म्हसवड…. प्रतिनिधी
बलशाली भारत देश घडवण्यासाठी शालेय स्तरावर प्रबोधनाची गरज असून व्यसन मुक्त भारत देश ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी म्हसवड येथे केले.
शालेय स्तर व्यसन मुक्त प्रबोधनासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सातारा तुषार दोशी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवण्यात आली. या उपक्रमांतर्गत म्हसवड पोलीस स्टेशन,आत्मगिरी विद्यालय म्हसवड तसेच क्रांतिवीर इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूल म्हसवड यांच्या संयुक्त विद्यमाने नशा मुक्त भारत माझे स्वप्न व नशा मुक्त भारत माझी जबाबदारी या विषयावर शालेय स्तरावर निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती . या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना सपोनी अक्षय सोनवणे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर होते.
चित्रकला स्पर्धेत आत्मगिरी माध्यमिक विद्यालयातील इयत्ता नववी आणि दहावी मधील शंभर विद्यार्थी सहभागी झाले होते. यशस्वी विद्यार्थी गुणानुक्रमे अनुक्रमे पुढील प्रमाणे अनुष्का किशोर केवटे,दर्शनी ज्ञानेश्वर लोखंडे, सलोनी महादेव सावंत. क्रांतिवीर इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूल म्हसवड या शाखेचे निबंध स्पर्धेत निवडक 41 विद्यार्थी सहभागी झाले होते त्यातील गुणानुक्रमे तीन विद्यार्थी पुढील प्रमाणे.
कीर्ती सिद्धनाथ माने, सई श्रीहरी शिंदे, वेदांती रवींद्र टाकने.
यावेळी सपोनी अक्षय सोनवणे यांनी शालेय स्तरावर नशा मुक्ती बाबत विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी, शिक्षण संस्था, पालक ,शिक्षक व शाळा यांचे प्रबोधनाबाबत चे कर्तव्य व जबाबदारी याबाबत तपशीलवार माहिती दिली. उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्था सचिव सौ.सुलोचना बाबर, प्राचार्य विन्सेंट जॉन , समन्वयक अभिजीत सावंत , मुख्याध्यापक अनिल माने, पोलीस कर्मचारी प्रतिनिधी अभिजीत भादुले , हर्षदा गडदे यांनी विशेष परिश्रम घेतले.
निबंध व चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस देताना सपोनी अक्षय सोनवणे