पिंपोडे बुद्रुक / प्रतिनिधी /अभिजीत लेभे

सातारा जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे सर्व प्रश्न टप्पा टप्प्याने सोडवणार असल्याची ग्वाही प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी दिली.सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने त्यांचे स्वागत आयोजित करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.
सत्काराला उत्तर देताना ते पुढे म्हणाले.सध्या सुरू असलेली दिव्यांग पडताळणी याबाबत जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय यांच्याशी समन्वय साधून तपासणीसाठी जाणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नियमित वेळेत तपासणी करण्याबाबत सूचना देण्यात येतील व सध्या होणारी दिरंगाई टाळण्यात येईल. त्याबरोबरच पडताळणी झालेल्या सर्व दिव्यांग व गंभीर आजार असलेल्या कर्मचाऱ्यांची नोंद सेवा पुस्तकात घेऊन यापुढे सदर कर्मचाऱ्यांना कोणत्याही पडताळणीसाठी जावे लागणार नाही याची ग्वाही देण्यात आली. सातव्या वेतन आयोगात पदवीधर शिक्षक यांचे बाबत असलेल्या वेतन त्रुटी संदर्भात जिल्ह्यातील पात्र शिक्षकांचे प्रस्ताव मागून त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात येईल. या पुढील काळात पदोन्नतीसाठी निश्चित धोरण तयार करून वर्षातून जास्तीत जास्त तीन वेळा किंवा कमीत कमी दर सहामाहीला पदोन्नती करण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल.पदवीधर शिक्षक, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांना १२ वर्षानंतर मिळणारी वरिष्ठ श्रेणी लागू करण्यासंदर्भात लवकरच प्रस्ताव मागवण्यात येतील.सकाळच्या शाळे संदर्भात शेजारील पुणे व सांगली जिल्ह्यातील वेळापत्रकानुसार शाळेची वेळ ७- ३० ते ११- ३० करण्यासंदर्भात माहिती घेऊन लवकरात लवकर त्या पद्धतीने कार्यवाही करण्यात येईल.शिक्षकांच्या प्रश्नसंदर्भात त्यांचा लवकरात लवकर निपटारा करण्यासाठी तालुकास्तर प्रशासन व संघटना यांची संयुक्त बैठक घेऊन तात्काळ सोडवणूक करण्यासंदर्भात ऑगस्ट अखेरपर्यंत सर्व तालुक्यांचे नियोजन केले जाईल.जिल्ह्यातील सर्व पात्र शिक्षकांचे निवड श्रेणी प्रस्ताव तात्काळ मागविण्यात येऊन त्यावर कार्यवाही करून शासन नियमानुसार पात्र लाभार्थ्यांना निवड श्रेणी लागू करण्यासाठी प्रयत्न केले जातील. शालेय पोषण आहारा संदर्भात लवकरच सुटसुटीत मेनू देण्यात येईल व प्रमाणामध्ये असलेली विसंगती दूर करून सुसूत्रता आणली जाईल.विद्यार्थी क्रीडा स्पर्धा गट इ.१ ते ४ व इ.५ ते ८ करण्यासंदर्भात प्रयत्न केला जाईल
याप्रसंगी सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष विश्वंभर रणनवरे जिल्हा सरचिटणीस संतोष मांढरे शिक्षक बँकेच्या चेअरमन पुष्पलता बोबडे मॅडम जिल्हा कोषाध्यक्ष मोहन सातपुते शिक्षक बँकेचे माजी चेअरमन नवनाथ जाधव
किरण यादव
व्हाईस चेअरमन संजीवन जगदाळे
ज्येष्ठ मार्गदर्शक संजय साठे,
संतोष काटकर, जालिंदर विभुते ,श्री नारायण आवळे, किसन मगर, केंद्रप्रमुख डी डी ढेबे,दत्तात्रय बाचल,सेवानिवृत्त केंद्रप्रमुख संजय बोबडे
सातारा तालुका अध्यक्ष तातोबा भिसे
पाटण तालुका अध्यक्ष विनायक चव्हाण
महाबळेश्वर तालुकाध्यक्ष वसीम वारूणकर
कराड पाटण संचालक अंकुश नांगरे, महाबळेश्वरच्या सरचिटणीस राजू संकपाळ,
यशवंत जाधव ,आनंदराव पाटील
सातारा सरचिटणीस श्री रवींद्र कुंभार ,कार्याध्यक्ष प्रवीण क्षीरसागर ,राजकुमार गडकरी तानाजी सराटे मारुती पाटील, मच्छिंद्र नलावडे,अरविंद कदम, अनिल कांबळे, हनुमंत ढाणे, धनाजी देशमुख, रणजीत गुरव कुंडलिक जगदाळे, संतोष गुजर, नासिर वारूणकर, मंगेश कुंभार
आदी उपस्थित होते.
Leave a Reply