दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा साहित्य पुरस्कार सुनील दबडे यांच्या कथासंग्रहाला जाहीर

Spread the love

आटपाडी ( प्रतिनिधी —)

कोल्हापूर येथील दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा ‘ विशेष साहित्य पुरस्कार ‘ . माणदेशातील सुप्रसिद्ध साहित्यिक सुनील दबडे यांच्या ‘ बनगी आणि बिरमुटं ‘ . या कथासंग्रहाला जाहीर झाला आहे .
दरवर्षी सभेच्या वतीने कोल्हापूर , सांगली , सातारा , सोलापूर जिल्हयांसह सिमा भागातील उत्कृष्ट पुस्तकांना पुरस्कार देण्यात येतो . यावर्षी आपल्याला विशेष साहित्य पुरस्कार जाहीर झाल्यामुळे हा माणदेशातील गोमेवाडी – आटपाडीच्या मातीचा सन्मान असल्याचे मत दबडे यांनी व्यक्त केले आहे .
२४ मे रोजी सकाळी १० वाजता शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण होणार आहे .
दबडे यांच्या या पुस्तकाला यापूर्वी फलटण येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहित्य पुरस्कार , शेळवे पंढरपूर येथील राज्यस्तरीय रानशिवार साहित्य पुरस्कार , लातूर येथील डॉ . बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमीचा साहित्य पुरस्कार असे प्रतिष्ठेचे साहित्य पुरस्कार मिळाले आहेत . नुकताच त्यांना कोल्हापूरचा हा प्रतिष्ठेचा साहित्य पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे विविध क्षेत्रांतल्या मान्यवरांनी अभिनंदन केले आहे .
दबडे यांची यापूर्वी पाच पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत . त्यांच्या या पुस्तकांनाही राज्यातल्या अनेक प्रतिष्ठेच्या साहित्य पुरस्कारांनी गौरविलेले आहे . आदर्श शिक्षक आणि उत्तम वक्ता अशीही दबडे यांची ओळख आहे . शैक्षणिक व सामाजिक कामांबद्दल त्यांना यापूर्वी अनेक सामाजिक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!