Advertisement

“द जर्नालिस्ट असोसिएशन” दिल्ली यांचे नॅशनल लिगल सेलच्या,सोलापूर जिल्ह्याध्यक्ष पदी ॲड शिवाजी शा.कांबळे यांची निवड.

“द जर्नालिस्ट असोसिएशन” दिल्ली यांचे नॅशनल लिगल सेलच्या,सोलापूर जिल्ह्याध्यक्ष पदी ॲड शिवाजी शा.कांबळे यांची निवड.

सोलापुर प्रतिनिधी ,
लोकशाहीचा चौथा स्तंभ जर्नालिझम असुन त्याकरीता राष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी संस्था “द जर्नलिस्ट असोसिएशन दिल्ली” यांचे नॅशनल लिगल सेल, सोलापूरच्या जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ व अभ्यासु विधीज्ञ ॲड. शिवाजी शा.कांबळे यांची नुकतीच निवड करण्यात आली.
नॅशनल लिगल सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. राकेशजी यादव तसेच राष्ट्रीय सरचिटणीस मा. ॲड. अयुब पटेल यांनी नुकतीच त्यांची निवड केलेली आहे. यावेळी सोलापूरचे नुतन जिल्ह्याध्यक्ष ॲड शिवाजी शा. कांबळे यांनी त्यांचे मत व्यक्त करत असताना संस्थेच्या राष्ट्रीय धोरणानुसार विधी सेवा देण्याचा मनोदय व्यक्त केला.
तसेच राष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी संस्था द जर्नलिस्ट असोसिएशन दिल्ली यांनी केलेल्या निवडी बद्दल या संस्थेचे आभार मानले आहे.
या निवडी बद्दल त्यांचे समाजातील सर्व स्तरातून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.

राज्यशास्त्र संशोधन केंद्रात रघुनाथ महामुनी लिखित गोमाता काव्यसंग्रहाचे प्रकाशन

(मुरूम,प्रतिनिधी) :

येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा साहित्यिक कविवर्य रघुनाथ ज. महामुनी कोंढेजकर लिखित गोमाता काव्यसंग्रहाचे श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र पदवी-पदव्युत्तर व संशोधन केंद्रात मंगळवारी (ता.८) रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी तुळजापूरच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. आंबादास बिराजदार, नळदुर्गच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. निलेश शेरे, भौतिकशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. सतिश शेळके, रोटरी क्लब मुरूम सिटी चे अध्यक्ष प्रा. डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी, वाणिज्य विभागाचे प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, राज्यशास्त्र संशोधन केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ. महेश मोटे आदींच्या प्रमुख उपस्थितीत काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी डॉ. बिराजदार म्हणाले की, हा काव्यसंग्रह म्हणजे अनुभवाच्या सागरातून उमटलेले अमूल्य मोती आहेत. त्यातील प्रत्येक कविता एक विचार देणारी आहे. वाचकांना या कवितांमधून केवळ सौंदर्याची अनुभूती मिळत नाही, तर जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मिळतो. या कविता केवळ वाचायच्या नाहीत, तर अनुभवल्या पाहिजेत. प्रकाशन कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुळजापूरचे सचिन घाटे यांनी केले. सूत्रसंचालन शिवतेज भोसले तर आभार अमोल कटके यांनी मानले. यावेळी बहुसंख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील राज्यशास्त्र संशोधन केंद्रात गोमाता काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना डॉ. आंबादास बिराजदार, डॉ. निलेश शेरे, डॉ. सतिश शेळके, डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी, डॉ. सुधीर पंचगल्ले, डॉ. महेश मोटे व अन्य.

