म्हसवड प्रतिनिधी —
महाराष्ट शासनाने राज्य शासनाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (ITI) सल्लागार पदी माण तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार राजेश इनामदार यांची निवड केली.त्यांच्या या निवडी बद्दल सर्व च स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
राजेश इनामदार यांच्या अनुभवाचा फायदा राज्य शासनास व्हावा.आय टी आय च्या मुलांना व्हावा.या हेतूने कौशल्य,रोजगार, उद्योग व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी राजेश इनामदार यांची राज्याच्या आय टी आय च्या सल्लागार पदी निवड केली.
या निवडी बद्दल राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.यावेळी सिद्धनाथ नागरी सहकारी सहकारी बँकेचे चेअरमन अरुण गोरे,हरिभाऊ जगदाळे,म्हसवड चे नगराध्यक्ष विजय धट,भाजपाचे माण विधानसभा अध्यक्ष सोमनाथ भोसले, मा.सभापती अतुल जाधव,
नगरसेवक महेश कदम यांच्या सह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले.
