कोरेगाव
(माणदेशी न्यूज वृत्तसेवा)–
तक्षशिला सामाजिक सेवा संस्था सातारारोड पाडळी आयोजित दि.02 ऑक्टोबर 2025 रोजी अशोक विजयादशमी व 69 वा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रबोधन सम्मेलनाचा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाचे उद्घाटक मा.प्रिया नप्ते मॅडम (आंतरराष्ट्रीय बाल प्रबोधनकार पुणे महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे व कार्यक्रमाची अध्यक्षता मा.श्रीकांत दादा होवाळ सर (राज्य कार्याध्यक्ष भारतीय स्वाभिमानी संघ महाराष्ट्र प्रदेश) हे करणार आहेत प्रमुख वक्ते मा.ॲड तेजस माने (जिल्हा व सत्र न्यायालय सातारा) मा.इंजि तुषार मोतलिंग सर (विभागीय पुर्ण कालिन प्रचारक BKS,BSS पश्चिम महाराष्ट्र) मा.ॲड प्रथमेश ठोंबरे (दिवाणी व फौजदारी कनिष्ठ स्तर न्यायालय कोरेगाव) हे समाजातील ज्वलंत विषयांवरती प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.
प्रमुख अतिथी मा.आशा आवडे (माजी सभापती पंचायत समिती कोरेगाव) मा.विजया खरात (जिल्हाध्यक्ष लहुजी शक्ती सेना महिला आघाडी सातारा) मा.सारिका आवडे (माजी सचिव भारतीय बौद्ध महासभा महिला आघाडी कोरेगाव) हे असणार आहेत.
कार्यक्रमाचे संयोजक मा.श्रीकांत आवडे (अध्यक्ष नवतरुण मंडळ) मा.अमोल आवडे (उपाध्यक्ष तक्षशिला नवतरुण मंडळ) मा.प्रज्वल आवडे (अध्यक्ष तक्षशिला सामाजिक सेवा संस्था सातारारोड पाडळी) मा.सचिन आवडे (सचिव तक्षशिला सामाजिक सेवा संस्था सातारारोड पाडळी) तसेच बहुजन समाजातील जास्तीत जास्त सदस्यांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन मा.चेतन आवडे (उपाध्यक्ष तक्षशिला सामाजिक सेवा संस्था सातारारोड पाडळी) यांनी केले आहे.
