
पंढरपूर ता. २१
पश्चिम बंगाल मधील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सोमवार( ता. २१) जन आक्रोश आंदोलन करण्यात आले.
पश्चिम बंगाल मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली त्याबाबत निवेदन तहसील कार्यालयात देण्यात आले.
पश्चिम बंगाल मध्ये झालेल्या हिंसाराची चौकशी राष्ट्रीय तपासणी संस्था(NIA )कडून करण्यात यावी तसेच पश्चिम बंगाल राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी केंद्रीय सुरक्षा दलाकडे सोपविण्यात यावी आणि बांगलादेशी व रोहिंग्या घुसखोरांची ओळख पटवून त्यांना परत देशाबाहेर पाठवण्यात यावे तसेच भारत आणि बांगलादेश सीमारेषेवर तत्काल कुंपण घालण्यात काम सुरू करण्यात यावे
वरील सर्व मागण्यांचे निवेदन तहसील कार्यालयात देण्यात आले यावेळी
विश्व हिंदू परिषदे महाराष्ट्र समरसतेचे रवींद्रजी साळे , जिल्हा मंत्री शिवाजीराव जाधव सहमंत्री गोपाळ सुरवसे, बजरंग दल जिल्हा संयोजक श्रीनाथ संगीत, धर्म प्रचार प्रमुख नागेश बागडे महाराज, वालचंद जामदार, प्रवीण कुलकर्णी,वारकरी पालक संघाचे रामकृष्ण वीर महाराज, हिंदू महासभा चे अभयसिंह कुलकर्णी, अनुप देवधर, निलेश लंके,तुकाराम कवठेकर, गणेश महाराज जाधव, तुकाराम खंदाडे ,ओंकार वैद्य, कौस्तुभ देशपांडे, वासुदेव हेगडे आदी उपस्थित होते.