Advertisement

जादा दराने खत विक्री , म्हसवड पोलीसात खत विक्रेत्यांवर गुन्हा दाखल.

म्हसवड (वार्ताहर)-
शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानित युरिया खताची ज्यादा दराने विक्री व इतर खतांची बेकायदेशीर विक्री करून शेतकरी व शासनाची फसवणूक केल्याबद्दल म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे.
कृषी अधिकारी श्रीमती शितल रामचंद्र घाडगे वय 28 वर्षे, व्यवसाय- नोकरी, पदनाम- कृषी अधिकारी (गुण नियंत्रण) तालुका कृषीअधिकारी दहिवडी रा. तुपेवाडी रोड दहिवडी ता.माण जि.सातारा पथकाने धाड टाकून जादा दराने युरीया विक्री करणाऱ्या विक्रेते यावर म्हसवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

म्हसवड ता.माण गावचे हद्दीत मे.बाप्पा.कृषी सेवा केंद्र म्हसवड ता.माण या ठिकाणी चौकशी व तपासणी करणे कामे जिल्हास्तरीय भरारी पथक सातारा अध्यक्ष श्री. गजानन ननावरे ,कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद सातारा व श्री.संजय फरतडे जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक सातारा यांची समवेत गेलो होतो. तेव्हा दुकानदार मध्ये दुकान मालक मंगेश अशोक सावंत रा. म्हसवड ता.माण जि.सातारा, कामगार-रोहन खांडेकर हे व खत खरेदी करणेकरिता आलेले शेतकरी उपस्थित होते. तेव्हा आमचे समक्ष युरिया खताची 300/- रुपये प्रती गोणी प्रमाणे विक्री व त्यासोबत इतर निवीष्ठांचे लिंकींग होत असल्याचे निदर्शनास आले.
तसेच त्यांचेकडे आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसलेने शेतक-यांना दिला जाणारा अनुदानित युरिया खताची ज्यादा दराने विक्री व त्यासोबत इतर खतांची लिंकींगद्वारे विक्री करुन शेतकरी व शासनाची फसवणुक केल्याने माझी मंगेश अशोक सावंत रा. म्हसवड ता.माण जि.सातारा यांचे विरुद्ध तक्रार आहे अशी तक्रार दाखल केली आहे.
यानुसार सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार एन एन पळे अधिक तपास करत आहेत.
…..

वरकुटे येथे जुगार खेळताना ११ जण अटकेत,३लाख १२ हजार रुपये जप्त.

म्हसवड पोलिसांची अवैध धंद्यांच्या अनुषंगाने पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई

म्हसवड (वार्ताहर)-
सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी स्टाफसह वरकुटे मलवडी येथील जुगार अड्ड्यावर छापा मारून 3 लाख 12 हजार 670 रुपयाचा जुगार साहित्य, रोख रक्कम आणि मोटरसायकल मुद्देमाल जप्त करून 11 आरोपींना केली अटक केली आहे.

सविस्तर हकीकत
*मौजे वरकुटे मलवडी तालुका मान गावचे हद्दीत सिद्धार्थ विश्वनाथ बनसोडे यांच्या घराच्या आडोशाला काही इसम तीन पाणी पत्त्यावर पैंज म्हणून जुगार खेळत असले बाबत गोपनीय माहिती काढून तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी पोलीस स्टाफसह वरकुटे मलवडी येथील प्राप्त माहितीच्या ठिकाणी छापा मारून जुगार खेळणाऱ्या 11 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर म्हसवड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 12 अ प्रमाने गुन्हा दाखल केलेला असून यामध्ये 3 लाख 12 हजार 670 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

सदरची कामगिरी ही सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी सर,अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पोलिस अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेली आहे.*

सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे, अमर नारनवर, देवानंद खाडे, रूपाली फडतरे, जगन्नाथ लुबाळ, नवनाथ शिरकुळे, अनिल वाघमोडे, सतीश जाधव, श्रीकांत सुद्रिक, पोलीस मित्र नारनवर यांनी या कारवाईत भाग घेतला.

