अल्पवयीन मुलीशी गैरवर्तनप्रकरणी युवक अटकेत; ४ दिवस पोलीस कोठडीत
म्हसवड / वार्ताहर
म्हसवड पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्र. 284/2022 अंतर्गत अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन करून तिची फसवणूक केल्याप्रकरणी नितीन धनाजी ढेरे (रा. बनगरवाडी, ता. मान, जि. सातारा) या युवकास पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यास ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
फिर्यादी ही 16 वर्षीय विद्यार्थिनी असून आरोपी तिचा वर्गमित्र आहे. आरोपीने मैत्रीचे आमिष दाखवून तसेच धमकी देऊन तिच्याशी अनुचित वर्तन केले. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, हा प्रकार गेल्या वर्षभरात देवापुर व दिघंची येथील काही ठिकाणी घडला.
या प्रकरणी 24 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 9.16 वा. गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीस त्याच दिवशी रात्री 11.28 वा. अटक करण्यात आली.
गुन्हयाची थोडक्यात हकिकत :
फिर्यादी मुलगी अल्पवयीन असून ती आरोपी नितीन धनाजी ढेरे हाच तिचा वर्गमित्र आहे. आरोपीने तिच्याशी मैत्रीचे नाते निर्माण करून वारंवार “आपण फिरायला जाऊ” असे सांगून तिला देवापुर व दिघंची येथील लॉजवर नेले. फिर्यादी अल्पवयीन असल्याचे आरोपीला माहित असूनही, त्याने धमकी व दमदाटी करून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले.
कॉलेजमध्ये बदनामी करण्याची भीती दाखवून तिला दबावाखाली ठेवण्यात आले. या दरम्यान फिर्यादी गरोदर राहिली व तिने बाळाला जन्म दिला.
फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलीसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीस अटक केली असून, POCSO कायद्यांतर्गत तसेच BNS कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीस ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक ए. ए. वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.