श्री सर्वजन हितैषी ट्रस्टच्या वतीने वारकऱ्यांना मोफत फराळ वाटप

पंढरीत देवशयनी एकादशी निमित्त श्री सर्वजन हितैषी ट्रस्टच्या वतीने वारकऱ्यांना मोफत फराळ वाटप

साबुदाणा खिचडी केळी शेंगदाणा लाडू, पिण्याचे शुद्धपाणी वाटप करण्यात आले

पंढरपूर : पंढरपूर येथे देवशयनी आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी लाखो भाविक पंढरीत विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येत असतात अशा भाविक वारकऱ्यांना कोलकत्ता येथील श्री सर्वजण हितैषी ट्रस्टच्या वतीने लक्ष्मणबाग येथे मोफत फराळाचे वाटप करण्यात येते.
जगद्गुरु रामानुजाचार्य श्री झालरिया पिठाधिपती श्री श्री 1008 श्री स्वामीजी घनश्यामाचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून गेल्या सात ते आठ वर्षांपासून पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या आषाढी यात्रेतील हजारो भाविक, वारकऱ्यांना मोफत फराळाचे वाटप करण्यात येत असते.

याचे आयोजन लक्ष्मण बाग येथील व्यवस्थापक योगेश राधेश्याम शर्मा हे करतात यंदाही मोफत फराळाचे वाटप करण्यात आले. यामध्ये साबुदाणा खिचडी, शेंगदाणा लाडू, केळी तसेच शुद्ध पिण्याची बाटली, खजूर असे संपूर्ण फराळाचे वाटप करण्यात येते. या वाटपाचे नियोजन व्यवस्थापक योगेश राधेश्याम शर्मा हे करतात यावर्षी वाटप करण्यासाठी नागपूर येथील ओमप्रकाश सरोदे यांनी सहकार्य केले तर सदर फराळ वाटपा मध्ये जगदीश टाक,प्रमोद शेंडे,प्रताप परिहार,मोहन भोईर,दिनेश खंडेलवाल,राजेश देशमुख, रामचंद्र पाटील, प्रदिप सुरवसे,राजराजेश्वरी रेखाताई टाक, विलास खंकाळ, गोविंद कदम तसेच सरोदे परिवार यांचे मोलाचे योगदान लाभले.
देवशयनी एकादशी निमित्त यंदाही आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी आलेल्या महिला,पुरुष व जेष्ठ वारकरी भाविकांना फराळ वाटप केल्यानंतर त्यांनी श्री सर्वजण हितैषी ट्रस्टचे मनापासून आभार मानले तसेच फराळ वाटप करताना राम कृष्ण हरी,जय हरीच्या गजरात वाटप करण्यात आले. यावेळी भाविकांनी मनापासून धन्यवाद दिले.

भाविकांसाठी गोपाळपूर येथे दोन जर्मनी हँगर कार्यान्वित

पंढरपुर वार्ताहर

पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनरांगेतील भाविकांसाठी गोपाळपूर येथे दोन जर्मनी हँगर कार्यान्वित
गोपाळपूर येथून पददर्शन रांग सुरू केल्याने जवळपास तीन किलो मीटर पर्यंतचे दर्शन रांग यामध्ये राहणार आहे. तसेच आसरा हॉटेल जवळपास एक जर्मन हँगर कार्यान्वित असून दोन किलोमीटर पर्यंतची दर्शन रांग यामध्ये राहील. पददर्शन रांगेतील भाविकांसाठी दोन जर्मन हँगर कार्यान्वित केल्याने भाविकांना पददर्शन रांगेत जाण्यासाठी पाच कि.मी.चे अंतर कमी झाले आहे .

ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व मंदिर समिती चे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या प्रयत्नातून दोन जर्मन हँगर कार्यान्वित

महात्मा बसवेश्वर यांच्या कार्यावर अभ्यासक्रम सुरु करणार: कुलगुरु डॉ. महानवर


सोलापूर विद्यापीठात महात्मा बसवेश्वर अध्यासनाची बैठक!

