
फलटण (वार्ताहर.)
बाणगंगा नदीचे रुपडे पालटणारा विकास पुरुष श्री रणजितदादा नाईक निंबाळकर हे एकमेव नेते आहेत असे विचार मा.नगरसेवक अशोकराव जाधव यांनी व्यक्त केले.
फलटण तालुक्यात अतिवृष्टी झाले नंतर मा. खासदार श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी लगेचच निरा उजवा कालवा अधीक्षक अभियंता यांचे कडून 6 फोकलेन मशीन घेऊन फलटण तालुक्यातील बाणगंगा नदी व ओढे साफ करण्याचे काम हाती घेतले व त्यांचे प्रयत्नातून बाणगंगा नदी पहिल्यांदा स्वच्छ होऊन नदीचे रुपडे पालटले या पुढे पाऊस आला तरी नदी काठील घरा मध्ये पाणी जाऊ नये या साठी जे प्रयत्न मा . खासदार श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले त्या बद्दल त्यांना मलठण व फलटण मधील नदी जवळील शनीनगर, शुक्रवार पेठ, भैरोबा गल्ली, बुधवार पेठ, मंगळवार पेठ येथील नागरिकांनी धन्यवाद दिले.