या गुन्ह्यातील आरोपींची नावे खालील प्रमाणे आहेत.

ट्रिपच्या नावाने 15 लाखांची फसवणूक


ट्रिपच्या नावाने 15 लाखांची फसवणूक
सातारा : उत्तर आणि दक्षिण भारत तसेच दुबईत कंपनीची ट्रीप जाणार आहे, म्हणून बुकींगसाठी पैसे घेऊन 15 लाखांची फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात सहा जणांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयवंत रामचंद्र वारागडे (वय 59, रा. शनिवार पेठ, सातारा) यांनी तक्रार दिलेली आहे. त्यानुसार मयुरेश वाघ, काजल निमसे, सपना वाघ, शुभांगी कदम, अनुजा आणि सुवर्णा भालेराव (संपूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

२० हजारांची लाच घेताना उपनिरीक्षक व हवालदार जाळ्यात.

सातारा ता,५(प्रतिनिधी) अत्याचाराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी वाई पोलीस ठाण्यात चक्क २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. सातारा लाच लुचपत प्रतिबंध विभागाचे उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या सापळा कारवाईन पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक व हवालदार यांची खाबूगिरी चव्हाट्यावर आली. सातारा जिल्ह्यात वैविध्यपूर्ण कारवाई करून पोलीस दलाची मान राज्यात उंचावली असल्याचे एका बाजूला चित्र असताना दुसऱ्या बाजूला दक्षिण काशी म्हणून नावलौकिक प्राप्त वाईत अत्याचारासारखा गंभीर गुन्हा दाखल न करण्यासाठी वीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली जाते. ही दुर्दैवी बाब धक्कादायक रित्या समोर आली. यामुळे संपूर्ण पोलीस दलात एकच खळबळ उडाली तसेच लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या कारवाईने त्या संबधित पोलीसांच्या खाबूगीरीची लक्तरे वेशीवर टांगली गेली. अत्याचार झाला त्याचं पुढं काय होणार ? याबातच्या चर्चा संपूर्ण दक्षिण काशी मध्ये सुरू झाल्या. गुन्हा दाखल न करण्यासाठी वाई सोबत अन्यत्र सुरू असलेल्या खाबूगिरीला यापुढे चाप बसणार का? असा प्रश्न देखील यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
वाई पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक व हवालदार यांनी चक्क २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी तक्रारदार यांच्याकडे केली. १५ हजार रुपये स्वीकारताना सापळा कारवाईत दोघांना रंगेहात पकडण्यात आले. संशयित बिपीन बाळकृष्ण चव्हाण पोलीस उपनिरीक्षक,संशयित उमेश दत्तात्रय गहीण पोलीस हवालदार यांना याप्रकरणी ताब्यात घेतलं असून. लाच लुचपत प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,
सातारा लाच लुचपत प्रतिबंध विभागाचे उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्याकडे वाई पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी लाचेची मागणी केली असल्याची तक्रार प्राप्त झाली. तक्रारीच्या पडताळणीमध्ये तक्रारदारास शिवीगाळ दमदाटी करून हाताने चापटी मारून अटक करण्याची भिती दाखवून लाच मागणीस प्रोत्साहन दिले. असल्याची बाब समोर आली. तक्रारदार यांनी लाच मागणीस होकार दर्शवताच त्यास सांगेल तेव्हा साक्षीदार व्हायचं असे बोलून लाच मागणीस प्रोत्साहन दिले असल्याची माहिती लाच लुचपत प्रतिबंध विभागाने माध्यमांना प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केली.
सातारा लाच लुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांनी पथकातील पोलीस हवालदार नितीन गोगावले. गणेश ताटे,निलेश राजपुरे यांच्यासह वाई पोलीस ठाणे हद्दीत सापळा कारवाई केली. यामध्ये पोलिस उपनिरीक्षक व हवालदार १५ हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ सापडले. त्याना चौकशी कामी ताब्यात घेत त्यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंध अधिनियमा नुसार गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सातारा लाच लुचपत प्रतिबंधचे उपअधीक्षक राजेश वाघमारे व टीमचे या करवाईबद्दल अभिनंदन होत आहे.

