औंध प्रतिनिधी -ओंकार इंगळे
औंध : औंध तालुका खटाव जिल्हा सातारा येथील औंध संस्थान शी कायम कट्टर आणि प्रामाणिक राहिलेला एक कट्टर कार्यकर्ता दिलीप बापू पवार आज काळाच्या पडद्या आड झाले असून संपूर्ण औंध तर पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.
अतिशय शांत स्वभाव असणारे दिलीप पवार यांनी औंधकरांच्या मनावर राज्य केले होते. त्यानचा व्यवसाय मंडप डिकोरेट याचा होता पण व्यवसाय करत असताना त्यांनी कधीच जास्त पैसे कमवता येल याचा विचार केला नाही. येल त्या लोकांना परवडेल त्या व्यवहारात ते कामे घेत. कधी कुणाला पैशा साठी जास्तीची सक्ती नाही.तर सगळीकडे लोकांना आपलेपणाची वागणूक देत असत. सर्व गाव त्याना (मा ) नावाने बोलवत असत. कायम सिगारेट ओढत सर्वांशी बोलताना कायम चेहऱ्यावर एक स्मित हास्य असणारा. गावात जोतिबा डोंगरावर पुजा असू किंवा गावातील गणपती उस्तव असू यावेळी मात्र मा मंडळातील पोरांना काय लागले तर सांगा रे आणि माजा कडून साहित्य घेऊन जा असे म्हणणारे मा आज आपल्यात नाहीत याची उणीव कायम औंधकरांना भासेल. खरे तर आशी उधार मनाची माणसे आपल्याला सोडून चाललीत याची पोकळी कधी ही भरून निघणारी नसते. अशा या प्रेमळ मा ला संपूर्ण औंधकारांन कडून भावपूर्ण श्रद्धांजली.