म्हसवड : दि . १२ सप्टेंबर रोजी माणदेशी फौंडेशन संचालित , माणदेशी तरंग वाहिनीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता . माणदेशी गौरी सजावट स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा दिमाखात पार पडला . यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरित करण्यात आली .
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. श्रीमती चेतना सिन्हा यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून माणदेशी फौंडेशन च्या मुख्य प्रशासकीय अधिकारी मा. सौ. वनिता शिंदे व माणदेशी बँकेच्या संचालिका मा. सौ. अनघा कामत उपस्थित होत्या , तसेच या कार्यक्रमासाठी प्रायोजक म्हणून भाग्यश्री गांधी अक्षय ज्वेलर्स म्हसवड तसेच परीक्षक म्हणून लाभलेल्या मा. डॉ. हसुमती छेडा व किक स्टार्ट गर्ल्स प्राजक्ता गायकवाड व अनुप गुरव माणदेशी प्रोग्राम डायरेक्टर यांनी परीक्षण केले .
या स्पर्धेत एकूण ५५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता . आकर्षक व देखण्या सजावटीतून विविधरंगी कलात्मकता खुलून दिसली . या सजावटीतून समाजाला प्रभोधनात्मक संदेश देण्यात आले . परीक्षकांनी सजावटीतल नवनवीन कल्पकता , पारंपरिकतेला दिलेले आधुनिक वळण व सर्जनशीलतेचा गौरव केला .
यामध्ये म्हसवड मधील ५ विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देण्यात आले. त्यामध्ये प्रथम क्रमांक- सौ. प्रतिभा राजेंद्र टाकणे , द्वितीय- सौ.पल्लवी सोमनाथ केवटे , तृतीय – सौ. सारिका महादेव कलढोणे , चतुर्थ – सौ .स्नेहल गायकवाड ,पाचवा – सौ .शुभांगी संतोष देशमुख यांनी पटकावला . तसेच विरळी गावातील ३ विजेत्या स्पर्धकांनाही बक्षीस देण्यात आले . त्यामध्ये प्रथम क्रमांक -सौ. शारदा नलावडे द्वितीय – सौ. साक्षी गुरव , तृतीय – सौ. स्नेहा काशीद यांनी पटकावला. शेवटी सहभागी स्पर्धकांनाही पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले . या कार्यक्रमात चेतना सिन्हा म्हणाल्या की महिलांनी खूप चांगल्या पद्धतीने गौरी सजावट स्पर्धेमध्ये भाग घेऊन पर्यावरण पूरक तसेच वारकरी देखावे केले आहेत आणि मला खूप काही शिकायला मिळाले
तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदिका सौ. कांचन ढवन यांनी केले .त्याचप्रमाणे या स्पर्धेचे नियोजक , माणदेशी तरंग वाहिनीचे संचालक श्री. अनुप गुरव व ज्ञानेश्वरी पिसे यांनी केले . या कार्यक्रमाला महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून कार्यक्रम खूपच रंगतदार केला . अशापद्धतीने आनंदमय वातावरणात कार्यक्रम पार पडला .