सोलापूर, दि. 4- महात्मा बसवेश्वर यांचे मानवतावादी कार्य समाजातील सर्व घटकापर्यंत पोहचण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील महात्मा बसवेश्वर अध्यासनाच्यावतीने महात्मा बसवेश्वर यांचे जीवन आणि कार्यावर आधारीत अभ्यासक्रम सुरु करणार असल्याचे कुलगुरु प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी सांगितले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील महात्मा बसवेश्वर अध्यासन सल्लागार समितीची बैठक विद्यापीठाच्या राष्ट्रमाता जिजाऊ मॉसाहेब व्यवस्थापन परिषद सभागृहात कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला प्र-कुलगुरु प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, वित्त व लेखाधिकारी डॉ. महादेव खराडे, मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. वसंत कोरे, महात्मा बसवेश्वर अध्यासनाचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर उपस्थित होते.

यावेळी बैठकीत महात्मा बसवेश्वर अध्यासनाच्यावतीने अल्पकालावधीचे विविध अभ्यासक्रम तयार करणे आणि हे अभ्यासक्रम सर्व इच्छुकांना उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. महात्मा बसवेश्वर यांच्या जीवन आणि विचारावर आधारित असलेली ग्रंथ संपदा संकलीत करुन कायमस्वरुपी जतन करण्याचे निश्चित करण्यात आले. तसेच ग्रंथाचे मराठी, कन्नड आणि इंग्रजीमध्ये अनुवाद करण्याचा निर्णय घेण्यात आला. महात्मा बसवेश्वर विश्वसंवाद सदन आणि महात्मा बसवेश्वर आयुर्वेदिक उद्यान निर्माण करण्यासाठी प्र-कुलगुरु डॉ. लक्ष्मीकांत दामा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. महात्मा बसवेश्वर यांच्या कार्यावर आधारीत व्याख्याने, चर्चा, कार्यशाळा यांचे आयोजन करणे तसेच अध्यासन केंद्राच्या वतीने श्री सिध्देश्वर देवस्थान आणि महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील विविध संस्था महाविद्यालयासोबत सांमजस्य करार करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी दिली

यावेळी जेष्ठ समाजसेवक हेमंत हरहरे यांनी सर्व उपक्रमाचे कौतुक केले व सामाजिक प्रबोधनासाठी अध्यासन कार्य करत असल्याचे नमूद केले. बैठकीला महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्राचे सदस्य प्राचार्य गजानन धरणे, महादेव न्हावकर, स्वाती महाळंक, सुरेश शहापूरकर, राहुल पावले आदी उपस्थित होते.

फोटो ओळी
सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील महात्मा बसवेश्वर अध्यासन सल्लागार समितीची बैठक कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी प्र-कुलगुरु प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, वित्त व लेखाधिकारी डॉ. महादेव खराडे, मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. वसंत कोरे, महात्मा बसवेश्वर अध्यासनाचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख दर्शन

    पंढरपूर, दि ३ वार्ताहर :- राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख दर्शन घेतले.

 आषाढी यात्रा सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची दर्शन रांगेत मोठ्या प्रमाणात गर्दी असून भाविकांना सुलभ व जलद दर्शन व्हावे, त्यांना कोणताही अडथळा येऊ नये यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुखदर्शन घेतले 
 यावेळी त्यांच्या समवेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनीही श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख दर्शन घेतले. 

यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांचा शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला. यावेळी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन व संवर्धनाचे काम सुरू असून, झालेल्या कामांची पाहणी केली तसेच मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मंदिर जतन व संवर्धन कामाबाबतची माहिती यावेळी दिली.
तसेच यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचा सत्कारही मंदिर समितीच्या वतीने सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केला.
यावेळी आमदार समाधान आवताडे, राजू खरे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक मनोज श्रोत्री उपस्थित होते

*चौफाळा ते मंदिर उपमुख्यमंत्री गेले चालत.

