म्हसवड…प्रतिनिधी
म्हसवड येथील क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड येथे भारत देशाचा 79 वा स्वातंत्र्य दिन हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कृषी विकास प्रतिष्ठान संचलित क्रांतिवीर शैक्षणिक संकुल अंतर्गत क्रांतिवीर नागनाथ नायकवडी शाळेमध्ये म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी संस्था अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर , संस्था सचिव मुख्याध्यापिका सुलोचना बाबर, प्राचार्य विठ्ठल लवटे, मुख्याध्यापक अनिल माने व पूनम जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या ठिकाणी क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा म्हसवड, क्रांतिवीर जुनियर कॉलेज, आत्मगिरी माध्यमिक विद्यालय , नूतन मराठी शाळा तसेच सिद्धनाथ बालक मंदिर मधील लहान व मोठ्या गटाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याशिवाय क्रांतिवीर इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूल म्हसवड येथे वरकुटे येथील पालक प्रतिनिधी व ज्येष्ठ शिक्षक नेते तातोबा बनसोडे यांच्या हस्ते व संस्था उपाध्यक्ष ॲडव्होकेट इंग्रजीत बाबर, प्राचार्य विन्सेंट जॉन, समन्वयक अभिजीत सावंत यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने क्रांतिवीर शैक्षणिक संकुलात विद्यार्थ्यांचे शिस्तबद्ध आकर्षक मार्चिंग, रंगीबेरंगी शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून दर्जेदार, आकर्षक, लयबद्ध कवायती सादर करण्यात आल्या. स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने शिक्षक व विद्यार्थी प्रतिनिधी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवर व उपस्थित पालक, शिक्षक ,विद्यार्थी यांनी ध्वजाला मानवंदना दिली तसेच मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊची वाटप करण्यात आले. कार्यक्रमात हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते. क्रीडा शिक्षक तुकाराम घाडगे व चंद्रकांत तोरणे यांनी कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले होते.