“

म्हसवड-
श्री नागोबा ता.माण येथील धनगर समाजाचे आराध्य दैवत लाखो भाविक भक्तांचे श्रध्दास्थान आसलेल्या नागोबा देवाची यात्रा नामाच्या हरीच चांगभल....कोळ होळच्या राजाचं चांगलभलच्या जयघोषात दि.१६ डिसेंबर पासून मोठ्या उत्साहात प्रारंभ होणार असल्याची माहिती नागोबा देवस्थान ट्रस्ट मार्फत देण्यात आली.
नागोबा यात्रा १६ डिसेंबर ते २२ डिसेंबर या कालावधीत भरणार आहे.या वर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि.१६ डिसेंबर रोजी देवाची सासनाची पूजा व आरती करून यात्रेस सुरूवात होणार आहे.दि.१६ व १७ रोजी रोजी शेळ्या-मेंढ्याचा बाजार मोठ्या प्रमाणात भरणार आहे.
बुधवार दि.१८ डिसेंबर रोजी नागोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने भव्य निकालही कुस्ती आखाड्याचे नियोजन करण्यात आले आहे. या आखाड्यात ५५ हजार रुपयांची प्रथम क्रमांकाची कुस्ती लालासाहेब राजाराम विरकर शेठ,मसाईवाडी(जयपूर शेठ)यांच्या मार्फत तर द्वितीय क्रमांकांची५१ हजार रुपयांची कुस्ती सावळा गुलाब विरकर,राघू दाजी विरकर,संजय देवबा विरकर (बेंगलोर)यांच्या वतीने लावण्यात आली आहे.तृतीय क्रमांकाचे २१ हजार रुपयांचे बक्षीस नागोबा पेट्रोलियम म्हसवडचे मालक भगवान नामदेव विरकर यांचेकडून तर चतुर्थ क्रमांकाचे ११ हजार रुपयांचे बक्षीस चेअरमन हणमंत ठकाराम विरकर – राखुंडे , विरकरवाडी यांचेकडून तर पाचव्या क्रमांकाचे ११ हजार रुपयांचे बक्षीस हरीबा गोविंद विरकर, मसाईवाडी यांचेकडून त्याचबरोबर सहाव्या क्रमांकाचे ११ हजार रुपयांचे बक्षीस सिध्दनाथ पतसंस्थेचे व्हा.चेअरमन मामूशेठ विरकर यांचेकडून तर सातव्या क्रमांकाचे ११ हजार रुपयांचे बक्षीस वेताळ दगडू गलंडे,सोकासन यांचेकडून तर आठव्या क्रमांकाचे ११ हजार रुपयांचे बक्षीस मधुकर विरकर शेठ (चिपळूण ) यांच्या मार्फत लावण्यात आली आहेत.
गुरूवार दि.१९ डिसेंबर रोजी भव्य ओपन बैलगाड्या शर्यती संपन्न होणार असून त्याची नाव नोंदणी ऑनलाइन १८ डिसेंबर पर्यंत सुरु राहील. शर्यतीसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस १ लाख रुपयांचे नागोबा देवस्थान ट्रस्ट यांच्या मार्फत, द्वितीय क्रमांकाचे ७५ हजार रुपयांचे बक्षीस शांती सुपर मार्केटचे मालक बंडू मोडासे,ढाकणीचे सरपंच शंकर बाबू नरबट, कै.महादेव बापू खांडेकर,श्री सिध्दनाथ कृषी सेवा केंद्र यांच्या मार्फत, तृतीय क्रमांकाचे ५१ हजार रुपयांचे बक्षीस माजी नगरसेवक आप्पासाहेब ठकाराम विरकर, बाळू कोंडीबा गलंडे यांच्या मार्फत तर चतुर्थ क्रमांकाचे ३१ हजार रुपयांचे बक्षीस तानाजी यशवंत विरकर (लाडेवाडी ग्रामस्थ), पाचव्या क्रमांकाचे २१ हजार रुपयांचे बक्षीस विराट ज्वेलर्सचे मालक दादासो काशिनाथ सातपुते यांच्या मार्फत, सहाव्या क्रमांकाचे ११ हजार रुपयांचे बक्षीस रामचंद्र बाबा विरकर(राखुंडे), सातव्या क्रमांकाचे ७७७७ रुपयांचे बक्षीस नागोबा अर्थमुव्हसचे मालक पांडुरंग हरिबा विरकर (रोडके)आदींनी बक्षिसे लावली आहेत.बैलगाडी स्पर्धेसाठी १ हजार रुपयांची प्रवेश फी ठेवण्यात आली आहे. १७डिसेंबर ते २१डिसेंबर या कालावधीत जातीवंत जनावरांची यात्रा भरणार आहे.
शुक्रवार दि.२० डिसेंबर ते २१ डिसेंबर या कालावधीमध्ये नागोबा देवाच्या प्रांगणामध्ये विविध गावांचा गजीनृत्य कार्यक्रम संपन्न होणार आहे. या गजीनृत्यामध्ये सातारा, सोलापूर,सांगली जिल्ह्यातील सुमारे 50 गजीनृत्य संघ सहभागी होणार आहेत. तर याच कालावधीत रात्री धनगरी ओव्यांचा कार्यक्रम होणार आहे.शुक्रवार दि.२०डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता यात्रेकरूंसाठी कोल्हापूर ऑर्केस्ट्रा कै.ईश्वरा राजाराम विरकर (भोरे) यांचे स्मरणार्थ युवा नेते विठ्ठल ईश्वरा विरकर यांच्या मार्फत हा मनोरंजनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.शनिवार दि.२१ डिसेंबर रोजी कै.बाजी नामदेव विरकर यांच्या स्मरणार्थ गिरजाप्पा बाजी विरकर शेठ (नागेश गोल्ड रिफायनरी राजस्थान) यांच्या मार्फत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.या महाप्रसादासाठी १ लाख रुपयांची मदत यांच्या मार्फत करण्यात आली आहे. यात्रेत १८ डिसेंबर ते २२ डिसेंबर या कालावधीत भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
देवाची पाकाळणी रविवार दि.२२ डिसेंबर रोजी होणार आसल्याची माहिती नागोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ईश्वरा खोत यांनी सांगितले.यावेळी किसन जठरे,मधुकर सरकारने,धर्मू खोत,तुळशीराम गोरड,तुकाराम विरकर,जिजाबा खोत,पांडुरंग विरकर(रोडके),शंकर विरकर (सर),रामा राखुंडे,बंडू विरकर,किसन ढम,वस्ताद विरकर , धनाजी विरकर,सूर्यकांत खोत, वामन विरकर, बापू विरकर,, वस्ताद विरकर, पोपट झिमल,आण्णा विरकर, शहाजी खांडेकर, तानाजी विरकर, तुळशीराम गोरड,आदीसह ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व यात्रा कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
श्री नागोबा येथे दि.१६ डिसेंबर ते २२डिसेंबर या कालावधीमध्ये श्री नागोबा देवाची वार्षिक यात्रा नागोबा देवस्थान ट्रस्ट,माण तालुका मार्केट कमिटी,म्हसवड नगरपरिषद व सातारा जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमान भरणार आहे. या यात्रेच्या नेटक्या नियोजनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे.
यात्रेतील जागा वाटप १४ ते १५ डिसेंबर रोजी करण्यात येणार असल्याचे ट्रस्ट व प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
फोटो- श्री नागोबा