
म्हसवड….प्रतिनिधी
म्हसवड सारख्या ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना सर्व गुणसंपन्न बनवण्यासाठी प्रेरणादायी शैक्षणिक कार्य करणाऱ्या क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड यांना उज्वल भवितव्य असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील अँड.संभाजी बाबर यांनी केले.
क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड येथे मुंबई उच्च न्यायालयाचे जेष्ठ विधीज्ञ संभाजी बाबर व त्यांच्या कौटुंबिक वकील टीमने सदिच्छा भेट दिली. देशभरात गाजलेला मालेगाव खटला ज्या युवा वकिलाने यशस्वीपणे चालविला व आरोपींना निर्दोष सोडविले ते देवापूरचे सुपुत्र अँड. विरल संभाजी बाबर यांचा सन्मान क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाचे उपाध्यक्ष अँड. इंद्रजीत बाबर यांच्या हस्ते करण्यात आला. तर ज्येष्ठ वकील संभाजी बाबर यांचा सन्मान संस्था अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांचे हस्ते करण्यात आला.
यावेळी विरल बाबर म्हणाले माझे वय केवळ 27 मात्र मला सदर संवेदनशील असणारा मालेगाव खटला चालवण्याचे भाग्य मिळाले. प्रचंड मेहनत, अहोरात्र प्रयत्न ज्येष्ठविधीत्न यांचे सह वकील आई- वडिलांचे मार्गदर्शन यामुळेच मी माझ्या पक्षकारांना निर्दोष सोडविण्यात यशस्वी झाल्याचे विरल बाबरयांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना वकील संभाजी बाबर म्हणाले क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाचे व्यवस्थापन व उपक्रमशीलता दर्जेदार असल्यामुळेच संस्थेने अल्पावधीत नवलौकिक मिळवला आहे. यशाची कमान दिवशी दिवस वाढत असल्याने संस्थेला उज्वल भवितव्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी संस्था सचिव सुलोचना बाबर , अँड. विद्या संभाजी बाबर, अँड. विवेक बाबर, अँड. अनुराग पोळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते.