
औंध प्रतिनिधी – ओंकार इंगळे
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंध पोलीस स्टेशन ने सन 2024 मध्ये सर्वात जास्त दोष सिद्धी मिळवल्याबद्दल कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते औंध पोलीस स्टेशनचे सपोनि अविनाश मते व पोलीस कर्मचारी यांना प्रशस्तीपत्र देऊन नुकताच सत्कार करण्यात आला
पोलीस अधीक्षक समीर शेख,अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपस्थित होते यावेळी बोलताना सपोनि अविनाश मते म्हणाले की मागील वर्षी गुन्ह्यामध्ये अटक केलेल्या आरोपी बाबत योग्य ते साक्षी पुरावे गोळा केले न्यायालयात या आरोपींना दोषी ठरविण्यात आले आहे जिल्ह्यातील अन्य पोलीस स्टेशन पेक्षा औंध पोलीस स्टेशन ने बाजी मारली आहे असे वार्षिक निरीक्षणामध्ये आढळून आले ची माहिती अविनाश मते यांनी दिली.
औंध पोलीस स्टेशनच्या या विशेष कामगिरीबद्दल विविध स्तरावरून पोलीस कर्मचारी वर्गाचे अभिनंदन होत आहे