कै अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजनेचा सातारा जिल्हा बँकेकडून दुरुपयोग

सातारा वृत्तसेवा —
महाराष्ट्र राज्यातील कष्टकरी, माथाडी, मराठा समाजाचे आधारस्तंभ, प्रामाणिक नेतृत्व म्हणजे कै अण्णासाहेब पाटील. स्व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी योजनाद्वारे महाराष्ट्र भर लाभार्थी घडवत त्यांचे आर्थिक सक्षमीकरण हें उद्दिष्ट आहे.
सातारा जिल्हा बँक संचालकयांनी त्यांचा आमदार/खासदारकीच्या कार्यवेत्रातील पिल्लावळ पोसण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजनांचा लाभ वास्तवात प्रोजेक्ट न केलेल्या / अपूर्ण प्रोजेक्ट केलेल्या लाभार्थी (कार्यकर्ते ) यांना दिल्याचे समोर आलें आहे.
सातारा जिल्हा बँकेच्या माध्यमातून झालेल्या 70% गाय /गुरे/ गोठा योजना ह्या बोगस आहेत. बँकेच्या काही संचालक यांच्या आशीर्वादाने, गावागावातील भ्रष्ट कार्यकर्ते, स्थानिक ब्रांच अधिकारी / गुलाब कांबळे सारखें नीच (भ्रष्ट सहकारी उकिरड्याचीं पैदास असलेले ) विकास अधिकारी व वरिष्ठ पातळीवर बोगस अहवाल देणारे अधिकारी यांच्या सुनियोजित कार्यक्रमातून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व शासनाची शेकडो कोटींची फसवणूक झाली आहे.
सदर घोटाळ्याची व्याप्ती पाहता सातारा जिल्हा बँकेच्या माध्यमातून झालेल्या ह्या सर्व प्रकरणांचे अनुदान ताबडतोब थांबवत, बँकेवर व संबंधित जबाबदार सर्व घटकांवर कारवाई घ्यावी. ह्या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी केंद्रिय तपास यंत्रणासह विविध यंत्रणाद्वारे होण्याची मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री,अण्णासाहेब पाटील महामंडळ अध्यक्ष व प्रशासन यांना श्रीमंत महादजी शिंदे शेतकरी संस्थेमार्फत करत आहोत.
किशोर शिंदे
9821356731
अध्यक्ष, श्रीमंत महादजी शिंदे शेतकरी संस्था, महाराष्ट्र राज्य