म्हसवड वार्ताहर
यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव हा आदर्श गणेशोत्सव व्हावा यासाठी शासनाने व पोलीस प्रशासनाने गणेश मंडळांसाठी काही नियम घालुन दिले आहेत या नियमांचे पालन सर्वच सार्वजनिक गणेश मंडळांनी करुन यंदाचा गणेशोत्सव हा आदर्श असा साजरा करावा, सर्वांनीच कायद्यात राहुन नियमांचे पालन करावे असे आवाहन उप विभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत यांनी म्हसवड येथे केले.
गणेशेत्सवाच्या पार्श्वभुमीवर म्हसवड पोलीस स्टेशन ने आयोजित केलेल्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते, यावेळी अपर तहसिलदार मीना बाबर, मुख्याधिकारी डॉ. सचिन माने, स.पो. नि. अक्षय सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे गणेश भक्तांना मार्गदर्शन करताना पाटील म्हणाले की यंदाचा गणेशोत्सव हा डॉल्बीमुक्त करण्याचे शासनाने जाहीर केले आहे, त्यानुसार पोलीस प्रशासनाने गणेश मंडळांसाठी एक नियमावली तयार केली असुन त्याचे तंतोतंत पालन करणार्या गणेश मंडळांचा यथोचित सन्मानही पोलीस दलाकडुन केला जाणार आहे, मात्र जर कोणी सामाजिक शांतता भंग केली तर मात्र त्या मंडळावर कारवाई हमखास केली जाणार आहे. गणेश ही बुध्दीची देवता मानली जाते हा गणेशोत्सव मांगल्याचे प्रतिक असल्यानेच तो सर्वजण आनंदाने साजरा करतात, या आनंदाच्या उत्सवावर आपल्याकडुन विरजन पडले जाणार नाही याची दक्षता सर्वच सार्वजनिक गणेश मंडळांनी घ्यावी, तर प्रत्येक गणेश मंडळांनी आपल्या गणेश मंडळाच्या ठिकाणी किमान २ सी.सी.टी. कँमेरे बसवावेत गणेशोत्सव समाप्तीनंतर तेच कँमेरे आपल्या गल्लीत बसवावेत जेणेकरुन आपल्या गल्लीतील चोर्यांना आळा घालता येईल असे प्रत्येक मंडळांनी केल्यास आपोआप आपले गाव, शहर चोरी मुक्त होण्यास मदत होईल अशी उपाय योजना करणार्या प्रत्येक गणेश मंडळाचा पोलीस दलाकडुन सन्मान केला जाईल असे ही शेवटी पाटील यांनी सांगितले.
तर पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने म्हणाले की सार्वजनिक गणेश मंडळांना लागणार्या सुविधा उपलब्ध करुन देण्यास पालिका प्रशासन तयार असुन प्रत्येक मंडळांनी रितसर परवानगी घ्यावी. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना सर्वांनी सामाजिक एकीचे दर्शन घडवावे असे आवाहन केले.
तहसिलदार मीना बाबर म्हणाल्या की यंदाचा गणेशोत्सव आदर्श व्हावा यासाठी सर्वांनी एकत्र येवुन हा सण साजरा करावा, तर कोणत्याही जाती, धर्माच्या भावना दुखावणार नाहीत याची दक्षता घ्यावी. डीजेच्या कर्नकर्कश्य आवाजाने लहान बाळांवर गंभीर परिणाम होतो त्यांच्यामध्ये बहिरेपणा येण्याची शक्यता निर्माण होते. हिंदु संसंकृतीमधील कोणताच सण हा कोणालाही हानी पोहचवणारा नाही हे लक्षात ठेवुन प्रत्येक गणेश मंडळांनी आपल्या संसकृतीचे पावित्र्य राखावे असे आवाहन केले.
यावेळी उपस्थित सर्व सार्वजनिक गणेश मंडळांचे आभार स.पो. नि. सोनवणे यांनी मानले.
फोटो –