चौफळा ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व मंदिर परिसर वाहन प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या अनुषंगाने मंत्री महोदय तसेच राज शिष्टाचार नुसार अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मंदिर समिती मार्फत वाहनांची उपलब्धता करण्यात आली आहे. परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंदिर व मंदिर परिसरात भाविकांची मोठ्या प्रमाणात असणारी गर्दी लक्षात घेता. भाविकांना कोणताही वाहतुकीचा त्रास अथवा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी चौफाळा ते मंदिर पर्यंत दर्शनासाठी चालत गेले.
*

श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी चार किलोची चांदी घागर अर्पण,

रामेश्वर कोरे पंढरपूर

( दि.26) वै.ह.भ.प. जयदेव हरी भोईर यांच्या स्मरणार्थ भोईर बंधू यांनी आज दि.26 जून रोजी 4 किलो 150 ग्रॅम वजनाची चांदीची घागर श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या चरणी अर्पण केल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
त्याबद्दल देणगीदार यांचा मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी श्रींची प्रतिमा व उपरणे देऊन येथोचित सन्मान केला. त्यावेळी विभाग प्रमुख संजय कोकीळ उपस्थित होते. या चांदीच्या घागरीचे सुमारे 4 किलो 150 ग्रॅम वजन असून, त्याची अंदाजीत रक्कम 4 लाख 33 हजार होत आहे. देणगीदार हे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे निस्सिम भक्त आहेत.सद्यस्थितीत, आषाढी यात्रा 2025 चा कालावधी सुरू असल्याने भाविकांची मंदिर परिसरात व दर्शन रांगेत गर्दी होत आहे. देणगीदार भाविकांना देणगी देण्यासाठी ज्यादा स्टॉलची निर्मिती करण्यात आली आहे. याशिवाय, सोने चांदीच्या स्वरूपातील वस्तू भेट स्वीकारण्यासाठी स्वतंत्र विभाग निर्माण करण्यात आला असून, त्यासाठी विभाग प्रमुख, लिपिक व अनुभवी सराफाची नियुक्ती करण्यात आली आहे. इच्छुक भाविकांनी देणगी व सोने-चांदी भेटवस्तू देण्यासाठी मंदिर समितीच्या कार्यालयात संपर्क करावा असे मंदिर समितीच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
..

शिवसेना कार्यकारी अभियंता कार्यालयात ठिय्या आंदोलन करणार.

निर्णय व मागण्या मान्य न झाल्यास,शिवसेना कार्यकारी अभियंता कार्यालयात ठिय्या आंदोलन करणार.

मुरुम -प्रतिनीधी)

दोन दिवसात पुलाचे कामाचा निर्णय व आमच्या मागण्या मान्य न झाल्यास,शिवसेना कार्यकारी अभियंता आणि अभियंता यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करणार.

चंद्रकांत टेंगे टोल(उपजिल्हाप्रमुख लातूर)जळकोट शिवसेनेचे तालुकाप्रमुख श्री. मुक्तेश्वर पाटील आणि शिवसेना जळकोट ची टीम मौजे-आतनूर ता.जळकोट तिरु नदीवरील पूल त्वरित चालू व्हावा आणि पर्यायी पुलाची उंची आणि लांबी लेखी पत्रावर लगेच वाढवावी यासाठी नदी पात्रात आमरण उपोषण चालू आहे.
हा पूल गेल्या वर्षी भर पावसाळ्यात पाडले,पर्यायी पूल एकदम छोटा केले पुसाळ्यात रहदारी खूप कठीण आहे, त्यामुळे गेल्या वर्षी पाऊसा मध्ये जळपास १ महिना आतनूर गावा सहीत १० गावचा संपर्क तुटला,मग शिवसेनेने जलसमाधी आंदोलनं केले त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने पर्यायी पुलाची उंची व लांबी ८ दिवसांत वाढवू,आणि पूल त्वरित पूर्ण करु असे लेखी पत्र दिले त्या पत्राला जवळपास वर्ष होत आहे,तरी तिथे एक इंच सुद्धा काम झालं नाही.
सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कंत्राटदारा मध्ये साटे लोटे चालू असल्याचा भास होत आहे,आणि काम खूप दिवस झाले पूर्ण बंद आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणते की कामाची मुदत संपत आली तरी कंत्राटदार ऐकत नाही.
जर आमच्या शिवसैनकाचं बर वाईट झालं तर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबधीत अधिकारी जवाबदार राहतील याची नोंद घ्यावी.