म्हसवड पोलीसांनी धाड टाकूनदारू व ताडी विक्रेत्यांना केली अटक

सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांचा अवैध दारू, ताडी विक्री धंद्यांवरील कारवाईचा धडाका सुरूच

180 लिटर ताडी आणि देशी-विदेशी दारू जप्त करून एकाच दिवसात 3 ठिकाणी कारवाई आणि आरोपींवर गुन्हे दाखल.

म्हसवड (वार्ताहर):-
सपोनि अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसवड पोलीसांनी दारू व ताडी विक्रेत्यांना अटक केली असून दारू व ताडी मुद्देमाल जप्त केला आहे.

‘ग्रीन कॉरिडॉर’ कोयना विभागात बेसुमार वृक्षतोड, लाकडाच्या मोळ्या रस्त्यावर

‘ग्रीन कॉरिडॉर’ कोयना विभागात बेसुमार वृक्षतोड, लाकडाच्या मोळ्या रस्त्यावर


(अजित जगताप)
कोयना नगर दि.
सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेस असणाऱ्या व्याघ्र प्रकल्प लगतच्या पाटण तालुक्यात ग्रीन कॉरिडॉर मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे.वनविभाग परवानगी देत असलेले लाकडाच्या मोळ रस्त्यावर दिसत आहे.
अटी व नियम धाब्यावर बसवून पाटण तालुक्यातील लेंढोरी,तळीये, रिसवड,ढाणकल येथे वृक्षतोड झाली आहे.त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे.
‘झाडे लावा झाडे जगवा’ हा संदेश वन विभागाने सार्वजनिक ठिकाणी व भिंतीवर दिला आहे. निसर्ग सौंदर्याने आकर्षित झालेला कोयना विभागात वनविभागाच्या देखरेखी पेक्षा या ठिकाणी लाकडाची वखार आहे की काय? अशी शंका येते.
पाटण तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली आहे.कोयना धरण व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामुळे कोयना परिसराचे नाव जगाच्या नकाशावर पोहोचले. तर दुसऱ्या बाजूला वृक्षतोडीमुळे अनेक ठिकाणी सिमेंटचे जंगल उभे राहिलेले आहे.
कोयना खोऱ्यामध्ये आयुर्वेदिक क्षेत्रात महत्व प्राप्त झालेली अनेक औषधी व दुर्मिळ झाडपाला आहे. याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्रीन कॉरिडॉर असल्याने वन्यजीव वन्य पक्ष्यांचा अधिवास मोठ्या प्रमाणात आहे. वन्य प्राणी व पक्षी यांच्या नैसर्गिक साखळीचा घटक पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत करीत आहे. मात्र यावरच सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणात कुऱ्हाड चालवली जात आहे.
पश्चिम घाट, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प , कोयना अभयारण्य व चांदोली अभयारण्य पर्यंत हा ग्रीन कॉरिडॉर आहे.पर्यावरणाच्या दृष्टीने समृद्ध असलेला हा भाग वन्यजीव व पक्षांसाठी महत्त्वाचा आहे. विविध पक्षांचे प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात आधिवास या ठिकाणी आहे मात्र कोयना विभागात होणाऱ्या वृक्षतोडीमुळे हा “ग्रीन कॉरिडॉर” सध्या धोक्यात आला आहे. त्यामुळे नियम धाब्यावर बसवून वृक्षतोड करणाऱ्या लाकूड तस्करांवर कारवाई करावी. अशी मागणी पर्यावरण प्रेमी नेहमीच करत असतात. मात्र, कुऱ्हाडीचा दांडा गोट्यास काळ अशी वनविभागाची नवीन ओळख झाली आहे.

_

फोटो– पाटण तालुक्यात वन विभागाच्या हद्दीमध्येच तोडलेल्या लाकडाच्या मोळ्या..

संजय करचे खूनातील आरोपींवर कारवाई करावी, या मागणीसाठी २३ रोजी वडूज येथील तहसील कार्यालयावर मोर्चा


कै. संजय पांडुरंग करचे यांच्या पाठीमागे पत्नी, वृद्ध वडील व दोन मुली आहेत. ते त्यांच्या कुटुंबाचा एकमेव आधार होते.
कै‌ संजय पांडुरंग करचे यांचा खंडणीसाठी केलेला हा निर्घृण खून असून ही मस्साजोग प्रकरणाची पुनरावृत्ती आहे. एवढ्या गंभीर प्रकरणाची फिर्याद द्यायला गेलेल्या करचे कुटुंबियांना वडूज पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. घनश्याम सोनावणे यांनी अतिशय हीन वागणूक देऊन दिवसभर पोलीस स्टेशन मध्ये बसवून ठेवले व खुनाचा गुन्हा नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली. करचे कुटुंबीय फिर्याद देण्यासाठी वडूज पोलीस स्टेशनला आले. तेव्हा त्याठिकाणी आरोपींचे १०० ते १५० समर्थक उपस्थित होते. संजय पांडुरंग करचे खून व खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल होऊनही आजपर्यंत एकाही आरोपीला वडूज पोलिसांनी अटक केलेली नाही. वडूज पोलीस हे राजकीय दबावापोटी संजय पांडुरंग करचे यांच्या खून्यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असून तपासात मुद्दामहून दिरंगाई करत असून या गंभीर खून व खंडणी प्रकरणात आरोपींना मदतच करीत आहेत. म्हणूनच याच्या निषेधार्थ खालील मागण्यासाठी आम्ही सोमवार दि. २३/०६/२०२५ रोजी वडूज तहसीलदार कार्यालयावर मूक मोर्चा काढणार आहोत.

दहिवडी प्रतिनिधी : जयराम शिंदे
:मस्साजोगची पुनरावृत्ती असलेल्या संजय करचे खंडणी व खून प्रकरणात वडूज जिल्हा सातारा पोलिस आरोपीना पाठीशी घालत असल्याच्या निषेधार्थ मूक मोर्चा निवेदन सातारा पोलिस अधीक्षक यांना दिलेसंजय पांडुरंग करचे राहणार पिंपरी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर हे दिनांक १५/०६/२०२५ रोजी नातेपुते येथून सांगलीकडे आपल्या पिकअप वाहनातून कांदे घेऊन जात असताना खटाव तालुक्यातील बनपुरी या गावी त्या परिसरातील काही गावगुंडांनी त्यांच्या गाडीला दुचाकी गाडी आडवी मारून तू आम्हाला कट का मारलास, आमच्या लोकांना लागलं आहे. असे म्हणत दवाखान्यात जाण्यासाठी खर्चासाठी एक लाख रुपयांची मागणी केली. परंतु संजय करचे यांनी ही मागणी मान्य केली नाही. व आपली गाडी सांगलीकडे मार्गस्थ केली असता त्या गावागुंडानी आपल्या काही सहकाऱ्यांना फोन करून बोलावून घेऊन संजय करचे यांची गाडी अडवून पैशाची मागणी केली. आणि त्यांनी नकार देताच सुमारे १० ते १५ लोकांनी त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा पाय मोडला. संजय करचे यांच्या छातीवर त्या लोकांनी एवढ्या उड्या मारल्या कि त्यांच्या छातीच्या पिंजरा अक्षरशः मोडला. त्यांचा गुडघा मोडला. त्यांनंतरही त्यांना लोखंडी रॉड, लाकडी दांडके, लाथा, बुक्क्या, दगड याच्या साह्याने अगदी बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण केली. या मारहाणीचे व्हिडिओ चित्रीकरणही त्या गावागुंडांनी केले आहे.या मारहाणी वेळी त्या परिसरातील एक पोलीस पाटील उपस्थित होते. या अमानुष मारहाणीमुळे संजय करचे यांचा ग्रामीण रुग्णालय म्हसवड येथे उपचारदरम्यान मृत्यू झाला.

१) कै. संजय पांडुरंग करचे यांचा खून व खंडणी प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करा.

२) कै. संजय पांडुरंग करचे खून व खंडणी प्रकरणाचा तपास जलद व निष्पक्ष करा.

३) कै.संजय पांडुरंग करचे खून व खंडणी प्रकरणात पीडितांच्या कुटुंबियांना हीन वागणूक देणाऱ्या व तपासात मुद्दामहून दिरंगाई करणाऱ्या वडूज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. घनश्याम सोनावणे यांना तात्काळ निलंबित करा.या मागणीसाठी शुक्रवार दिनांक २०/०६/२०२५ रोजी सातारा पोलीस अधीक्षक डीएसपी व सातारा जिल्हाधिकारी यांना लोणारी समाजातर्फे निवेदन देण्यात आले
यावेळी सर्वश्री उमाजी नाना ढेंबरे, हरिभाऊ खंडेराव पाटसकर, संदीप होळकर, गणेश चोरगे, पितांबर आटपाडकर, नितीन गळवे, महेश करचे, निलेश शरद चोरगे उपस्थित होते.

म्हसवड पोलीस स्टेशन बेस्ट डिटेक्शन ऑफ द मंथ सर्वोत्कृष्ट गुन्हे प्रकटीकरण पुरस्काराने सन्मानित

म्हसवड पोलीस स्टेशन बेस्ट डिटेक्शन ऑफ द मंथ सर्वोत्कृष्ट गुन्हे प्रकटीकरण पुरस्काराने सन्मानित

म्हसवड (वार्ताहर)-
सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार जोशी सर आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम यांच्या हस्ते बेस्ट डिटेक्शन बद्दल म्हसवड पोलीस ठाण्याचा गौरव

सविस्तर वृत्त

*म्हसवड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 106/25 हा दरोड्याचा गुन्हा म्हसवड पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. यामध्ये तक्रारदार यांना अज्ञात 6 ते 7 अनोळखी लोकांनी मोटरसायकल वरून येऊन त्यांना लोखंडी रॉड तसेच बंदूक, तलवार व कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील पाच लाख 12 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम दरोडा टाकून घेऊन गेले बाबत तक्रार दाखल झालेली होती. या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याच्या तपासात सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि स्टाफने आरोपींच्या शोधाकरिता पेट्रोल पंप, हॉटेल, ढाबे, दुकाने, घरे अशा ठिकाणी लावलेले 25 पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे तपासून तसेच तांत्रिक विश्लेषण करून तसेच अशा पद्धतीने गुन्हे करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपींची माहिती घेऊन अवघ्या 4 तासात हा दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणून या गुन्ह्यातील सर्व 7 दरोडेखोरांना अटक करून त्यांच्याकडून दरोडा टाकून चोरून घेऊन गेलेले 5 लाख 12 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम हस्तगत करून सातारा जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार जोशी सर,अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम यांच्या हस्ते म्हसवड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि पोलीस स्टाफला बेस्ट डिटेक्शन ऑफ द मंथ म्हणजेच सर्वोत्कृष्ट गुन्हे प्रकटीकरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.

दागिने चोरणाऱ्या आरोपीस दोन तासात अटक,सपोनि अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

म्हसवड वार्ताहर
मुलांचे ऍडमिशन करण्याच्या बहाण्याने शाळेत येऊन शिक्षिकेचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आरोपीस अवघ्या दोन तासात अटक करून जमिनीत पुरून ठेवलेले सोन्याच्या दागिन्यांचा 1 लाख 15 हजार रुपये किमतीचा शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपी मनोज सुरेश घमंडे (वय 40 वर्ष ) राहणार धामणी यास अटक केली आहे.

शाळा सुरू झालेल्या पहिल्याच दिवशी जिल्हा परिषद शाळा पळशी येथील शिक्षिकेच्या पर्स मधून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या अनोळखी आरोपीस अवघ्या 2 तासात अटक करून चोरीस गेलेला सोन्याचा शंभर टक्के जमिनीत पुरून ठेवलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना यश आले आहे.

हकीकत

*जिल्हा परिषद शाळा पळशी येथील शिक्षिका प्रतिभा शरद कुल यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात त्यांचे सोन्याचे दागिने अज्ञात इसमाने चोरून घेऊन गेले बाबत चोरीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ तपासाची चक्रे फिरवली असता शाळेतील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता त्यामध्ये एक अज्ञात इसम शिक्षकांच्या स्टाफ रूम मध्ये येऊन त्यांनी या शिक्षिकेच्या पर्सच्या आतमध्ये ठेवलेल्या पॉकेटची चैन उघडी करून त्यामधील सोन्याच्या रिंगा, सोन्याची साखळी, सोन्याची अंगठी चोरून घेऊन गेलेले दिसले. या अनुषंगाने तात्काळ सीसीटीव्ही फुटेज मधील दिसणाऱ्या व्यक्तीच्या शोधासाठी पथक तयार करून या व्यक्तीची माहिती घेतली असता तो व्यक्ती धामणी या गावातील मनोज सुरेश घमंडे वय 40 वर्ष हा असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याने त्याला पकडण्याकरिता जाऊन त्याकरिता तांत्रिक बाबींचा देखील उपयोग करून सदर आरोपीस शीताफिने पाठलाग करून पकडल्यानंतर त्याला चोरलेल्या दागिन्यांबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर या आरोपीला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर या आरोपीने चोरीच्या गुन्ह्याची कबुली देऊन चोरलेले सर्व दागिने हे धामणी गावातील मोकळ्या पटांगणामध्ये खड्डा करून पुरून ठेवले असे सांगितल्यानंतर हे सर्व दागिने त्याच्याकडून जप्त करण्यात आले असून अवघ्या दोन तासात या चोरीच्या घटनेचा उलगडा करण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि स्टाफला यश आलेले असून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल या आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेला आहे. या आरोपीकडे या चोरीच्या अनुषंगाने अधिक विचारपूस केली असता काल सर्वत्र चालू झालेल्या शाळेच्या अनुषंगाने हा व्यक्ती मुलांच्या ऍडमिशनच्या बहाण्याने या शाळेमध्ये आलेला होता. व त्याने पालक मेळावा चालल्याचे बघून संधी साधून शिक्षक स्टाफ रूम मध्ये जाऊन तिथे ठेवलेल्या पर्समधील सोन्याचे दागिने चोरलेले होते.
परंतु सदरची घटना सीसीटीव्हीत कैद झाल्यामुळे तात्काळ तपासाची चक्रे फिरवून अवघ्या 2 तासात हा गुन्हा उघडकीस आल्यामुळे तक्रारदार यांचे चोरीस गेलेले दागिने त्यांना मिळाले असून आरोपीस अटक करून आज रोजी माननीय न्यायालयात हजर केलेले आहे. चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा अवघ्या दोन तासात लावून सर्व सोन्याचे दागिने परत मिळाल्यामुळे सर्वत्र म्हसवड पोलिसांचे कौतुक होत आहे.

सदरची कामगिरी ही सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार जोशी सर, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर सर यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेली आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे, देवानंद खाडे, राजेंद्र कुंभार,अमर नारनवर, नवनाथ शिरकुळे, अनिल वाघमोडे, सतीश जाधव यांनी या कारवाईत भाग घेतला.

विहिरीत पडून अल्पवयीन मुलीचा मृत्यू

म्हसवड (वार्ताहर)—
पळशी तालुका माण येथील
अदिती धनाजी देवकुळे वय 17 वर्षे रा.पळशी माळीखोरा ता.माण या अल्पवयीन मुलीचा विहिरीत पडून मृत्यू झाला,
याबाबत म्हसवड पोलीसात महादेव धर्मा देवकुळे वय50वर्षे, धंदा -शेती रा.माळीखोरा पळशी ता.माण यांनी वर्दी दिली आहे.
दिंनाक 09/06/2025रोजी सकाळी 7.00 वाजता ही घटना घडली आहे.
अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे हे करीत आहेत..
…..

error: Content is protected !!