची बातमी ,आता डिजिटल मिडिया ला शासन जाहिराती देणार. शासन निर्णय,
शासनाने 3 जून 2025 रोजी एक शासन निर्णय जाहीर केला असून आगामी काळात फेसबुक,युट्युब,इंस्टाग्राम या माध्यमातून डिजिटल पत्रकारिता करणाऱ्यांसाठी शासकीय जाहिराती सुरू केल्या आहेत. याचे परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसापासून मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषद डिजिटल मीडियासाठी जाहिराती सुरू कराव्यात यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करत होते. अखेर या पाठपुराव्याला यश आल आहे. अशी माहिती सातारा जिल्हा डिजिटल मिडिया पत्रकार परिषद चे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिली आहे.
मायणी येथे माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या रविवार एक रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तसेच भाजपाच्या वतीने ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे दरम्यान राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल भरत पाटील तसेच सातारा जिल्हा समन्वय समिती दिशा या समितीवर नियुक्ती झाल्याबद्दल सौ रेणू अभिजीत जळगावकर व खटाव तालुका भाजपच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अनिल माळी यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती वाढदिवस उत्सव समितीने दिली डॉक्टर येळगावकर हे रविवारी आठ वाजता सद्गुरु यशवंत बाबा महाराज, मातोश्री सरुताई यांचे दर्शन घेऊन आपल्या निवासस्थानी वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत सायंकाळी पाच वाजता ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते चांद नदीलगत नव्याने तयार केलेल्या बाह्यवळण रस्त्याचे उद्घाटन, मायनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नवीन इमारतीचा पायाभरणी शुभारंभ, तसेच मायणी वलखड रस्त्याचे भूमिपूजन त्याचबरोबर श्री संत सद्गुरू मातोश्री सरू ताई मंदिरात विविध विकास कामाचे उद्घाटन, स्फूर्ती शिक्षण मंडळामार्फत चालवण्यात येणाऱ्या माध्यमिक प्राथमिक शाळा खोल्याचे उद्घाटन, मायणी नळ पाणीपुरवठा 24 बाय सात यांचा लोकार्पण सोहळा तसेच मायणी नवी पेठ वित्त आयोगातून गटार बांधणी शुभारंभ तसेच डॉक्टर दिलीपराव बेळगावकर युवा मंच यांच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न होणार आहे सायंकाळी पाच वाजता बाजार पटांगण गांधी मैदान येथे खटाव मान तालुक्यातील भाजपच्या वतीने कार्यकर्ते व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत नागरी सत्काराचा कार्यक्रम होणार आहे तरी नाही जिल्हा परिषद गटातील बहुसंख्य ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे*
मुंबई, दि.२८ : पंढरपुरची आषाढी वारी पूर्वापार चालत आलेली परंपरा असून वारी आणि वारकरी राज्याचे वैभव वाढविणारी आहे. यामुळे यंदा पावसाचे आगमन लवकर झाल्याने सर्व मानाच्या पालख्यांना आणि वारकऱ्यांना फिरती शौचालये, पाणी, आरोग्य आणि पोलीस बंदोबस्तासाठी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करावे. ही वारी यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे आषाढी एकादशी वारीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा बैठकीत मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. बैठकीला उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, माढ्याचे आमदार अभिजित पाटील, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले, यांच्यासह वित्त, नियोजन, सार्वजनिक बांधकाम, नगरविकास, आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, मानाच्या 10 दिंड्यांचे प्रमुख, प्रतिनिधी उपस्थित होते.
पुण्याच्या प्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे वारीच्या तयारीची माहिती सादरीकरणातून दिली. त्यानंतर प्रमुख दिंडीचे प्रतिनिधी, विश्वस्त यांनी वारीसंबंधात सूचना, अडचणी मांडल्या. पुणे शहराच्या ठिकाणी विविध स्वागत मंडप, लाऊड स्पीकरवर बंदी असावी, प्रत्येक पालख्यांना जास्तीचा पोलीस बंदोबस्त, अरूंद रस्त्यांचे रूंदीकरण, वाखरी मॉडेल वारकरी तळ, पालखीसोबत साध्या अम्ब्युलन्ससोबत कार्डियाक अम्ब्युलन्स, दर्शन पासची संख्या, वॉटर प्रूफ टेंट, पाण्याचे टँकर, मुबलक औषध साठा, पालख्यांच्या पारंपरिक मार्गाचा विकास, फिरती शौचालये, वाखरी वारकरी तळ मॉडेल करण्याच्या सूचना मांडण्यात आल्या.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले की, वारीचे योग्य नियोजन करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. पुणे, पिंपरी चिंचवड आयुक्तांनी पालख्यांच्या स्वागतासाठी वेगळी व्यवस्था करावी. रस्त्याच्या बाजूला मंडप टाकून स्वागत करावे, मात्र पालख्यांना विलंब होवू नये, याची दक्षता घ्यावी.