मांसविक्री व मद्यविक्री कायमची पंढरपूर येथून हद्दपार करा -विश्व हिंदू परिषद पंढरपूर

मांसविक्री व मद्यविक्री कायमची तीर्थक्षेत्र पंढरपुरातून हद्दपार करण्यासाठी विश्व हिंदू परिषद पंढरपूरचे आंदोलन

पंढरपूर ता. २३

मांसविक्री आणि मद्यविक्री तीर्थक्षेत्र पंढरपूर मधून हद्दपार करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सोमवारी जन आक्रोश आंदोलन करण्यात आले.

भारताची दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे तीर्थक्षेत्र पंढरपूर मध्ये आषाढीवारी साठी पंढरपूर मध्ये फक्त १० दिवसांसाठी मांस विक्री आणि मद्यविक्री बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकार काढणे आहेत परंतु विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पंढरपूरमध्ये अनेक वेळा आषाढी यात्रेमध्ये मांस विक्री व मद्यविक्री चालू असते हे पंढरपूर येथील नागरिकाच्या निदर्शनास आले म्हणून तीर्थक्षेत्र पंढरपुर शहरातून कायस्वरूपी मांस विक्री आणि मद्य विक्री पूर्ण बंद करावी अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आले.

तसेच 350 वर्षे पेक्षा अधिककाळ आषाढी वारी ही परंपरा चालत आहे या यात्रेमुळे भक्तीचा सागर आळंदी – देहूहून पंढरपूरला पायी चालत येतो या वारकऱ्यांच्या दिंडीमुळे त्रास होतो असं बोलणाऱ्या मंद व्यक्तीच्या विरोधात विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने जन आक्रोश आंदोलन करण्यात आले.

वरील सर्व मागण्यांचे निवेदन पालकमंत्रीना देण्यात आले. या आंदोलनच्यावेळी विश्व हिंदू परिषदे पश्चिम महाराष्ट्र प्रांत समरसतेचे सदस्य रवींद्रजी साळे , जिल्हा मंत्री शिवाजीराव जाधव, सहमंत्री गोपाळ सुरवसे, बजरंग दल जिल्हा संयोजक श्रीनाथ संगीतराव , भाग्यश्री लिहिणे, गंभीरेताई, अक्षय मेनकुदळे, गोपाळ सुगंधी,जय सुरवसे अभंगराव, मलशेट्टी, शुभम करकमकर, गणेश महाराज तसेच आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

महात्मा बसवेश्वर पतसंस्था सहकार समृद्धी पॅनलचे सर्व उमेदवार बहुमताने विजयी

मुरूम, ता. उमरगा, ता. २१ ( प्रतिनिधी) : येथील महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या पतसंस्थेने गेल्या पंधरा वर्षात एकदाही निवडणुक झाली नाही. सलग तीन टर्म बिनविरोध संचालक मंडळ निवडून येऊन कार्यरत राहिले. प्रथमच या पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणुक जाहीर झाली.

