
पिपोडे बुद्रुक प्रतिनिधी /अभिजीत लेभे
मुंबई, नवी मुंबई,पुणे,कोल्हापूर, सातारासह पश्चिम महाराष्ट्रात ५५ शाखाविस्तार पैकी २५ शाखा स्वमालकीच्या इमारतीमध्ये असलेल्या पिंपोडे बुद्रुक ता.कोरेगाव येथील छञपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेत मार्च २०२४ नंतर सप्टेंबर २०२४ अखेर ८६ कोटी ६५ लाखांची व्यवसायवाढ होऊन संमिश्र व्यवसाय १२५१ कोटी ६९ लाख झाला असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक रामभाऊ लेंभे यांनी पिंपोडे बुद्रुक येथील मुख्यालयात झालेल्या पञकार परिषदेत दिली.
छञपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेचे सर्व सभासद, खातेदार, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक, हितचिंतक व पञकार यांना संस्थेच्या वतीने दिपावलीच्या शुभेच्छा देऊन संस्थापक रामभाऊ लेंभे म्हणाले,मार्चनंतर थोडा मंदीचा काळ येतो,नाही म्हटले तरी कामकाजात शिथिलता येते.बँकिंग क्षेत्रात हा पहिला टप्पा कर्जवाटपात जातो.दसरा दिवाळीनंतर ठेवींना काळ चांगला येत व्यवसायवाढ होते.माञ ग्राहकांचे विश्वासास पाञ राहून कारभार केल्याने छञपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेत गत ६ महिन्यात ८६ कोटी ६५ लाखांनी व्यवसायवाढ झाली असून सप्टेंबर २०२४ अखेर १२५१ कोटी ६९ लाख संमिश्र व्यवसाय झालेला आहे.येत्या ६ महिन्यात आणखी व्यवसायवाढ करून १५०० कोटी संमिश्र व्यवसायाचा टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याचा निर्धार संस्थेने केला आहे.
मार्च २०२४ अखेर संस्थेकडे ठेवी ६६१ कोटी २९ लाख होत्या.त्यामध्ये ४५कोटी १९ लाखांची वाढ होऊन सप्टेंबरअखेर ७०६ कोटी ४८ लाख ठेवी झाल्या आहेत.मार्च २०२४ अखेर कर्जवाटप ५०३ कोटी ७५ लाख होते.त्यात ४१ कोटी ४६ लाख वाढ होऊन सप्टेंबरअखेर ५४५ कोटी २१ लाख कर्जवाटप झाले आहे.सोनेतारण कर्ज १८० कोटी होते त्यात २८ कोटींची भर पडून २०८ कोटी सोनेतारण कर्जवाटप झाले आहे.सभासद संख्येत १२२१ नी वाढ होऊन ७३९२४ सभासद संख्या झाली आहे.खेळते भांडवलात ४८कोटी ६५ लाख वाढ होऊन ७९० कोटी ६५ लाखांचे खेळते भांडवल झाले आहे.गुंतवणूकीत ७ कोटी ५८ लाखाची वाढ होऊन १९७ कोटी ०२ लाख बॅंक गुंतवणूक झालेली आहे.
भागभांडवल, स्वनिधी अशा सर्वच बाबतीत गत ६ महिन्यात वाढ करीत संस्थेने प्रगतीची घोडदौड सुरु ठेवली आहे.वेल्हे येथे लवकरच नवीन शाखेचा शुभारंभ होणार असून अनेक संस्था मुंबईतून ग्रामीण भागात आल्या,माञ ग्रामीण भागातून शहरांकडे जाणारी छञपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्था ही एकमेव पतसंस्था असून ग्रामीण भागात शाखा सुरु करताना सेवा हाच उद्देश त्यापाठीमागे असल्याचे संस्थापक रामभाऊ लेंभे यांनी आवर्जून नमूद केले.यावेळी संस्थेचे प्रशासन विभाग अधिकारी अशोक रावसाहेब लेंभे आदी उपस्थित होते.
…