दत्त जयंती उत्सवाला पाच सर्कल व पाच सर्कलवाडी, साखरवाडी येथे प्रारंभ

Spread the love

दत्त जयंती उत्सवाला पाच सर्कल व पाच सर्कलवाडी, साखरवाडी येथे प्रारं

मायणी प्रतिनिधी——दत्त जयंती उत्सवाला पाच सर्कलवाडी साखरवाडी येथील स्वयंभू श्री दत्त मंदिर येथे आठ डिसेंबर पासून प्रारंभ झाला असून दत्त जन्म सोहळ्यानिमित्त अनेक धार्मिक कार्यक्रम तसेच अनेक सामाजिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती श्री परमपूज्य उमेशानंद महाराज सरस्वती यांनी दिली दिनांक आठ पासून गुरुचरित्र पारायण, काकड आरती दत्त, श्री दत्त उपासना, नवचंडी याग, श्री सत्य दत्त कथा सत्यनारायण महापूजा, पालखी सोहळा, इत्यादी कार्यक्रम भव्य स्वरूपात पार पडले असून शनिवार दिनांक 14 रोजी दत्त जयंती निमित्त पहाटे पाच ते सात अभिषेक महापूजा, सकाळी आठ ते नऊ मधु करी, सकाळी नऊ ते दहा गोस्वान अश्व अश्व वृक्ष, आधी पूजन 9 ते 12 दत्तयाग सकाळी बारापासून महाप्रसाद स्वयंभू दत्त मंदिर सेवा संस्थांमार्फत रक्तदान शिबिर, रक्ताच्या सर्व प्रकारच्या चाचण्या, डोळे तपासणी व मोतीबिंदू तपासणी शिबिर मोफत सर्व रोग कॅन्सर तपासणी वृक्षारोपण अधिक कार्यक्रम पार पडणार असून सायंकाळी सहा वाजता दत्त जन्म व महाआरती असे भव्य कार्यक्रम होणार आहेत तरी भक्तांनी भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वयंभू दत्त मंदिर सेवा मंडळ यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!