
कोरेगाव दि: सातारा- पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग निर्मितीसाठी अनेक वृक्षाची तोड करण्यात आली. त्या बदल्यात ३२ लाख वृक्ष रोप लागवड झाल्याचे कागदपत्र दाखवण्यात आले. ही शासनाची फसवणूक असून या कंपनीला काळ्या यादीत समाविष्ट करण्यासाठी व मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राज्य उपाध्यक्ष श्री रमेश अनिल उबाळे यांनी सहा मे पासून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतल्याने तो एक चर्चेचा विषय बनला आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,मेघा इंजिनिअरिंग प्रा. लि. या कंपनीने सात हजार झाडे कागदावर नमूद करून शासनाची फसवणूक केली आहे.त्यांना ब्लॅक
लिस्टमध्ये टाकावे. तसेच कोरेगाव व सातारा येथे झालेल्या अपघातात मृत्युमुखी पावलेल्या व्यक्तींना मोबदला मिळावा .कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी. असेही नमूद केले आहे. सातारा- पंढरपूर विस्तारीकरण महामार्गावर नवीन काम करत असताना जुनी झाडं पाडून त्या जागी नवीन रोप लागवड करण्याचे महामार्गाच्या कामाच्या निविदांमध्ये नमूद केले होते, त्याप्रमाणे सात हजार वृक्ष रोपाची लागवड करणे. कंपनीला गरजेचे होते. त्यांनी निविदा सादर करताना करून ३२ लाख रुपये वृक्ष रोप लागवडी करता खर्च केलेले आहेत, असे कागदावर दाखवले आहे.
वास्तविक पाहता सातारा ते पंढरपूर महामार्गावर दुतर्फी झाडे लावणे व जगवणे असे निविदा मध्ये स्पष्ट नमूद केले होते, परंतु ,या कंपनीने दोन लाखाची वृक्षरोपाची लागवड करून तीस लाख न केलेल्या वृक्षरोपाची अहवालात मांडणी केली आहे. या भ्रष्ट कंपनीने निकृष्ट दर्जाचे महामार्गाचे काम केलेले असून, संपूर्ण महामार्गाला जागोजागी भेगा पडलेले बुजवण्याचं काम सध्या चालू आहे,
वृक्ष रोप लागवड ही कागदावर दाखवून सरळ सरळ शासनाशी फसवणूक व भ्रष्टाचार केलेला आहे. मेघा इंजीनियरिंग कंपनीने या महामार्गाचे काम करत असताना कोणत्याही पद्धतीचे सेफ्टी रुल्स फॉलो केलेले नाही. त्यामुळे या रस्त्यावर आजपर्यंत निरपराधी ६४ लोक मृत्युमुखी पावलेले आहेत. त्यांच्या कुटुंबियांना कोणत्याही पद्धतीचा नुकसान भरपाई च मोबदला मिळालेला नाही व पोलीस
यंत्रणेशी हात मिळवणी करून आज तारखे अखेर एक ही सदोष मनुष्य वधाचा गुन्हा या कंपनीवर का दाखल झालेला नाही? हा मोठा अभ्यास व संशोधन करण्याचा विषय आहे .
सर्व जाती धर्मातील ६४ लोक मृत्युमुखी पडले आहेत.फक्त आणि फक्त सेफ्टी नियमावलीचे पालन न करता आर्थिक बचतीच्या दृष्टिकोनातून काम
केल्यामुळे सदर कंपनी विरोधात तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून संबंधितांना अटक करावी. या मागणीसाठी निवेदन दिलेले आहे . सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाची बाहेर दिनांक सहा मे रोजी अमर उपोषण करण्याचा इशारा दिलेला आहे. सदर उपोषणामुळे जर आंदोलकांच्या जीवित अस काही बरे वाईट झाल्यास त्याला सर्वस्वी मेघा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जबाबदार राहील. असे श्री रमेश अनिल उबाळे यांनी निवेदनात नमूद केले असून निवेदनाच्या प्रती सातारा जिल्हा अधिकारी व उपविभागीय अधिकारी कोरेगाव तसेच कोरेगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या आहे.
फोटो – सातारा जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना रमेश अनिल उबाळे