म्हसवड (वार्ताहर)
मासाळवाडी म्हसवड मध्ये मंत्री जयकुमार भाऊ यांच्या प्रयत्नातून मंजूर ट्रान्सफर्मर (100kw)चे उदघाटन करण्यात आले.
मासाळवाडी (धोंड्याचा मळा) अतिरिक्त डीपी चे आज सकाळी मासाळ वाडी ग्रामस्थ्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
उपस्थित म्हसवड नगरीचे माजी नगरध्यक्ष डॉ वसंत मासाळ, उनगराध्यक्ष नारायण मासाळ, माजी सोसायटी संचालक सुखदेव मासाळ, ज्ञानेश्वर मासाळ, पांडुरंग मासाळ, डॉ सतीश मासाळ, आदी शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांचा जिव्हाळाची अडचण म्हणजे शेती पंपासाठी विज…तीच अडचण लक्षात घेवून मंत्री जयकुमार भाऊ यांचेकडून तो मंजूर करून घेवून त्याचे आज लोकार्पण करण्यात आले.

Leave a Reply