म्हसवड (वार्ताहर )—
माणदेशी न्यूज दिवाळी अंक म्हणजे साहित्य क्षेत्रातील नवोदित लेखक व कवी यांना नवीन साहित्य मेजवानी आहे. असे विचार म्हसवड येथील माजी नगराध्यक्ष नितीन दोशी यांनी व्यक्त केले.
म्हसवड येथील मोफत नगर वाचनालय सभागृहात माणदेशी न्यूज तर्फे प्रकाशित करण्यात येणाऱ्या तेजस्विता दिवाळी अंकाचे प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
यावेळी ते बोलत होते.
यावेळी नगरसेवक गणेश रसाळ, इंजिनिअर सुनील पोरे, लेखक अजित काटकर, नगरसेवक विकास गोंजारी, पत्रकार , पत्रकार राहुल खरात, संपादक प्रसाद कडव,लेखक विलास खरात, डॉक्टर राजेंद्र मोडासे, विक्रमवीर मुसाभाई मुल्ला, राजकुमार डोंबे, इम्रान मुल्ला, पत्रकार सुशील त्रिगणे, पत्रकार राजेश इनामदार, शांताराम टाकणे, भारत पिसे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नितीन दोशी म्हणाले, ग्रामीण भागातील लोकांना लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी संपादक विजय टाकणे यांनी सातत्याने 15 वर्षे दिवाळी अंक प्रसिद्ध केला आहे.. यामुळे वाचकांना ग्रामीण लेखन साहित्य वाचायला मिळते आहे.
यावेळी इंजिनिअर सुनील पोरे, गणेश रसाळ, डॉक्टर राजेंद्र मोडासे, अजित काटकर, यांनी मनोगत व्यक्त केले.
आभार प्रदर्शन सुशील त्रिगुणे, राजकुमार डोंबे यांनी केले.
यावेळी मुसाभाई मुल्ला यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवर मंडळी यांना पाक्षिक साहित्य भुमी वतीने सन्मान पत्र दिले.
……….



