म्हसवड ,मणकर्णवाडी (वार्ताहर):
माण तालुक्यातील मणकर्णवाडी येथील लोणारवस्ती परिसरात तीन शेळ्या चोरीला गेल्याची घटना घडली असून, याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर हकिगत अशी आहे की, दिनांक १९ जुलै २०२५ रोजी रात्री ११.५० ते २० जुलै सकाळी ६.३० च्या सुमारास, फिर्यादी सौ. कविता राहुल गेंड (वय ३५, रा. मणकर्णवाडी, ता. माण) यांच्या राहत्या घरा शेजारी असलेल्या लोखंडी जाळीच्या वाघराचे कुंपण अज्ञात व्यक्तीने कापले.
त्या वाघरातून एक काळी गाभण शेळी (वय अंदाजे १ वर्ष), एक पांढरी शेळी (वय ४ वर्षे) आणि एक काळी-पांढरी शेळी (वय ६ वर्षे) असा एकूण अंदाजे १५,०००/- रुपये किंमतीचा माल चोरून नेण्यात आला.
या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात गुरनं. २४३/२०२५, BNS 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोहवा खाडे (मो. ८९९९२८५४५५) हे करत असून, API सोनवणे (मो. ९९७०७१७७१२) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
फिर्यादीने अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार दिली असून, पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
Leave a Reply