
क्रांतिवीर शैक्षणिक संकुलात स्पर्धा परीक्षेतून उत्तीर्ण झालेल्या त्रिमूर्तींचा सत्कार.
म्हसवड… प्रतिनिधी
सर्व गुणसंपन्न दर्जेदार गुणवंत विद्यार्थी हीच आमची संपत्ती असल्याचे प्रतिपादन क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष कृषिरत्न प्रा.विश्वंभर बाबर यांनी म्हसवड येथे केले.
क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड येथे स्पर्धा परीक्षेतून अधिकारी पदी निवड झालेल्या तीन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर होते. यावेळी संस्था सचिव सुलोचना बाबर , बागायतदार गोरख शिर्के , इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय सर्विस सिलेक्शन बोर्ड परीक्षेतून लेफ्टनंट पदी निवड झालेले सौरभ सुखदेव खराडे ,केंद्रीय स्टाफ सिलेक्शन बोर्ड मधून केंद्रीय पोस्टल सहाय्यक अधिकारी म्हणून निवड झालेले शुभम मच्छिंद्र शिर्के , तर राज्य लोकसेवा आयोगातून श्रीधर मधुकर रकटे यांची नगररचना व मूल्यांकन अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड येथे सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी बोलताना संस्थाध्यक्ष विश्वंभर बाबर म्हणाले सर्व गुणसंपन्न विद्यार्थी घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे. स्पर्धेच्या जगात टिकणारा विद्यार्थी घडवण्यासाठी क्रांतिवीर शैक्षणिक संकुल नेहमीच आघाडीवर राहिले आहे. मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांनी संस्थेमध्ये राबविला जाणारा फाउंडेशन कोर्स, ज्यादा तास तसेच विविध उपक्रमाची माहिती दिली.
यावेळी लेफ्टनंट पदी निवड झालेले सौरभ खराडे म्हणाले जीवनात उच्च ध्येय ठेवा . नेहमी सकारात्मक रहा. अभ्यासाचे नियोजन करा. आई वडील व गुरुजनांचा सन्मान ठेवा. संघर्ष हा यशाचा राजमार्ग असल्याचे सांगून आपण कसे घडलो याबाबतचे विवरण सौरभ खराडे यांनी दिले.
श्रीधर रकटे यांनी अभ्यासामधील आपल्या यशाची गुपित विद्यार्थ्यांसमोर तपशील निहाय सांगितले. कष्टाशिवाय फळ नाही,.अभ्यासात सातत्य ठेवा. थोरामोठ्याकडून प्रेरणा घेण्याबाबत सांगून क्रांतिवीर शैक्षणिक संकुलातील सर्व गुरुजना बद्दल कृतज्ञता व्यक्त केल
यावेळी बोलताना केंद्रीय पोस्टल सहाय्यक अधिकारी पदी निवड झालेले शुभम शिर्के म्हणाले शालेय अभ्यासाबरोबरच अवांतर वाचनाची आवड जोपासा. जिद्द आणि चिकाटी ठेवा. संधीचं सोनं करा. परिस्थितीवर मात करून केवळ आई-वडिल व गुरुजनांच्या प्रेरणेच्या माध्यमातून आपण यशस्वी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रस्ताविक मुख्याध्यापक अनिल माने यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त प्रशासकीय अधिकाऱ्यांचा , तसेच त्यांच्या आई-वडील व नातलगांचा यथोचित सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन विशाल सरतापे यांनी केले तर उपशिक्षिका ज्योती माने यांनी आभार व्यक्त केले.