म्हसवड… प्रतिनिधी
म्हसवड नगरपालिका हद्दीत प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे कृत्रिम पाणीटंचाई सुरू असून 13 दिवस झाले आम्हाला पिण्याची पाणी नाही आता तरी आम्हाला पिण्याचे पाणी द्या अशी आर्त भावनिक मागणी अनेक ज्येष्ठ नागरिकांनी मुख्याधिकारी म्हसवड यांच्याकडे केली आहे.
याबाबतचे लेखी निवेदन डॉ. सचिन माने मुख्याधिकारी म्हसवड यांच्याकडे नागरिकांच्या शिष्टमंडळाने नुकतेच दिले आहे. निवेदनावर कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर , ज्येष्ठ नेते माननीय हिरालाल शेटे, शिक्षक नेते सुभाष शेटे, माजी प्राचार्य प्रभाकर उनउने , तसेच नारायण सरगर,सोमनाथ कवी इत्यादी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सह्या आहेत.
म्हसवड नगरपालिका हद्दीत पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन दुरुस्तीच्या नावाखाली गेले अनेक दिवस झाले पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद पडलेला आहे. म्हसवड शहरा शेजारून दुथडी भरून वाहत असणारी माणगंगा नदी म्हसवड वासियांच्या उशाला मात्र पाण्याअभावी कोरड मात्र नागरिकांच्या घशाला अशी विचित्र अवस्था म्हसवड नगरीत निर्माण झाले आहे. शिक्षक कॉलनी, पोलीस स्टेशन परिसर,चोपडे वस्ती व परिसरात गेले 13 ते 15 दिवस झाले पिण्याचा पाणी पुरवठा बंद आहे. पोलीस स्टेशन ते चांदणी चौक दरम्यानच्या रस्त्याच्या शेजारील पाईपलाईन दुरुस्तीचे काम गेले काही दिवस सुरू आहे. याच परिसरातील रस्त्याच्या रखडलेल्या कामाला नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच महावितरण हे तीन विभाग जबाबदार आहेत. या तीन विभागात कसलाही समन्वय नसल्याने रस्ता दुरुस्तीच्या कामाबरोबरच पिण्याच्या पाईपलाईन दुरुस्तीचे कामही रखडलेले आहे. प्रत्येक विभाग आपली जबाबदारी झटकून टाकत असल्याचे दिसून येत आहे ,मात्र यात प्रचंड हाल होत आहे सामान्य जनतेचे. रस्ता दुरुस्ती कामात पाईपलाईन फुटल्याने पाणीपुरवठा खंडित झाला. पाईपलाईन दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर होणे गरजेचे होते मात्र गेले पंधरा दिवस नगरपालिकेचे प्रशासन अत्यंत संथ गतीने कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. ज्येष्ठ नागरिक प्रभाकर उनउने यांनी शिक्षक कॉलनीत गेली पंधरा दिवस पाणी नाही असे सांगितले असता नगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख पवार यांनी शिक्षक कॉलनी कुठे आहे ? असा अज्ञानपणाचा प्रश्न केला.
नागरिकांना पंधरा दिवस पिण्याचे पाणी न मिळणे हे म्हसवड नगरपालिका प्रशासन अकार्यक्षमतेचे दुर्दैव उदाहरण असून या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झालेली आहे. परिसरात भरपूर पाणी असून सुद्धा पंधरा दिवस नागरिकांना पिण्याचे पाणी न देणे हा राज्य शासन व लोकप्रतिनिधी यांना बदनाम करण्याचा कट तरी नाही ना ? असा प्रश्न राजकारणातील जानकर लोक विचारीत आहेत. पिण्याचे पाणी पुरवठा प्रकरणी जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या दोषी अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी ही जनतेतून केली जात आहे.
[25/08, 3:37 pm] Babar Sir V. S.: पिण्याच्या पाण्यासाठी म्हसवड नगरपालिका मुख्याधिकारी सचिन माने यांना निवेदन देताना ज्येष्ठ नागरिक
तेरा दिवसांनी तरी पिण्याचे पाणी द्यावे-. नागरिकांची मुख्याधिकारी यांचे कडे मागणी.