विभागीय आयुक्तांनी समन्वयाने काम करावे
राज्यातील विविध भागातून पालख्या पंढरपूरला येतात. नाशिक, विदर्भ, मराठवाडा याठिकाणाहून येणाऱ्या पालख्यांना पालखी मार्गात सोयीसुविधा देण्यासाठी नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागीय आयुक्तांनी समन्वयांनी बैठक घेवून उपाययोजना कराव्यात. आपापल्या जिल्ह्यातून पालख्या जाताना स्थानिक प्रशासनाने रस्ते, पाणी, वीज, पोलीस बंदोबस्त, आरोग्याच्या सुविधा पुरविण्यासाठी तत्काळ बैठका घेवून नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
पोलीस महासंचालक यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी योग्य समन्वय करून पालख्यांच्या बंदोबस्ताची, वाहतूक, अपघात होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. किमान महत्वाच्या मानाच्या पालख्यांना सेवा राहील याची व्यवस्था करावी. जिल्ह्याची हद्द संपते तेव्हा पोलीस बंदोबस्तावेळी दुसऱ्या जिल्ह्याने अगोदरच हजर राहून कोणतीही पालखी, दिंडी पोलिसांविना राहणार नाही, याची दक्षता घ्यावी.
वाखरी मॉडेल वारकरी तळ करणार
सर्व संतांच्या मानाच्या पालख्या वाखरीजवळ एकत्र येतात. राज्यभरातून शेकडो पालखी सोहळे पायी पंढरीची वाट चालत असताना पालख्यांच्या स्वागतासाठी संत नामदेव महाराजांची पालखी वाखरी येथे जातात. यामुळे याठिकाणी पालख्यांच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी होते. सोलापूर जिल्हा प्रशासनाने गर्दी नियंत्रणात राहण्यासाठी योग्य नियोजन करून दक्षता घ्यावी. नामदेव महाराज यांचा असलेला ओट्याचा पुनर्विकास करावा. गर्दी लक्षात घेवून वाखरीचे विशिष्ट मॉडेल वारकरी तळ होण्यासाठी आराखडा तयार करणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केली.
यावर्षीही राहणार समूह विमा
पंढरपूर येथील वारीमध्ये दरवर्षी सुमारे 15 ते 20 लाख वारकरी सहभागी होतात. पंढरपूर दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांचे आजारपण, अपघात किंवा मृत्यू झाल्यास या संदर्भात संबंधितांना दिलासा देण्यासाठी शासनाने मागील वर्षी ‘विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना’ सुरु करण्याचा निर्णय घेतला. यावर्षीही वारीमध्ये सामील होणाऱ्या वारकऱ्यांना समूह विमा राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मानाच्या पालखीमधील वारकऱ्यांना यापुढे दर्शन पास योग्य प्रमाणात वाढवून दिले जातील, असेही त्यांनी सांगितले.
निर्मल वारी, हरित वारीसाठी काम वाढवून आराखडा करा
वारी कालावधीमध्ये निर्मल वारी, हरित वारी हा उपक्रम अत्यंत महत्वाचा आहे. पालखी मार्गातील त्या-त्या जिल्ह्यातील प्रशासनाने निर्मल वारीचे अधिक काम होण्यासाठी प्रयत्नशील रहावे. शिवाय हरीत वारीने निसर्गाशी साधर्म्य राखण्यास मदत होत असल्याने याकडे गांर्भीयाने पहावे. रस्त्याच्यी दुतर्फा देशी, सावली देणारी झाडे लावण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.
36 वॉटर प्रुफ मंडप
राज्यात पावसाचा जोर राहणार असल्याने वारकऱ्यांच्या निवाऱ्यासाठी पालखी मुक्काच्या ठिकाणी 36 वॉटर प्रुफ मंडपाची तयारी केली आहे. आवश्यकता भासल्यास आणखी वॉटर प्रुफ मंडप वाढविण्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
वारीमध्ये प्रयागराजच्या धर्तीवर महिलांचाही विचार करण्यात आला. हिरकणी कक्षासह महिलांना स्नानासाठी वेगळी स्नानगृहांची सोय उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
वारकऱ्यांची गैरसोय टाळणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यंदा राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस असल्याने विविध मानाच्या पालख्यांच्या सूचना लक्षात घेवून वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता शासन घेणार आहे, असे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. फिरते शौचालये, शुद्ध पिण्याचे पाणी, वीज, वॉटर प्रुफ टेंट, जास्तीत जास्त आरोग्यसुविधा पुरविण्यात येणार आहे. अम्ब्युलन्सबाबत कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता आरोग्य विभाग घेईल. महिलांच्या आरोग्याबाबतही विशेष काळजी घेण्यात आली असून वारकऱ्यांना अधिक बसेस, रेल्वे उपलब्ध होण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. रस्त्यावर चिखल होणार नाही, ते सुस्थितीत राहतील याची दखल घेवू, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी वारकरी, पालख्यासाठी विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीने केलेल्या सोयीसुविधांबाबतची माहिती सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर यांनी दिली.
