मुरूम (वार्ताहर):
दि. ५ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेरडवाडी ,तालुका उमरगा येथे रोटरी क्लब मुरूम सिटीच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून आरोग्य या संकल्पनेवर आधारित एक प्रेरणादायी उपक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वसंतराव मंडले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब मुरूमचे अध्यक्ष प्रा. डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी आणि सचिव रोटे कल्लप्पा पाटील होते.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व नरवीर उमाजी नाईक यांच्या प्रतिमेची पूजन करून करण्यात आले.
रोटरी क्लब मुरूम सिटी आणि ग्रामीण रुग्णालय मुरूम यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासणी आणि आरोग्य तपासणी करण्यात आली यासाठी डॉ. नितीन डागा, डॉ.महेश स्वामी, ग्रामीण रुग्णालय मुरूमचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अर्धाळे , प्रयोगशाळा सहाय्यक लोहार व परिचारिका ममता साबळे तसेच मातोश्री डी एम एल टी कॉलेज मुरूमचे विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले. या शिबिरामध्ये 60 विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासण्यात आले व जवळपास 90 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
आरोग्य हीच धनसंपदा आहे. आरोग्य उत्तम ठेवले पाहिजे, यासाठी नियमित व्यायाम आणि योग्य आहार घेतला पाहिजे असे प्रतिपादन प्रमुख अतिथी रोटरी क्लब मुरूमचे अध्यक्ष प्रा. डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी यांनी केले. तर रोटरी क्लब मुरूम सिटीचे सामाजिक बांधिलकीचे हे उत्तम उदाहरण असून खरोखरच प्रेरणादायी आहे आणि सर्विस अबोह सेल्फ या ब्रीद वाक्यानुसार समाजासाठी काम करणारी संघटना म्हणून सर्व स्तरातून प्रशंशा मिळवत आहे असे उद्गगार शालेय समितीचे अध्यक्ष मंडले यांनी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नितीन डागा यांनी केले, तर सूत्रसंचालनाचे सुरेख व प्रासादिक संचलन रोटे. सुनील राठोड यांनी केले. कार्यक्रमाची सांगता रोटरी क्लब मूरूमचे सचिव रोटे कल्लाप्पा पाटील यांनी आभार प्रदर्शनाने केली.
या कार्यक्रमासाठी रोटे. कमलाकर मोटे ,रोटे. प्रा.कलय्या स्वामी ,रोटे. मल्लिकार्जुन बदोले, रोटे. भूषण पातळे ,रोटे. शरणप्पा धुमा, कॉर्नर स्टील सेंटरचे प्रमुख धनराज धुम्मा,शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष रणजीतकुमार भोखले, मुख्याध्यापक अनिल मुडमे, सहशिक्षक बालाजी भालेराव, युवराज चव्हाण, रंजना तांदळे, युवा प्रशिक्षणार्थी राधिका जमादार, पत्रकार नामदेव भोसले चंद्राम मंडले व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रोटरी क्लब मुरूम सिटीतर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन
