सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचा मध्य प्रदेशात सत्कार

Spread the love

*फुले दाम्पत्य यांनी सामाजिक कृतिशील कार्याची सुरुवात केली म्हणून आज मानवता धर्म टिकून आहे – सत्यशोधक ढोक
*
रत्नलाम (म .प्रदेश) येथे सत्यशोधक रघुनाथ ढोक सन्मानित

पुणे. अखिल भारतीय माळी महासंघ आयोजित 24 वा.वर्धापन दिन सोहळा व सत्कार समारंभ नुकतेच रत्नलाम येथील जानकी हॉल,मध्ये दि.19 july 25 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत संपन्न झाला.या सोहळ्यात पुणे/सातारा येथील महाराष्ट्र शासनाचे ,महात्मा फुले चरित्र साधने साहित्य व प्रकाशन समिती सदस्य आणि फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाऊंडेशन चे अध्यक्ष विधीकर्ते सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी महाराष्ट्र व इतर राज्यात सामाजिक कार्य आणि सत्यशोधक विधी कार्यासह चळवळ सन्मानपूर्वक पुढे नेली त्याबद्दल त्यांचा सन्मान चिन्ह, शाल आणि भव्य हार घालून सन्मानित करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. विलास पाटील,कार्याध्यक्ष माजी न्यायाधीश शिवदास महाजन,मध्य प्रदेश अध्यक्ष हायकोर्ट वकील किशोर वाघेला,जिल्हाध्यक्ष डॉ.चंचल चौहान,शहराध्यक्ष उद्योजक नारायण स्वामी, सुरत अध्यक्ष डॉ.शामराव फुले,तेलंगणा प्रदेश अध्यक्ष,लेखक प्रा.सुकुमार पेटकुले ,राजेंद्र महाडोळे व इतर मान्यवर उपस्थितीत होते.
यावेळी सत्यशोधक ढोक म्हणाले की महात्मा फुले यांचे कर्मभूमीतून आलो असून त्यांनी सुरू केलेल्या अनेक सामाजिक कार्यापैकी एक सत्यशोधक विधी कार्य मी महाराष्ट्र व इतर राज्यात पुढे नेऊन आजपर्यंत गेली पाच वर्षात 53 सत्यशोधक विवाह आणि 14 गृहप्रवेश सोहळे व इतर सत्यशोधक विधी कार्य तसेच फुले दाम्पत्य यांचे जीवन कार्य विविध भाषेत प्रकाशित केले म्हणून, अस्सल सोन्याचे शहर म्हणून ओळख असलेल्या रत्नलाम मध्ये हा माझा सन्मान होतो आहे हे मी माझे परमभाग्य समजतो.पुढे ढोक म्हणाले की फुले दाम्पत्य यांनी आपल्या पर्यंत शिक्षणाची गंगा पोहचवली म्हणुनच मानवता धर्म ठिकून आहे .त्यानंतर जेष्ठ कवी दवणे यांची सावित्रीबाई जीवनावर कविता उद्बोधपर मराठीत म्हटली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास पाटील, शिवदास महाजन,राजेंद्र महाडोळे ,प्रा.सुकुमार पेटकुले व इतर मान्यवरांनी फुले दाम्पत्य यांना भारत रत्न पुरस्कार आणि तेलंगणा राज्यासारखे मध्य प्रदेश व केंद्राने 3 जानेवारी हा महिला शिक्षण दीन म्हणून सर्वत्र साजरा करावा तसेच जनगणना प्रसंगी सर्वांनी आपली जात माळी उल्लेख करावा इतर पोट जातीचा उल्लेख करू नये असे ठराव पास करीत समाजाला आवाहन देखील केले.
या प्रसंगी अनेक राज्यातून आलेले प्रतिनिधींचा व इतरांचा सन्मान करण्यात आला.तर सूत्रसंचालन कवी डॉ.चंचल चौहान यांनी केले तर आभार प्रदर्शन स्वामी नारायण यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!