यावेळी विविध पालखी संस्थानच्या वतीने योगी निरंजननाथ, चैतन्य कबीर महाराज, जालिंदर मोरे, सोमनाथ घाटेकर, अक्षय महाराज भोसले, श्री. साधू यांनी समस्या, सूचना मांडल्या.
म्हसवड (ता. माण) – सातारा जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे अध्यक्ष इंजिनिअर कृष्णात फडतरे यांनी पदाधिकाऱ्यांसह माजी राज्य कार्याध्यक्ष इंजि. सुनील पोरे यांचे म्हसवड येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटी दरम्यान संघटनेच्या विविध प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा झाली.
या प्रसंगी ग्रामविकास मंत्री मा. ना. जयकुमार गोरे यांच्याकडून अभियंता संघटनेच्या न्याय्य मागण्या मार्गी लावण्यासाठी सहकार्य आणि पाठबळ मिळावे, अशी अपेक्षा इंजि. फडतरे यांनी व्यक्त केली. संघटनेच्या हितासाठी सर्वांना एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
या भेटीमध्ये संघटनेचे अन्य पदाधिकारी इंजि महेश तिकोले विक्रांत शिंदे बाबासो कुंभार आणि सदस्यही उपस्थित होते. ही सदिच्छा भेट स्नेह आणि सहकार्याचे प्रतीक ठरली असून, संघटनेच्या आगामी वाटचालीसाठी ही एक सकारात्मक पाऊल ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
प्रतिनिधी: विनोद लोहार वडूज : हुतात्मा नगरी म्हणून परिचित असलेल्या वडूज शहराला धार्मिकतेची परंपरा आहे . तर शहरात विविध कार्याचा वारसा येथील युवा पिढी जोपासत असून प्रत्येक समाजातील दात्यांमुळे धार्मिकतेत भर पडत असल्याचे प्रतिपादन श्री महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विजयकुमार माळी यांनी केले . येथील महादेव मंदिर पारिसरात स्वर्गीय वनिता विलासचंद शहा यांच्या द्वितीय पुण्यस्मरण निमित्त पाकगृह व व्यासपीठ लोकार्पण सोहळ्या प्रसंगी अध्यक्ष विजयकुमार माळी (तात्या)बोलत होते . याप्रसंगी सुकुमार शहा , मनिष शहा,सचिव चंद्रशेखर जाधव, डाँ.संतोष गोडसे , गिरीश शहा , डॉ. कुंडलीक मांडवे ,वचन शहा , रोहित शहा , अँड.कल्पीत शहा , साहिल शहा यांची प्रमुख उपस्थिती होती . याप्रसंगी सुकुमार शहा म्हणाले , समाजात वावरताना आणि जन्म – कर्म भूमित अनेक घटकांच्या सानिध्यात वावरण्याची संधी मिळते. आई – वडिलांनी दिलेल्या संस्काराची पूंजी समाज हितासाठी कार्यरत ठेवणे काळाची गरज आहे . ऋणमुक्ती साठी आणि शहा परिवाराची परपंरा जोपासण्यासाठी लोकाभिमुख कार्य महत्वपूर्ण आहे. याप्रसंगी माजी नगरसेवक वचन शहा यांनी आपले मनोगत व्यक्त केले . तर उपस्थितांचे स्वागत व आभार डॉ. संतोष गोडसे यांनी मानले . यावेळी देवीला गोडसे , सिमा बोटे , शितल वाघमारे , जैनुद्दीन मुल्ला ,महेश इगावे , दिनेश शेटे , महादेव गोडसे , राजेंद्र यादव , तुकाराम फडतरे , विनोद लोहार ,बंडा म्हामणे,राजू शेटे , महेश माने ,बाळू कोळी,आदींसह शिवभक्तांची उपस्थिती होती .
शहा परिवाराची दानत आणि दातृत्व … यापुर्वीही वडूज येथील शहा परिवाराच्या वतीने दुष्काळ आणि सुख – दुःखात अग्रस्थानी राहून दानत आणि दातृत्वाची वंश परंपरा जोपासली आहे . त्यांच्या या कार्याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
येथील श्री महादेव मंदीर परिसरातील वनिता लिलाचंद शहा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पाकगृह व व्यासपीठ लोकार्पण केल्याप्रकरणी ट्रस्टच्या वतीने सुकुमार शहा व परिवार यांचा सत्कार करताना चंद्रशेखर जाधव.