
मायणी प्रतिनिधी—
-शिवप्रताप मल्टीस्टेट विटा लोकांच्या पसंतीस उतरलेली पतसंस्था असून महाराष्ट्र कर्नाटक राज्यात अग्रगण्य पतसंस्था म्हणून ओळखली जाते ग्राहकांचे. हित सांभाळण ही तत्व स्वीकारून ही संस्था कार्यरत आहे संस्थेत अनेक योजना राबवल्या जात असून ग्राहकांना थेट त्याचा फायदा होत आहे ठेवी व कर्ज भरताना अडचणी येऊ नयेत म्हणून सुरक्षा देत असल्याने पतसंस्थेवरील विश्वास दृढ झाला आहे नुकतेच मायणी येथील संस्थेचे सभासद सुभाष प्रल्हाद माने यांचे 11 डिसेंबर रोजी निधन झाले निधनानंतर बँकेचे कर्ज कसे फेडायचे या चिंतेत त्यांचे कुटुंबीय होते यावेळी शिवप्रताप संस्थेचे अधिकारी श्री सतीश कोकाटे यांनी भेट घेऊन त्यांच्या कुटुंबीयांना आधार दिला याशिवाय कर्ज सुरक्षा निधीतून त्यांचे कर्ज निरंक केले यावेळी बोलताना सुभाष माने यांच्या पत्नी अर्चना माने म्हणा ल्या की आम्ही खूप चिंतेत होतो आता बोजा कसा उतरायचा याचा विचार करत होतो पण बँकेने निरंकचे पत्र देऊन बोजा उतरल्याचे सांगितले सदरचे कर्ज निरंक निरंक झाल्याचे पत्र बँकेचे चेअरमन शेखर भाऊ साळुंखे व्हाईस चेअरमन हनुमंतराव सपकाळ आप्पा कार्यकारी संचालक विठ्ठल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेच्या अधिकाऱ्यांनी चढवलेला बोजा उतरविण्याची पत्र त्यांना दिले