वडूज प्रतिनिधी-(विनोद लोहार)–विविध गुन्ह्यांमध्ये पोलीस विभागास आरोपीवर कोर्टात खटले दाखल करावे लागतात .मात्र या बाबतीत पोलीस विभागाने सतर्क राहून काम केलेस त्यांच्या कामामध्ये अधिक प्रगल्भता निर्माण होईल असे प्रतिपादन प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी ,वडूज यांचे कोर्टातील सरकारी अभियोक्तात अॅड. प्रकाश जोशी यांनी केले.
पोलिस तपाशी अधिकारी व अंमलदार यांना कोर्ट कामामध्ये येणाऱ्या विविध अडचणी संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी वडूज पोलीस कार्यालयात सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, सपोनि पाटील ,कदम, कांबळे, शिंदे साहेब उपस्थित होते
अॅड.जोशी पुढे म्हणाले ,ज्यावेळी तपासी अधिकारी गुन्ह्याचे केस संदर्भात न्यायालयात सुनावणी करत असतात ‘ त्यावेळी तपासामध्ये काही बाबी राहिल्यामुळे आरोप सिद्ध होण्यामध्ये अडचणी येत असतात .त्या संदर्भात तपास करणारे अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याचा तपास करतेवेळी घटनास्थळ ,पंचनामा ,जप्ती ,साक्षीदार तपास, गुन्ह्याचे तपासाचे अनुषंगाने प्राप्त पुरावे कायदेशीर बाबींची पूर्तता करून हस्तगत करणे गरजेचे आहे. तसेच दिवाणी स्वरूपाचे व फौजदारी प्रकरणे, तपासामध्ये उणीवा ठेवू नयेत. त्याचप्रमाणे नवीन कायदे भारतीय न्याय संहिता २०२३ ,भारतीय नागरी न्याय संहिता २०२३ , साक्षी, पुरावा अधिनियम यांची ही माहिती घेणे गरजेचे आहे. तसेच केस प्रॉसिक्शनच्या वेळी कोर्ट पैरवीची कर्तव्य ,तपासी अधिकाऱ्यांनी साक्ष कशी द्यावी, उलट तपास ,फेरफार करत असताना अंमलदारांना कायदेशीर अडचणी येतात त्यासाठी पोलीस विभागाने सतर्क राहून सखोल माहिती घेणे गरजेचे आहे.
पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे प्रास्ताविकात म्हणाले, एखादा गुन्हा घडला असेल तर न्यायप्रक्रियेतून शिक्षा होणे गरजेचे असते, मात्र निर्दोष असून गुन्ह्यात अडकला असल्यास त्यावेळी तपास यंत्रणेने खरा तपास करून त्यास शिक्षा होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे असते. गुन्हा घडून देखील पुराव्याची नीट मांडणी, कागदपत्रांद्वारे पोलीस कोर्टात करू शकले नाहीत तर तो आरोपी खरा गुन्हेगार असून देखील सुटतो. तपास हा जलद गतीने पिडीतास न्याय मिळण्यासाठी गुणवत्तापूर्ण व दोष विरहीत होणे गरजेचे आहे. गुन्ह्याचे दोषारोपण सादर झाल्यानंतर पोलिसांनी काळजीपूर्वक काम करुन, न्यायालयात अपेक्षित कसे काम करावे याबाबतीत पोलिसांना सातत्याने सतर्क राहणे गरजेचे आहे.

फोटो
वडूज येथील पोलीस कार्यालयात मार्गदर्शन करताना अॅड. प्रकाश जोशी ,शेजारी पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे.