ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा अवघ्या 24 तासांत उघडकीस,सपोनि अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली धडाकेबाज कामगिरी.

Spread the love

“क्राईम न्यूज “

सपोनि अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली धडाकेबाज कामगिरी.

म्हसवड प्रतिनिधी
म्हसवड पोलिसांनी अवघ्या 24 तासांत ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा उघडकीस आणत 19 लाख 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. रहिमतपूर, तालुका कोरेगाव येथील तिघा चोरट्यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून ट्रॅक्टरसह गुन्ह्यात वापरलेले वाहन व साहित्य हस्तगत करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे व त्यांच्या पथकाने केलेली ही धडाकेबाज कारवाई सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहे.

तक्रारीनंतर जलद हालचाल

तक्रारदार गणेश शंकर ढाणे (रा. पाडळी, ता. सातारा) यांनी 11 DN 9042 असा क्रमांक असलेला हिरव्या रंगाचा जॉईनडियर कंपनीचा 5210 मॉडेल ट्रॅक्टर टँकरसह चोरीला गेल्याची तक्रार म्हसवड पोलिस ठाण्यात दिली होती. तक्रार मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. गुन्हे प्रकटीकरण पथकाला तातडीने सीसीटीव्ही तपासण्याचे आदेश देण्यात आले.

तपासादरम्यान म्हसवड ते रहिमतपूर या मार्गावरील 50 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. यात आरोपी ट्रॅक्टरसह जाताना दिसून आले. टँकरमुळे वेग घेता न आल्याने आरोपींनी टँकर रस्त्यामध्ये टाकून फक्त ट्रॅक्टर घेऊन पळ काढल्याचे स्पष्ट झाले. तांत्रिक विश्लेषणानंतर हा ट्रॅक्टर रहिमतपूर भागात नेण्यात आल्याचे निष्पन्न झाले.

आरोपींची नावे

अटक करण्यात आलेले आरोपी हे रहिमतपूर, ता. कोरेगाव, जि. सातारा येथील असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत –

  1. गौरव भागवत पवार
  2. शिवराज नानासो पंडित
  3. संदीप बाळकृष्ण कदम

या तिन्ही आरोपींकडून चोरीस गेलेला ट्रॅक्टर, ओमनी कार व गुन्ह्यात वापरलेले इतर साहित्य जप्त करण्यात आले. आरोपींना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मिळविण्यात आली असून त्यांच्या इतर गुन्ह्यांचा तपास सुरू आहे.

उल्लेखनीय कामगिरी

सदर गुन्हा अवघ्या 24 तासांत उघडकीस आणल्याने तक्रारदारासह स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे, नीता पळे, राजेंद्र कुंभार, राहुल थोरात, युवराज खाडे व विकास ओंबासे यांनी विशेष मेहनत घेतली.

ही कामगिरी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर व उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!