शनिवारी (ता. २१) रोजी प्रतिभा निकेतन विद्यालय मतदान केंद्रात दुपारी चार वाजेपर्यंत मतदान पार पडले. मतदानानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास मत मोजणीला प्रारंभ करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी बी. व्ही. काळे यांनी निकाल जाहीर केला. महात्मा बसवेश्वर पतसंस्था सहकार समृद्धी पॅनलने दणदणीत विजय मिळविला. या पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार अधिक मताधिक्यांनी विजयी झाले आहेत. या निवडणुकीत महात्मा बसवेश्वर पतसंस्था सभासद विकास पॅनल व महात्मा बसवेश्वर पतसंस्था सहकार समृद्धी पॅनल हे आमने-सामने निवडणुकीच्या रिंगणात होते. दोन्ही पॅनलने निवडणूक कालावधीमध्ये एकमेकांसमोर आरोप-प्रत्यारोप करत निवडणूक लढविली. परंतु विद्यमान संचालकावर मतदारांनी अधिक विश्वास ठेवून या निवडणुकीत प्रतिस्पर्धी पॅनलला पराभूत केले. या निवडणुकीत महात्मा बसवेश्वर पतसंस्था सहकार समृद्धी पॅनलचे प्रमुख चंद्रशेखर मुदकण्णा व विद्यमान चेअरमन शिवशरण वरनाळे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविण्यात आली. या निवडणुकीत सर्वसाधारण मतदार संघातून जाधव कमलाकर काशीनाथराव, पाटील बाबासाहेब मल्लिनाथ, बिराजदार श्रीशैल सिद्रामप्पा, मुदकण्णा मनिष लिंबणप्पा ,मुदकण्णा शरणप्पा सिद्रामप्पा, वरनाळे अमृत भिमराव, वरनाळे शिवशरण गुरुलिंगप्पा, समन शिवराज हुवण्णा, सर्वसाधारण महिला राखीव मतदार संघातून जाधव संगीता अशोक, सोनवणे वंदना भागवत, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून लोखंडे इंद्रजित सिद्राम, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागासवर्गीय मतदार संघातून बोंदर मनोज मारुती तर इतर मागासवर्गीय मतदार संघातून हिरमुखे अनंत सायबण्णा हे विमान चिन्ह घेऊन १३ पैकी १३ जागेवरती निवडून आले आहेत. विजयी पॅनलचे विमान चिन्ह म्हणजे विकास, वेग आणि विश्वास यावर मतदार राजाने विश्वास ठेवून सर्वच्या सर्व उमेदवारांना निवडून दिले. तर प्रतिस्पर्धी महात्मा बसवेश्वर पतसंस्था सभासद विकास पॅनलचे प्रमुख बसवराज वरनाळे यांच्या नेतृत्वाखाली सदर निवडणूक लढविण्यात आली होती. पराभूत उमेदवारमध्ये गायकवाड आप्पाराव शिवाजी, तुगावे शिवानंद भोजप्पा, पठाण मन्नान मूर्तझाखान, बिराजदार गुंडप्पा चन्नप्पा, मुदकण्णा बसवराज रामचंद्र, वरनाळे बसवराज गुरुलिंगप्पा, शिंदे रविराज नारायण, शिरसे दत्तात्रय शंकर, कंटेकुरे शिवलीला विकास, हत्तरगे मिनाक्षी सिद्धाराम, बोडरे मारुती सुभाना, घोडके संतोष मोतीराम, स्वामी योगेश कपिलेश्वर यांना पराभवाला सामोरे जावे लागले. निकाल जाहीर झाल्यानंतर नूतन संचालक, सभासद व कार्यकर्त्यांनी जल्लोष-घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा करून गुलालाची उधळण करून अतिशबाजी केली. दरम्यान माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या उमरगा येथील कार्यालयात सर्व नूतन संचालकांचा ज्ञानराज चौगुले, युवा नेते किरण गायकवाड, भिमराव वरनाळे ॲड. आकांक्षा चौगुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. फोटो ओळ : उमरगा ता. उमरगा येथे ज्ञानराज चौगुले यांच्या कार्यालयात सर्व नूतन सदस्यांचा सत्कार करताना ज्ञानराज चौगुले, आकांक्षा चौगुले, भिमराव वारनाळे, शिवशरण वरनाळे व अन्य.

error: Content is protected !!