
सातारा
नवी दिल्ली येथे
जगातील सर्वात मोठा अंतरराष्ट्रीय जलरंग महोत्सव , स्पर्धा आणि प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
यात ६० देशांतील कलाकार सहभागी होणार आहेत. १६०० प्रवेशांमधून जगभरातून केवळ ५५० कलाकार निवडले गेले आहेत.
या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय आयडब्ल्यूएस ऑलिम्पियार्ट २०२४ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सातारा येथील मिडास आर्ट गॅलरीच्या संचालिका सौ.विनया गिरीश कुलकर्णी यांची निवड झाली आहे.
पोर्ट्रेट श्रेणीतील सौ.विनया कुलकर्णी यांची जलरंगातील चित्रे प्रदर्शनासाठी निवडण्यात आली आहेत.
इंटरनॅशनल वॉटर कलर सोसायटी ऑफ इंडियाने आयोजित केलेला हा कार्यक्रम दिल्ली मेट्रोपॉलिटन एज्युकेशन नोएडा, नवी दिल्ली, भारत येथे आहे.