– लोणावळा येथील ऐतिहासिक सहकार परिषद सोहळ्यात संस्थेच्या कार्याचे कौतुक!
*विटा : येथील शिवप्रताप मल्टिस्टेट ला आपल्या उत्कृष्ट कार्यासाठी आणि ग्राहकांना विश्वासार्ह दिलेल्या सर्वोत्तम सेवा व सुविधा याबद्दल *”बँको ब्लू रिबन 2025″* पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लोणावळा येथील दिमाखदार सहकार परिषद सोहळ्यात या पुरस्काराचे माजी सहकार आयुक्त श्री. चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

शिवप्रताप मल्टिस्टेट च्या सर्व शाखांमध्ये कर्मचारी येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांच्या वित्तीय गरजा समजावून घेऊन उत्तम सेवा देण्याचे कार्य करत आहेत. संस्थेने ग्राहकांना आर्थिक सुरक्षितता, डिजिटल बँकिंग आणि छोट्या व्यवसायांना कर्ज मिळवून देणे व ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित ठेवणे यासारख्या विविध उपक्रमांचा मोठ्या प्रमाणात विस्तार केला आहे.
कार्यकारी संचालक मा.विठ्ठलराव साळुंखे यांनी यावेळी संस्थेच्या भविष्यातील योजनांची माहिती देत आगामी काळात संस्था नवीन डिजिटल बँकिंग सेवांमध्ये सुधारणा करणार असून ग्राहकांच्या सुलभतेसाठी अनेक ग्राहक सेवा केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.“आमचा मुख्य उद्दिष्ट ग्राहकांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी सर्वोत्तम डिजिटल सेवा देणे आहे.”
शिवप्रताप मल्टिस्टेट केवळ एक वित्तीय संस्था नाही, तर ती ग्राहकांच्या आर्थिक जीवनात एक विश्वासार्ह भागीदार बनली आहे. संस्था ग्राहकांना सर्वसमावेशक सेवा देण्यासाठी तत्पर आहे, ज्या मध्ये नवीन बचत खाती, डिजिटल बँकिंग, कर्ज सुविधा, विमा पॉलिसी, UPI QR, यासारख्या सुविधा उपलब्ध असल्याचे सांगितले.
“आपली संस्था केवळ बँकिंग सेवा पुरवत नाही, तर आम्ही समाजातील प्रत्येक घटकासाठी आर्थिक साक्षरता आणि आर्थिक सक्षमतेला प्रोत्साहन देत असल्याचे व हा सन्मान संस्थेचे संस्थापक स्व .प्रतापशेठ(दादा)साळुंखे यांच्या आशीर्वादाने, सर्व संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांच्या कठोर परिश्रमाचा, ग्राहकांच्या विश्वासाचा आणि संस्थेच्या विकासाचा ठसा आहे. आम्ही आपल्या विश्वासावर उभे राहून या यशाचा आनंद साजरा करत असल्याचे चेअरमन मा. शेखर साळुंखे यांनी सांगून सर्व सभासद, कर्मचारी, आणि ग्राहक यांचे धन्यवाद व्यक्त केले.
यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन मा. हणमंतराव सपकाळ, सौ. नंदा सपकाळ, गणेश बाबर, विशाल चव्हाण, नितीन गोतपागर महाराष्ट्रातील विविध संस्थांचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.