वृत्तसेवा आटपाडी
आटपाडी तालुक्यातील झरे परिसरातील बँक ऑफ इंडियाच्या दोन खातेदारांना तब्बल 7 लाख 25 हजार रुपयांचा गंडा बसला आहे.
यामध्ये झरे येथील रोहित संजय सुतार यांच्या व्हाट्सअप वर बँक ऑफ इंडिया नावाची फाईल आली होती ती ओपन करतात त्यांच्या खात्यातील 94 हजार रुपये गेले. व पैसे गेलेला तसा मेसेज आला. त्याचबरोबर विभूतवाडीतील पोपट खर्जे यांनीही बँक ऑफ इंडिया नावाची फाईल उघडली असता 6,31000 रुपये बँक खात्यातून पैसे डेबिट झाले .
अचानक खात्यातून पैसे गेल्याचे पाहून चक्क दोन्ही खातेदारांना धक्का बसला. पोपट खर्जे हे पुणे येथे नोकरी व्यवसायासाठी राहतात. बँक ऑफ इंडिया नावाची मोबाईल वरती येणारी फाईल बघितल्यानंतर त्याने ती फाईल उघडली व काही सेकंदातच खात्यावरून पैसे गेलेले चे मेसेज त्यांना मोबाईल वरती येऊ लागली. त्यानंतर त्यांनी पुणे सायबर गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार नोंद केली आहे.
तर झरेतील रोहित संजय सुतार यांनीही अशीच फाईल उघडली व बँकेच्या खात्यातील 94,000 हजार रुपये खात्यातून डेबिट झाले.
दोन्ही खातेदारांचे पैसे खात्यातून कमी होऊ लागल्यानंतर त्यांना चक्क धक्का बसला परंतु करणार तरी काय हा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला होता. यापूर्वी बँक ऑफ इंडिया शाखा झरे या शाखेतून 12,700 रुपये एका खातेदाराचे गेले होते. त्यानंतर आज 2 खातेदारांचे 7 लाख 25 हजार रुपये बँक खात्यातून डेबिट झाले आहेत.
जर असे सतत पैसे बँक ऑफ इंडियाच्या खात्यावरून डेबीड होऊ लागले तर बँकेवर विश्वास कसा ठेवायचा, असे सतत पैसे खात्यावरून जात असल्याने खातेदारांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
तसेच मागील दोन दिवसांपूर्वी पीएम किसान योजना या नावाने फाईल व्हाट्सअप वर फिरत होती ज्यांनी ज्यांनी ही फाईल उघडली त्यांचे मोबाईल हॅक झाले होते. पी एम किसान ची यादी आहे म्हटल्यानंतर आपले नाव त्या यादीमध्ये आहे की नाही हे पाहण्यासाठी काही नागरिकांनी फाईल उघडली होती ज्यांनी ज्यांनी ही फाईल उघडली त्यांचे मोबाईल हॅक झाले आहेत.
रोजंदारी करून पैसे कमवायचे ते जवळ ठेवायचे म्हटलं तर चोरांची भीती बँकेत ठेवायचं म्हटलं खात्यावरून पैसे जातात . तर मग नक्की पैसे ठेवायचे कुटे हा गंभीर प्रश्न बनला आहे.
चौकट…
आठ दिवसांमध्ये तीन घटना घडल्याने नागरिकांमध्ये पसरली आहे. जर असेच सुरू राहिले तर बँकेच्या व्यवहारावर परिणाम होऊ शकतो.अशी चर्चा नागरिकांतून सुरू आहे.
बँक ऑफ इंडिया च्या नावाची फाईल ओपन केली अन् दोन तरुणांना 7 लाख 25 हजार रुपयाचा बसला गंडा