श्री जानुबाई विद्यालय विरळी येथे माजी विद्यार्थी स्नेह संमेलन उत्साहात संपन्न

Spread the love

विरळी वार्ताहर –

सोशल मीडिया आणि मनातल्या भावना याच्या जीवावर तब्बल २५ वर्षानंतर दहावीचे विद्यार्थी पुन्हा एकदा त्याच आपल्या वर्गात त्याच बॅंचवर सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसून जुन्या आठवणींना उजाळा देत राहिले .

वर्गशिक्षक एस बी कदम सर , सर्व विषय शिक्षक सलगर सर , यू सी नलवडे सर , पी बी स्वामी सर , कोकरे सर , बंडगर सर , कुलकर्णी सर , एस एस नलवडे मॅडम , भानुसे सर , व्ही यू नलवडे मॅडम या शिक्षकांनी यावेळी विशेष उपस्थिती दर्शवली .

यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांचा मनाचा फेटा बांधून शाल , श्रीफळ , पुष्पगुच्छ व सप्रेम भेट देऊन सन्मान केला .

सर्व शिक्षकांनी आपली मनोगते व्यक्त करताना भविष्यात खूप खूप काही शिकायचं असतं हा मौलिक विचार देऊन भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या . नंतर सर्व माजी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली . यानंतर स्नेह भोजन केले .

मनोरंजन युक्त खेळ , जुन्या आठवणींना उजाळा , प्रेमाचे हिंदोळे , मनाचे समाधान , जुन्या मित्रांच्या भेटी गाठी , पूल्ल एन्जॉय करत कार्यक्रम संपन्न झाला .

हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी प्रयत्न केल्या बद्दल सर्व शिक्षकांच्या हस्ते सचिन गोरड आणि बालिका नलवडे यांचा सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा बाळकृष्ण सकट सर आणि केले .‌

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!