
औंध प्रतिनिधी- ओंकार इंगळे
सातारा जिल्हा हा बागायतदारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो परंतु खटाव व माण तालुक्या मध्ये गेल्या अनेक दशकांपासून दुष्काळाचे सावट आहे पाण्याचा जरी दुष्काळ असला तरी या दोन तालुक्यात अधिकारी वर्ग जास्त असल्याचे दिसत आहे.त्याच पद्धतीने खटाव तालुक्यातील औंध येथील श्री श्री विद्यालय येथील कन्या श्रेया यादव हिने औंध केंद्रात 96% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकवला आहे तर इतर 6 विदयार्थी यांनी सुद्धा 90% पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत यामध्ये सिद्धांत पवार, करुणा सगरे, आर्या जाधव, ओम घाडगे, समीक्षा माने, स्वप्नाली यादव या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.श्री श्री विदयालय औंध शाळेचा शेकडा निकाल 97.12 एवढा लागला असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे औंध शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार चेअरमन गायत्री देवी पंतप्रतिनिधी वाईस चेअरमन चारूशिला राजे पंतप्रतिनिधी विश्वस्त हनमंतराव शिंदे राजू माने,प्रशांत खेरमोडे अतुल क्षीरसागर शाकीर आतार सचिव प्रदीप कणसे सहसचिव संजय निकम, दीपक करपे प्राचार्य एस बी घाडगे उप मुख्याध्यापक अरुण घार्गे, पर्यवेक्षक देवीदास घार्गे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले