महाबळेश्वर वार्ताहर

महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी येथे सातारा जिल्हा कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष श्री. रणजितसिंह देशमुख (भैय्यासाहेब) यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
या बैठकिला वाई विधानसभा मतदार संघाचे कॉंग्रेसचे युवा नेते जयदीपदादा शिंदे, महाबळेश्वर तालुक्याचे कॉंग्रेसचे जेष्ठ नेते किसनशेठ भिलारे (मा.तालुका अध्यक्ष महाबळेश्वर), पाचगणी नगरपालिकेचे मा. नगराध्यक्ष श्री.साहेबराव बिरामने, पाचगणी नगरपालिकेचे मा.नगरसेवक निसारभाई सय्यद यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीचे नियोजन महाबळेश्वर तालुक्याचे युवा नेते, मा.युवक कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष श्री.राजेंद्र भंडारी यांनी केले होते.
या बैठकीत महाबळेश्वर तालुक्यातील कॉंग्रेस वाढीसंदर्भात व येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संथांच्या निवडणुकीसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली.यावेळेस प्रशांत सोनावने,मंगेश यादव, ऋतुराज माने, संदीप माने, विनोद माने, अरुण सपकाळ, प्रफुल भंडारी, दानेश देसाई, विशाल जाधव, प्रशांत सपकाळ, वेजनाथ प्रभाळे आदी उपस्थित होते.