मायणी( प्रतिनिधी)
जयकुमार गोरे (भाऊ)यांच्या मार्गदर्शनाखाली
शुक्रवार दिनांकः-२६/०९/२०२५ रोजी होणाऱ्या महसूल पंधरावड्यानिमित्त मायणी जिल्हा परिषद गटातील सर्व गावातील प्रमुख कार्यकत्यांची बैठक सोमवार दिनांकः-२२/०९/२०२५ रोजी मायणी येथील मातोश्री संत सरुताई ट्रस्टच्या हॉलमध्ये बैठक संपन्न झाली असून या बैठकीत
शुक्रवारी संपन्न होणाऱ्या महसूल पंधरावड्यानिमित्त खटाव तालुक्याचे माजी आमदार डॉ दिलीपरावजी येळगावकर यांनी मार्गदर्शन केले यावेळी बोलताना माजी आमदार डॉ दिलीपरावजी येळगावकर यांनी सांगितले की तहसील कार्यालय,पंचायत समिती व गावपातळीवर गावातील नागरिकांना आवश्यक असणारी विविध प्रकारची कागदपत्रे रेशन कार्ड संदर्भातील प्रश्न,जातीचे दाखले ,वारस नोंदी असे अनेक समस्यांचे निराकरण तसेच अतिवृष्टी याबाबत माहिती दिली यावेळी मायणी जि.प गटातील गावातील सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहिले त्यांनी शुक्रवारी होणाऱ्या या सेवा पंधरवड्या बाबत सकारात्मक राहून आपापल्या गावातील विविध प्रश्न व समस्यांचे निराकरण होणार असून विविध दाखले कामी हा सेवा पंधरवडा महत्वाचा असून मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्याचा मानस सर्वांनी व्यक्त केला असून बहुसंख्येने उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी करण्याचा विचार व्यक्त केले